ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

तुज सगुण म्हणो कीं निर्गुण रे ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५

तुज सगुण म्हणो कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥ अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥ तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे । स्थूळ सूक्ष्म एक गोविंदु रे ॥३॥ तुज आकारू म्हणो की निराकारू रे । आकारू निराकारू एकु गोविंदु रे ॥४॥ तुज दृश्य म्हणो की अदृश्य रे । दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥ निवृत्तीप्रसादे ज्ञानदेव बोले । बापरखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥६॥

अर्थ:-
हे गोविंदा तुला सगुण म्हणायचे की निर्गुण म्हणायचे मला तु दोन्ही ही वाटतोस. तुझा अनुमान करता येत नाही श्रुती ही नेती नेती म्हणुन थांबते व तुलाच दाखवते. तुला स्थुळ म्हणायचे की सुक्ष्म म्हणायचे तु मला दोन्ही रुपात दिसतोस. तुला आकारलेला मानायचे की निराकार मानायचे तु दोन्ही पध्दतीने मला दिसतोस. तुला दृष्य म्हणायचे की अदृश्य म्हणायचे तु दृष्य होऊन दिसतोस व अदृश्यरुपी जाणवतोस.निवृत्तिनाथांच्या कृपेने मी तुला विठ्ठल म्हणुनच पाहतो व अनुभवतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *