ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.185

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा फोटो min. सार्थ गाथा फोटो min min

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १८५

भोवरी सांडूनि पाव ठेवीरे गोपाळा । नाच चिदनंद सुख होईल सकळां ॥ रंगु रंगलारे रंगु रंगाला रे । आदि मध्य अन्त त्रिगुण विरहित विश्व प्रकाशाला रे ॥ रंगु रंगला सुरंग जाला । पहिलिये रंगी निवृत्ति भला ॥ सुखीं सुख मुरे प्रेमें चिदानंद उरे । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥

अर्थ:-

हे गोपाळा तुला त्रास होणार नाही. अशा रितीने पाऊल टाकुन नाच तसा नाचलास म्हणजे. आम्हा सगळ्यांना चिदानंद सुख होईल.तुझ्या नाचण्यांत रंग आला म्हणजेच आम्हास फार आनंद आहे तुझा आनंद त्रिगुणातीत विश्वव्यापक प्रकाशमान, आदि मध्य रहित असा आहे. तो तुझ्या नाचण्याने आम्हाला मिळेल. विषयसुखापासून वृत्ति परत फिरुन तुझ्या रंगात रंगली म्हणजे तुझा आनंद त्या वृत्तिला मिळतो ती आनंदमय वृत्तिही मुरली म्हणजे. स्वरुपभूत चिदानंद शिल्लक राहतो. तोच रखुमादेवीवर बाप श्रीविठ्ठल आहे. असे माऊली सांगतात.

Leave a Reply