ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.274

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७४

पाहता पाहणे दृश्याही वेगळें । तें कैसें आकळे ब्रह्मतेसी ॥ पाहे तेंचि पाही नाही तें काई । गगनीच्या पायीं तूंचि होसी ॥ स्वरूपीं रमता हृदयस्थ आप । तयाचे स्वरूप आदि मधें ॥ बापरखुमादेविवरू सगुणी न माये । निर्गुण दिसताहे जनीं वनी ॥

अर्थ:-

दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीहून ब्रह्म निराळे आहे. ते या त्रिपुटीस कसे आकलन होईल. त्या परमात्म्याला तु पहा. त्याच्या ठिकाणी काही नाही. त्या गगनाच्या पायी म्हणजे परमात्म स्वरूपी तद्रुप होशील. परमात्म्याच्या ठिकाणी तू एकरूप झालास म्हणजे जगाच्या उत्पत्ति स्थिती व लय यांना तूच अधिष्ठान होशील. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते सगुणच नसून जनावनामध्ये निर्गुणरूपानेही मला तोच दिसत आहे. असे माऊली सांगतात.

Leave a Reply