ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.187

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १८७

कोवळे ठुसठुसित मोतियांचे घड । शृंगारिले गूढ जया लेणी ॥ बैसोनियां रथीं सुरनर खेळती । देखोनिया पशुपती वेडवला ॥ युक्ति खुंटली वासना निमाली । कळा पॅ बैसली पद्मासनीं ॥ होय कीं नव्हे ज्ञानदेव पुसती । आठवितां निवृत्ती भेटी होये ॥

अर्थ:-

त्या श्रीकृष्ण परमात्म्याला काय वर्णावे, त्या परमात्म्याचे अंग म्हणजे कोवळ्या ठुसठुसीत म्हणजे पाणिदार व मनाला वेध लावण्यासारखे मोत्यांचा शृंगारा घडविल्या सारखे आहे.असा तो सुरनर म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा रथात बसून क्रीडा करीत आहे. ते त्याचे ऐश्वर्य पाहून साक्षात शंकरही वेडावून गेले आहेत. त्याकडे पाहाताच त्याच्या प्राप्तीची युक्ती काय ह

कळेनासे होऊन ती प्राप्त करुन घेण्याची वासनाच नाहीसी झाली. सर्व कला पद्मासन घालून त्या कृष्ण स्वरुपांत बसल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीरायांना विचारतात ज्याच्या दर्शनाने भगवान शंकर वेडे झाले तोच हा श्रीकृष्ण परमात्मा ना? निवृत्तीरुप जो श्रीकृष्ण परमात्मा त्याची भेट झाली. म्हणजे दर्शन झाले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *