ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.305

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३०५

सकळहि कळा बिंबोनी निराळे । ते तूं घेऊनी ऊगले राहे रया ॥१॥
ते तत्त्वतां तत्त्व घेई का एकत्त्व । या मना महत्त्व देऊनियां ॥२॥
निरालंब निराकार पाहे ते अपरंपार । ते तूं परात्पर होऊनि राहे ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु सकळहि कळा प्रकाशकु । तोचि सर्वव्यापकु जाणोनी राहीं ॥४॥

अर्थ:-

ज्याच्याठिकाणी सर्व कला आहेत पण स्वरुपदृष्टिने ते वेगळे आहे. असे ते परमतत्त्व जाणून स्वस्थ राहा. पण याला मनाची अनुकुलता पाहिजे याकरिता त्या मनाला मोठेपणा देऊन परमात्मतत्व जाणून घे. निर्विषय निराकार,

अमर्याद असे जे परमतत्त्व ते तू होऊन राहा. सर्व कलांचा प्रकाशक माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सर्वव्यापक आहेत. त्याचे ज्ञान करुन घे. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *