२५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २५.

श्रीकृष्णाच्या अभिषेकाची वार्ता कळताच,संतापुन बरेचसे राजे आपल्या सैन्यासह आपपाल्या देशाकडे निघुन गेले अर्थात रुख्मिणीने स्वयंवर रहित झाल्या मुळे तिने सुटकेचा निःश्वास टाकला. आणि श्रीकृष्णाशिवाय दुसर्‍या कुणालाच वरमाला घालणार नाही हा निर्धार पक्का झाला.क्रथकौशिकने अर्पण केलेले राज्य श्रीकृष्णाने त्या उदार राजा ला परत करुन आशिर्वाद देऊन प्रेमाने निरोप घेतला.श्रीकृष्ण मथुरेला निघाला तेव्हा बरेचसे राजांनी त्याला प्रेमाने निरोप दिला,त्यात भीष्मकही होते.रथात बसतांना मनोमनी रुख्मिणीला अभिवचन देत म्हणाला,मी लवकरच तुला घेऊन जाईन तूं फक्त माझीच आहेस.चिंता करुं नकोस
मगधाधिपती हिंदुस्थानचा सार्वभौम राजा जरासंध,विदर्भातुन अप मानीत होऊन भयंकर संतापुन देशी परतला.कालच्या पोराने,या कृष्णाने जागोजागी अवहेलना

करावी? काय करावे?कसे पारिपात्य करावे?हं! त्याला कालयवनाची आठवण झाली.हा यवना धिपती यवनेंद्रच कृष्णाला भारी पडु शकतो.ठरलं तर!त्याने आपला मित्र शाल्वराजाला,कालयवनाचे मन वळवि ण्याची आग्रहाची विनंतीवजा सुचना केली.त्यानुसार शाल्वराजा कालयवना कडे जाऊन म्हणाला,पुत्रप्राप्तीच्या इच्छेने खडतर तपश्चर्या करुन शंकराकडुन वर प्राप्त करुन गार्ग्यमुनींनी मथुरा वासींना अवध्य असलेला तुझ्यासारखा पुत्र झाला.तूं अवध्य असल्यामुळे इंद्रही तुझ्यापुढे टिकुं शकले नाही,तेव्हा कृष्णाला जिंकण्यासाठी पश्चिमेकडुन तू आणि जरासंधाने पुर्वेकडुन मथुरेवर चाल केली तर कृष्णाचा सहज पराभव होईल. कालयवन मोठ्या आनंदाने तयार झाल्या वर एकमेकांना दृढांलिंगन देऊन शाल्व मार्गस्थ झाला.


ही बातमी गुप्तहेराकडुन कृष्णाला कळल्यावर,नुकतच भरभराटीस आलेल्या मथुरेस आपल्यामुळे विध्वंस होऊ नये म्हणुन ही नगरी सोडुन दुसरीकडे निघुन गेल्यास मथुरा वाचेल असा दोघा बंधुंचा विचार पक्का झाल्यावर, दुसर्‍या दिवशी भरलेल्या यादव सभेत एक नवी नगरी वसविण्याचा प्रस्ताव ठेवला. जरासंध सैन्यबलाने प्रबळ असल्यामुळे त्याच्याशी युध्दात आपण जिंकु शकत नाही तो अवध्य आहे आपल्याला.सर्वानु मते कृष्णासह सर्वांनी मथुरा सोडुन जाण्याचे निश्चित ठरले.तेवढ्यात कालयवन ससैन्य चढाईच्या तयारीने येत असल्याची वार्ता दुताने आणली.श्रीकृष्ण म्हणाला,आपल्याजवळ वेळ फार कमी आहे.सर्वांनी निघण्याच्या तयारीस लागावे.


पुर्ण तयारीनिशी सर्व यादव आपला परिवार,सामान,गजहत्ती,घोडे, पदाती,सैन्यासह पश्चिम द्वाराने बाहेर पडले.सर्वजण आनर्तहुन(गुजरात) पुढे सरकत समुद्रकिनार्‍या वर पोहोचले. तेथील नारळ,केतकीची असंख्य बने पाहुन,इथेच कुठे तरी नगर वसवावे हा विचार करीत कृष्णाने चौफेर नजर फिर वल्यावर,ताम्रमृतिकांनी युक्त चारही बाजु सागराने वेढलेला असा कुशस्थळी नावाचा विस्तीर्ण प्रदेश आढळला.जवळच रैवतक पर्वत असुन त्याची शिखरे मंदिरा सारखी प्रशस्त होती.याच पर्वतावर एकलव्य आणि द्रोणाचार्यांनी दीर्घकाल पर्यंत वास्तव्य केले होते.त्या सागरवेष्टीत रम्य प्रदेशावरच श्रीकृष्णाने “द्वारवती” नगरी वसविण्याचे ठरविले.श्रीकृष्णाने नेमुन दिलेल्या जागी सर्वांनी तात्पुरते राहण्यासाठी शिबिले बांधली.नगरा भोवती मजबूत कोट बांधण्यात आले.


द्वारवती स्थिरस्थावर होत नाही तोच कालयवन मथुरेवर चाल करुन जात असल्याची बातमी दूताने आणली.अवध्य कालयवन इथे आला तर,आतांच या नगरीचा विध्वंश करील,त्यापेक्षा त्याला मथुरेजवळ गाठावे असा विचार करुन एकटाच पायी निघुन निशस्र कृष्णाने त्याला मार्गातच घोलपुर जवळ गाठले. श्रीकृष्ण निःशस्र असल्याचे पाहुन कालयवनही रथातुन पायउतार झाला. त्याला पाहुन आपण भयभीत झाल्याचे दर्शवुन कृष्ण पळु लागला.श्रीकृष्णाचा पाठलाग करीत एकटा कालयवनही त्याच्यामागे पळू लागला.पळतां पळतां श्रीकृष्ण

एका गुहेत शिरुन,तेथे त्रेतायुगा पासुन मुचुकुंद ऋषी निजलेले होते.देवा कडुन त्यांना वर मिळाला होता,जो कोणी त्यांना जागृत करेल,त्याच्याकडे पाहतांच तो भस्म होईल हे माहित असलेल्या कृष्णाने त्यांच्या अंगावर आपला शेला पांघरुन स्वतः लपुन बसला.पाठलाग करीत आलेल्या कालयवनाला हा कृष्ण आहे असे समजुन निद्रिस्त मुचुकुंद ऋषीला त्वेषाने लाथ मारल्याबरोबर ऋषी जागे झाले व संतप्त ऋषीने त्याच्याकडे पाहतांच कालयवन जळुन खाक झाला.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *