ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१३५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३५

कर्माचिया रेखा । नुलंधिती अशेषा । म्हणोनि विशेषा । केशव सेवा ॥ रामकृष्ण माळा । घाला पा रे गळां । अखंड जीवनकळा । राम जपा ॥ करावा विचार । धरावा आचार । करावा परिकर ।

रामनामीं ॥ सकळांचा सकळी । त्याने तू आकळी । जिव्हा हे वाचाळीं । रामरतीं ॥ रिघे रे शरण । तुज नाही मरण । ठाकिसी चरण । श्रीविठ्ठलाचे ॥ निवृत्ती प्रसादे जोडे । विठ्ठलनामें घडे । ज्ञानदेव बागडे । पंढरीये ॥

अर्थ:-

कर्माची विहित रेखा न ओलांडता त्या कर्माचा नाश करण्यासाठी विशेष सेवा केशवाची करावी. रामकृष्णनामाची माला घेऊन अखंड जीवनभर त्या रामनामाचा जप करावा. त्याच रामनामाला आपला विचार व आचार करावा.

इतर बडबड न करता सतत रामनामात रत राहुन त्याचे आकलन करुन घ्यावे. त्या श्री विठ्ठलाचे चरण शरण जाऊन पकडले की मरणाचे भय उरत नाही. मी निवृत्तीनाथांच्या कृपेने मला ते विठ्ठल नामाचा प्रसाद मिळाला त्यामुळे मी पंढरीत बागडलो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *