ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.193

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १९३

तापत्रयी तापलीं गुरूते गिवसिती भगवे देखने म्हणती तारा स्वामी । तंव ते नेणोनि उपदेशाची रीती आनान उपदेशिती ठकले निश्चितीं तैसें झाले ॥ संत ते कोण संत ते कोण । हे जाणवी खूण केशीराजा ॥ कोणी एक प्राणी क्षुषेने पडिले । म्हणोनि दोडे तोड़े गेले ।

खावों बैसे तों नुसधि रूई उडे । ठकले बापुडे तैसे झालें ॥ कोणी एक प्राणी प्रवासे पिडिला । स्नेहाळे देखिला विबवातु । तयाचे स्नेह लावितां अगींं । सुजला सर्वागी तैसे जाले ॥ कोणी एक प्राणी पडिलासे झडीं । म्हणोनी गेला पैल तो झाडी ।

खा खात अस्वली उठली लवडसवडी । नाक कान तोंडी तैसे जालें । ॥ ऐशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी । बापरखुमादेविवरू विठ्ठलीं भेटी । पडली तें न सुटे जिवेंसी ॥

अर्थ:-

त्रिविध तापाने तापलेले भगवे वस्त्र घातलेल्याला गुरु म्हणतात व तारस्वरात मला तारा म्हणतात. पण त्या केलेल्या गुरुलाच ज्ञान नसल्याने ते भलताच उपदेश करतात. व त्यांची फसवणुक होते. हे केशीराजा हे संत कोण आहेत त्यांची खुण कोणती?

कोणी एक माणसाने भुक लागली म्हणुन कापसाची बोंड आणली व ती फोडली तशी ती रुई उडुन जाऊ लागली. व त्या बापड्याची फसवणुक झाली. कोण्या प्रवाश्याने थकला म्हणुन सर्वांगास बिंब्याचे तेल लावले ते त्याच्या अंगावर उतले व त्याच्या सर्वांगाला सुज आली

कोणी एक पाऊसाच्या झडी पासुन वाचण्यासाठी झाडीत शिरला तिथे असलेल्या अस्वलाने त्याचे नाक,कान व तोड तोडुन ताबडतोब खाल्ले. अशा सर्व कळा तु नंदरायाचा कुमार होऊन जाणतोस.

माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची भेट झाली की ती जीवापासुन सुटत नाही असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *