२८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २८.

रुख्मिणिच्या विवाहास यादवसेने सह श्रीकृष्ण बलराम आला ही बातमी नगरात सगळीकडे हां हां म्हणता पसरली श्रीकृष्णाचे बालपणापासुनचे सगळे पराक्रम व त्याच्या सौंदर्याची ख्याती नगर वासीयांना कळल्यामुळे त्याला पहाण्या साठी स्री पुरुषांचे थवेच्या थवे तो उतरला होता त्या वाड्यासमोर जमा होऊ लागले. ऐवढ्या अगनित राजांमधे श्रीकृष्णा सारखा तेजस्वी एकही पुरुष नाही अशी चर्चा जमलेल्या लोकांमधे होऊ लागली.
लग्न घटिका भरत आली. कुळा च्या प्रथेप्रमाणे अंबिकामातेच्या देवळात जाण्यासाठी श्रीकृष्णाचे ध्यान करत ताशे सनई,मृदुंगाच्या जयघोषात व नंग्या तलवारीच्या पहार्‍यात मैत्रीणी व सुवासिनीं सह नवरी पायी निघाली.

अशी ही मिरवणुक देवळाच्या दरवाज्यासमोर पोहोचल्या वर सुवासिनींनी तीच्यावरुन लिंबलोन उतरवुन देवीजवळ नेले.कुलाचाराप्रमाणे आदिमाता अंबा आणि त्रैलोक्यनाथला मनोभावे भक्तीपुर्वक आळवित आपली इच्छापुर्तिची प्रार्थना करुन व ओटी भरुन कृष्णाचा जप करीत हलकेच बाहेर पडली.सालंकृत रुख्मिणीला पाहुन जमलेले लोकं व राजे तिच्या दर्शनाने वेडावुन गेलेत.अधिर मनाने चौफेर दृष्टी टाकल्या वर,एका बाजुला पांढरेशुभ्र घोडे जोडले ले,गरुड ध्वजांकित रथात चतुर्भुज श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती दिसतांच दोघांची दृष्टादृष्ट झाली.परमांनंदाचे तिला भरते आले.ती हलकेच एक एक पायरी उतरत असतांना निमिषार्धात श्रीकृष्णाचा रथ पायर्‍या जवळ येऊन ऊभा राहिला.श्रीकृष्णाने तीचा मृदु हात धरुन अलगद रथात घेतले.आणि काय घडल हे लोकांच्या लक्षात येण्यापुर्वीच रथ भरवेगाने गर्दीतुन बाहेर पडला.क्षणभर सारे आवाक झाले.


शस्रास्रांनी सज्ज मानुन आमच्या नजरेसमोर आमच्या हातावर तुरी देऊन व नाकावर टिच्चुन निःशस्र असुनही तिला सहज घेऊन गेला. ह्या भयंकर अपमानाने जरासंधाधिकांना,आपला पराक्रम धुळीला मिळाला असे वाटुन अतिशय जळफळाट झाला.रुख्मी तर क्रोधाने व अपमानाने उभा पेटला.त्याने
‌ ओरडुन शस्रसज्ज होण्याची व पाठलाग करण्याची आज्ञा दिली.पण
कृष्णाने दरवेळी केलेला पराभव आठव ला,शिवाय यादव सैन्याचा आपण प्रतिकार करुं शकणार नाही या विचाराने जरासंध शिशुपालला समजावत म्हणाला,योग्य व अनुकुल वेळ आल्यावर आपण त्याचा नक्कीच मुकाबला करुं! सध्या अविचाराने सैन्याचा नाश करणे योग्य नाही.

अशीच सर्वांची समजुत घातल्याने आलेले सर्व राजे निघुन गेलेत. रुख्मीचीही समजुत घालण्याचा जरासंधा ने प्रयत्न केला,पण क्रोधाने भडकलेला रुख्मीला पटणे शक्यच नव्हते.संतापाने म्हणाला,सर्व गेलात तरी मी कृष्णाला ठार करुन रुख्मिणीला वापस आणल्या शिवाय परत फिरणार नाही.कौंडण्यपुर मोकळे झाले.
शस्रसज्ज व रथावर आरुढ होऊन अफाट सैन्यासह यादवांचा पाठलाग केला.अखेर कृष्णाला गाठुन द्विरथ युध्द सुरु झाले.श्रीकृष्णाने बाण सोडुन रुख्मि चे धनुष्य, रथाचे घोडे,सारथी, रथध्वज छेदुन टाकले.श्रीकृष्ण आवरत नाहीस पाहुन

क्रोधाविष्ट होऊन मरेन किंवा मारीन या निश्चयाने ढाल तलवार हाती घेऊन रथातुन उडी मारुन कृष्णावर चाल केली.कौंडण्यपुर सोडतांना कृष्णाच्या तावडीतुन रुख्मिणीला परत आणल्या शिवाय तोंड दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा केली असल्यामुळे तो जीवावर उदार झाला होता.आतापर्यंत कृष्णाने सर्व प्रकार लिलया घेतला होता,पण आतामात्र त्याचा राग अनावर झाला. कृष्णाचा क्रुध्द चेहरा बघताच रुख्मिणी घाबरली.आपला भाऊ अंतरणार या भितीने रडत भावाला जीवदान देण्याची विनंती केल्यावर,तिच्या इच्छेप्रमाणे एक बाण मारुन मुर्च्छित केले.व हातपाय बांधुन टाकुन, आपल्या राथारुढ होऊन द्वारकेकडे प्रयाण केले.


रुख्मिला शोधत,त्याचे सैन्य आले असतां,नर्मदाकिनारी मैदानात तो बेशुध्दा वस्थेत आढळल्यावर त्याला शुध्दीवर आणण्यांत आले.श्रीकृष्णाने आपल्याला बांधुन टाकलेले पाहुन त्याचे लज्जेने मुख काळे पडले.द्वेषाग्नि ह्रदयात भडकला.प्रतिज्ञेप्रमाणे श्रीकृष्णाला ठार करुन रुख्मिणीला परत आणल्याशिवाय कौंडण्यपुरात पाऊल टाकणार नाही. त्याने त्याच भूमीवर भोजकर नावाची नवी नगरी उभारुन “भोजकटचे” राज्यपद प्राप्त करुन घेतले,तो मत्सरी जरी असला तरी विलक्षण पराक्रमी होता.रुख्मीला जीवंत सोडलेले पाहुन सर्वजण अगदी भारावुन गेलेत.
अत्यंत लावण्यवती,शालीन,चतुर रुख्मिणिला श्रीकृष्ण द्वारकेस येत असल्याचे वृत्त कळल्याबरोबर संपुर्ण नगरी सजवुन त्यांच्या विवाहाची तयारी सुरु झाली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *