ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.७३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७३

हरि बुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥ राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥

सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥ ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥

अर्थ:-

 वाचेला सुलभ असलेले रामकृष्णनाम जपले तर ती बुध्दी असलेला जीव सर्व जींवात दुर्लभ असतो. ज्याने रामकृष्ण नामाने उन्मनी अवस्था प्राप्त केली त्याच्या पुढे सर्व सिध्दी हात जोडुन उभ्या राहतात.

सर्व प्रकारच्या सिध्दी ह्या हरिनामात असल्याने ते जपणारा प्रपंचातुन ही तरुन जातो. ज्याच्यावर हा रामऋष्णनामाचा ठसा पडला त्याच्या साठी दाहीदिशात तो आत्माराम असतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *