ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 69

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६९

तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि । वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥ भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥ पारियाचा रवा घेतां भूमिवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥

अर्थ:-

तीर्थभ्रमण, व्रत, नेमाची पूजा हे उपाचार भक्तीभावाने केले नाहीत तर वाया जातात त्याने फक्त वाऊगी उपाधी मिळते. तो हरि भावबळाने आकळता होतो. भाव नसेल तर तो कळत नसेल तर भक्तीभाव असेल तर तो तळहातावर घेतल्येला आवळ्या येवढा जवळ असतो. पाऱ्याचे खाली पडलेले थेंब उचलायला प्रचंड यत्न करावे लागतात तसे नामसाधन सोडता इतर साधनानी त्याला प्राप्त करायला सायास पडतात. निवृत्तीनाथांनी मला अभेद निर्गुण रुपाचे दर्शन घडवले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading