ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.186

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १८६

तुझिये निढळ कोटि चंद्र प्रकाशे । कमल नयन हास्य वदन हांसे ॥ कृष्णा हाल का रे कृष्णा डोल का रे । घडिये घडिये घडिये गुज बोलका रे ॥ उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो । बाप रखुमादेविरु विठ्ठलु नाहो ॥

अर्थ:-

तुझ्या कपाळी कोटी चंद्राचा प्रकाश आहे. हे कमलनयना तु आम्हाला तुझे हास्य दाखव. हे कृष्णा तु जरा हाल व डोल व घडीभर तरी आमच्या बरोबर हित(आमचे) -गुज( तुझे ज्ञान) कर. माझे पिता व रखुमाई पती श्री विठ्ठल उभे राहुन कशा बाह्य हालवतात ते पहा.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *