१८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – १८.

श्रीकृष्णाच्या सुचनेनुसार वसुदेवाने नंद व इतर सर्व गोपांचा वस्रालंकार अर्पन व स्तुती व कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांची बोळवण केली.त्यानंतर यादववीर येऊन बलराम-कृष्णाचे दर्शन व वसुदेवां चे अभिनंदन केल्यावर कंसस्रीयांचा ह्रदय विदारक विलाप सांगीतल्यावर श्रीकृष्णा ला फार वाईट वाटले. आवेशात कंसाचा वध करुन त्याच्या स्रीयांना दुःखाच्या खाईत लोटल्याचे दुःख तर मलाही होत आहे,दुःखी स्रीयांचा आर्त स्वर ऐकुन कोणाचे ह्रदय कळवळणार नाही.?पण काय करणार? कंसाने पाप व जुलमी अत्याचाराचा कळस गाठला होता.आतां तुम्हीच त्या स्रीयांचे सांत्वन व मथुरेतील जनतेचे समाधान करा!


तेवढ्यात आपल्या जुलमी पुत्राच्या अंत्यसंस्काराची अनुमती मागण्यासाठी शरमिंदा झालेले उग्रसेन आलेले पाहतांच चटकण उठुन वसुदेवाने त्यांचा हात धरुन मोठ्या आदराने मुख्य स्थानी आणुन बसविल्यावर,उग्रसेन कृष्णाला म्हणाले! कृष्णा! तु अलौकिक पराक्रम करुन माझ्या उन्मत्त पुत्रास शिक्षा दिल्याने शत्रु तुला घाबरु लागले. यादवांचा पाया मजबुत केलास. सामंत, राजे तुझे मांडलिक होतील,प्रजा तुझ्या आज्ञेत वागतील,कृष्णा राज्याची जी संपत्ती आहे ती सर्व तु घे,फक्त आम्हा दिनांना कंसाचे प्रेतसंस्कार करण्याची अनुमती दे… उत्तरक्रिया पार पडली की,

पत्नी,सुनांना घेऊन अरण्यात जाऊन उर्वरीत आयुष्य तिथेच काढु…
उग्रसेनचे असे अगतिक बोलणे ऐकुन कृष्णाला गहिवरुन आले,तो म्हणाला,तात! आपण आतां जे बोललात ते समयोचित,कुलाला व शीलाला साजेसे बोललात,पण तात! झाल्या गोष्टीला उपाय नाही.तात कंसाचे प्रेतसंस्कार राजाच्या इतमानेच करु या! तात! मी राज्याच्या लालसेने हे केलेले नाही.मला राज्याची किंचितही इच्छा नाही.तुम्हीच भद्रकुलाच्या अग्रणी आहांत.लगेचच श्रीकृष्णाने उग्रसेनचा अभिषेक करवुन स्वहस्ते राजमुकुट त्यांच्या मस्तकी ठेवला.नंतर स्वतः जातीनिशी हजर राहुन राजकीय इतमानाने कंसाची उत्तरक्रीया पार पाडली.


आतां उग्रसेन राज्यकारभार पाहुं लागले.कंसाच्या जुलमाने देशोधडीला लागलेल्या सर्वांना परत बोलावुन घेतले. भोज,वृष्णी,अंधक, या सर्व कुलातील देशत्याग केलेल्यांना त्यांची संपत्ती, जहागिरी मानमरातब परत केला.सर्वजण आनंदाने व एकोप्याने नांदु लागले.आणि मथुरेची भरभराट होऊन चौफेर नावलौकिक वाढु लागला.वसुदेवाचा वाडाही गजबजुन गेला.देवकी रोहिणीसह त्यांच्या सर्व भार्या,अन्य पुत्र,


व मुंजी कुलगुरु गर्ग मुनींकडुन यथाशास्र वसुदेवांनी करवुन घेतले.त्यांचे उपनयन विधि झाल्यावर उज्जयिनीला काशीकर सांदीपान या प्रसिध्द गुरुगृही जाऊन वेद विद्या व धनुर्विद्येचा अभ्यास केला.त्यांची प्रखर व विलक्षण बुध्दीमत्ता पाहुन आपली सर्व विद्या त्या दोघांना दिली. दोघांनीही मन लावुन केवळ ६४ दिवसांत सर्व वेद ग्रहण केले.धनुर्वेदाचे चारी खंड आणि अखिल शस्रांचा उपयोगाचे रहस्य शिकविले.चौसष्ट दिवसांत चौसष्ट कला (विद्या) त्यांनी ग्रहण केल्यात.


राम-कृष्ण गुरुगृही असतांना इतर शिष्यांप्रमाणे हे दोघेही गुरुंची सेवा करीत गुरुसाठी रानातुन लाकडे,समिधा,कुश आणने,गाईंचे दुध काढणे, गाईंना रानांत चरावयाह नेणे अशी कामे ते मोठ्या आनंदाने करीत असे.त्या वैभवशाली राजपुत्रांची सेवा व निष्ठा पाहुन गुरु त्यांचे वर प्रसन्न झाले.बलराम श्रीकृष्णांची विद्या संपादन करुन झाल्यावर,श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, गुरुदेव!आपणाला मी कौणती गुरुदक्षिणा देऊ?शिष्योत्तमा! माझा एकुलता एक दत्त नामक पुत्र तिर्थ यात्रा करित असतां प्रभासतीर्थी एका प्रचंड मत्स्याने गिळुन टाकले.हे मधुसुदना! माझा तो पुत्र परत आणुन दे!

श्रीकृष्णाने त्यांना आश्वास्त व गुरुवंदन करुन आज्ञा घेऊन निघुन गेले.राम-कृष्ण प्रभासक्षेत्री समुद्रकाठावर पोहोचल्यावर श्रीकृष्णाने समुद्रात प्रवेश केला.तेथे काठालगत असलेल्या प्रचंड खडकाखाल च्या डोहात पंचजन नांवाचा एक महादैत्य मत्स्यरुपाने राहत होता.त्यानेच गुरुपुत्रा ला गिळले होते.कृष्णाने त्याला डोहातुन शोधुना काढुन त्याचा वध केला व गुरु पुत्राला घेऊन दोघेही सांदीपनी आश्रमी आलेत.मुनी कृतज्ञतेने भारावुन गेले. आपण शिकविलेल्या विद्येचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांना वाटले.कृष्णाने समुद्रातुन आणलेली रत्ने गुरुंना अर्पन केले. त्यांचा आशिर्वाद घेऊन मथुरेत परत आले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *