संत चोखामेळा म. चरित्र १

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग – १.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

मेहुणपुरात राहणारा सुदाम येसकर हा अनुसुचित जातीतील एक सत्शील, निर्व्यसनी तरुणासोबत सावित्रीचे लग्न झाले.सावित्रीला या गुणी नवर्‍याबद्दल अतिशय अभिमान होता.त्यांचा संसार सुखाने सुरु होता,पण लग्नाला ४-५ वर्षे होऊनही सावित्रीची कुस उजवली नव्हती.त्यांची जात बारा बलुतेदारातील मानाची होती,तरीसुध्दा बलुतेदाराचे हक्क कमी मिळत आणि कामं मात्र भरपूर असे.त्यावेळी मुलखात यवन घुस खोरी करुन लुटालुट करीत.त्यासाठी गांवात गस्त घालणे,निरोप पोहचवणे, कांही सरकारी कागदाची ने आण करणे अशी कामं करावी लागत,त्यातच उच्च वर्णीयांकडुन नेहमीच अपमानही सहन करावा  लागत.गावाची स्वच्छता करतांना आपली सावली त्यांच्यावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागे. त्यांच्या विहिरी,पाणवठे,वेगळे असत. तिथही शिवाशिवी होतीच.तिरस्काराच्या थुंक्या झेलने हे रोजचेच होते.परंतु त्यातही रघुनाथ भट,श्रीपती पाटील यांच्या सारखी कांही लोकं समाजाचा गाडा चातुवर्णाच्या चाकांवर चालविणारे होते.

सुदामाचे काम आटोपले की,ते विठ्ठल मंदिराच्या दाराशी जाऊन बसायचे सुदामा येसकर हा पापभीरु,देवभोळे होते.त्यांच्या घराण्यांत पंढरपूरच्या वारीची चाल होती.ते वारकरी असुन विठुरायावर अनन्यभक्ती होती.त्यामुळेच पोटी संतान नसल्याची खंत न मानता, त्याच्यावर दृढ विश्वास असल्याने,पती पत्नी आपले आयुष्य सुखासमाधानाने जगत होते.ते पत्नीची समजुत घालुन विठ्ठलावर विश्वास ठेवण्यास सांगत असे.असेच दिवस चालले असतांना, कोरेगांवच्या बुधाजी पारळांकडुन सांगावा आला.हा पाटील फार धार्मिक असुन त्याची विठ्ठलभक्ती पंचक्रोशीत प्रसिध्द होती.पंढरपूरची एकही वारी ते चुकवित नसत.घरांत आलेली कोणतीही वस्तु अथवा शेतातल पिक विठोबाला दाखवल्याशिवाय वापरत किंवा खात नसे.यावर्षी त्यांच्या शेतातील झाडांना खुप आंबे आले.नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे निवडक आंबे पंढरपूरच्या विठोबा ला देण्यासाठी व जास्त आंबे असल्या मुळे पती पत्नीमिळुन नेण्यास सांगीतले. मे महिन्यातील कडक उन्हाळाचे दिवस, अंग भाजणारे ऊन,खाली पायाची सोलटी सोलणारा फुफाटा अशा कडक उन्हात सुदामा व सावित्री अनवायी पायाने पंढरपूरकडे निघाले.

‌      भयंकर उन्हात तहानेने घसा कोरडा पडला.पण कुठेही पाणी,एवढच काय वाटेत नदी ओढा लागला तरी पाणी पिण्यास मनाई होती.मग कुणातरी वाट सरुला हाकारुन,त्याची मिनतवार्‍या,  अजिजी करुन त्याने दिलेल्या पाण्यावर तहान भागत असे.एखादेगाव लागले की,भाकर तुकडा खायचं, दिलेलं पाणी प्यायचं आणि परत चालु लागायच!तापलेल्या फुफाटातनं चालुन सावित्रीच्या पायाला फोडे आले.मग झाडाची पाने पावलांना बांधुन चलायच, पण चलायचच होत.मजल दर मजल करत,उन्हाची, फुफाट्याची,सोसाट्याच्या वार्‍याची तमा न बाळगतां सुदाम सावित्री पंढरपूरजवळ आले असतां,सावित्रीला ऊन्हाचा त्रास सहन न झाल्याने एका झाडाखाली, डोक्यावरची  पाटी उतरवुन बाजुला ठेवुन विश्रांतीसाठी शांतपणे डोळे मिटुन बसले असतां,त्यांच्या कानावर अचानक आवाज आला. माई! मी दोन दिवसांचा उपाशी आहे,मला कांहीतरी खायला दे! या गरीब ब्राम्हणाचे आशिर्वाद लाभेल.

आवाजासरशी दोघांनी डोळे उघडुन समोर बघीतले तर,डोक्याचा घेरा, त्यातील शेंडी,सोगा खांद्यावर, फाटकं धोतर,अंगात फाटकी बंडी,दिनवाना चेहरा,शरीर अत्यंत क्रुश,भव्य कपाळावर लावलेले उभे गंध,तेजस्वी स्नेहार्द डोळे त्याच्या बुध्दीमत्तेची व प्रेमळपणाची साक्ष देत होते.माई! दोन दिवसांपासुन उपाशी आहे. खायला कांही तरी दे ग! पती पत्नी विचारात पडले,आपण हीन जातीचे,हा ब्राम्हण?आपल्या हातचं कसं खाणार?आंब्याशिवाय आपल्याजवळ दुसरं कांही नाही,आंबेही दुसर्‍याचे,ते विठुरायापर्यंत पोहचवायचे,मग? शेवटी सुदामा म्हणाला,महाराज!आपण ब्राम्हण आम्ही हीन जातीचे,शिवाय आमच्या जवळ द्यायलाही कांहीच नाही.त्यांच्या बाजुला असलेल्या टोपल्यांकडे पाहुन म्हणाला, यात फळं दिसतात,यातील एखादे तरी फळ दे ना!

पुढील भाग

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *