ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.६८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६८

हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झाले । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥

हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे याचे ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

अर्थ:-

हरिनामाचा उच्चार केलामात्र त्या जीवाच्या अनंत पापराशी भस्मसाथ होतात. जसे अग्नी शेजारी वाळलेले गवत पेटते तसे नाम जप झाल्यावर पापाचे होते. हरिनाम हा अगाध मंत्र

जपल्यावर पिश्चाच बाधा ही हटते. ज्याचे वर्णन करायला उपनिषद ही असमर्थ आहेत तो माझा हरि समर्थ आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *