ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.८५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८५

दसविये द्वारी वोहट पडिला । नेणता पैं गेला पहावया ॥ अवचिती वाट सांपडली पंथे । ब्रह्मनाम तेथें आलें हातां ॥ ज्ञानदेवा गीती निशाणी नाम । समाधि संजीवनी तारक हरि ॥

अर्थ:-

दहा इंद्रियांची दहा द्वारे ओस पडली व त्याला पहायला मन धावले. ते ब्रह्मनाम अवचित कळले व निजपंथाची वाट सापडली.ते नामच संजिवन समाधी पर्यंत पोहचवते तेच नाम मी गात आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *