ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.275

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७५

त्रिपुटी उलटु निंर्गुणी अरूता । पाहातां दृष्टांता भेदु नाही ॥ भेदु अभेदु अवघाचि गोविंदु । बिंबे बिंब छंदु हरिलीला ॥ नाही आला गेला शब्द पैं दृष्टांतें । दृश्यादृश्य भूते एकतत्त्वीं ॥ बापरखुमादेविवरू अधऊर्ध्व शेज । वेगी तूं उमज अरे रया ॥

अर्थ:-

निर्गुणाच्या अलिकडे असलेली जी त्रिपुटी तिचा विचाराने निरास करून निर्गुणाचे स्वरूप जाणले असता त्याठिकाणी भेदच राहात नाही.मग त्याला प्रमाण काय देणार.परंतु श्रीहरिची कांही अशी विचित्र लीला आहे

की तो देव व भक्त या रुपाने आपणच सर्व बनला आहे. तो परमात्मा भक्त झाला तरी केव्हाही जीवरूपाला आला नाही.व गेला नाही. त्याच्या संबंधी वेदवाक्यहाची तसेच आहे. त्याला दृष्टांतही देता येत नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलावाचून दुसरे काहीच नाही तसे त्यांना समजून घे. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *