संत चोखामेळा म. चरित्र ४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  ४.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

आणि तो प्रसंग घडला.त्या प्रसंगाने चोखाचा विठ्ठलावरचा विश्वास आणखीनच दृढ झाला.म्हादा गुरव मंदिरा ची सारी व्यवस्था बघत असे.मंदिराच्या आंतली स्वच्छता,विठोबाची आंघोळ, पुजा,अभिषेक,दानपेटीत जमा झालेली रक्कम मंदिराच्या खजिन्यात जमा करणे ही कामे गेली कित्येक वर्षे नीटपणे तो करीत होता.यावर देखरेखीचे काम सहा विश्वस्तांपैकी, केसोपंत कुळकर्णी करीत. त्यादिवशी अक्रितच घडले.मंगळ वेढ्याच्या सरदाराच्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे ते सहकुटुंब दर्शनाला आले. मुलीच्या हस्ते एक चांदीची मोहोर दान पेटीत टाकली.त्यावेळी स्वतः केसोपंत कुळकर्णी हजर होते.संध्याकाळी दान पेटीत जमा झालेली दानदक्षिणा मंदिरा च्या खजिन्यात जमा करतेवेळी चांदीची मोहोर आढळली नाही.सहाजिकच आळ गुरवर आला.त्याला दोन दिवसाची मुदत देण्यात आली.म्हादा गुरव प्रामाणिक, निष्ठेने काम करणारा,त्यालाही धक्का बसला.कांही सुचेना,अन्न जाईना,झोप उडाली.डोळ्याचे पाणी खळेना.त्याची ही घायाळ अवस्था चोखोबाच्या लक्षात आल्यावर, कारण माहित झाल्यावर चोखा म्हणाला,विठोबा सर्वज्ञानी,भक्ता चा पाठीराखा आहे,त्याला साकडं घालुन सारा भार त्याचेवर सोपव.तो नक्की किटाळ दूर करेल.चोखाचे बोलणे ऐकुन, दुसरे दिवशी सकाळी मंदिराचे दैनंदिन काम करत हर श्वासागणिक विठ्ठलाचे नामस्मरण सुरु होते.केसोपंतानी दिलेली मुदत दुसर्‍या दिवशी संपणार होती.

सकाळ उजाडली,पंचमंडळी जमा झाली.म्हादाचा फैसला होता.चौकोणी आकाराच्या दानपेटीत वरच्या खाचेतुन पैसे टाकले की, पेटीचे कुलुप उघडल्या शिवाय काढणे अशक्य,शिवाय कुलुपाची किल्ली केसोपंताकडे,तेसुध्दा चार विश्वस्तासमोरच उघडत असे.एवढा सारा बंदोबस्त असतांना त्यातील चांदीची मोहोर काढणे केवळ अशक्य याची पंच मंडळींना कल्पना होती,पण दिवसभर पेटी गुरवच्या ताब्यात असल्याने नैतिक जबाबदारी त्याच्यावर येते याच मुद्यावर गुरवाला शिक्षा करावी की नाही याबद्दल आपसात चर्चा सुरु असतांनाच एक विश्वस्त दामूशेट केसोपंतांना म्हणाले, परत ती दानपेटी आमच्या समोर खोलुन पाहु या.मगच शिक्षेचे ठरवु.केसोपंतांनी पेटी उघडुन आतली नाणी ओतली पण त्यात चांदीची मोहोर नव्हती. २-३ वेळा पेटी हलवली,उलटीपालटी केली अन् खणखण आवाज करीत चांदीची मोहोर खाली पडली.

म्हादाला तर हर्षवायु व्हायचा बाकी राहिला.देवा!विठुराया या भक्ताची लाज राखलीस.देवाss विठ्ठलाss तूंच वाचवल तूच वाचवलस!म्हादा आनंदाने नाचत होता.म्हादाचे निर्दोषत्व सिध्द झाल्यावर विश्वस्त व पंचमंडळी निघुन गेली.म्हादा वर आळ घेतला म्हणुन केसोपंतानाही वाईट वाटले.म्हादाने विठोबाला साष्टांग नमस्कार घालुन वळल्यावर मंदिराच्या आवारात येणारा चोखा दिसल्याबरोबर भावनेच्या भरात शिवाशिवीचा विचारही न करतां त्याने धावत जाऊन मिठी मारली.चोखाss चोखाss तुझा विश्वास खरा ठरला.माझ्यावरचा आळ गेला. हे सगळं तुझ्यामुळे घडलं.तूच मार्ग दाखवलास.

चोखा दिड्ःमुढ झाला.गुरव निर्दौष सुटला म्हणुन आनंद व्यक्त करावा की, त्याने मिठी मारली म्हणुन भीती? शेवटी वंशपरंपरेनं भावनेवर मात केली.अहो म्हादाकाका तुम्ही मला चक्क शिवलात की हो…असु दे रे. हे समद तुझ्यामुळे झालं.माझ्यावरचं किटाळ गेलं,त्याने परत चोखोबाच्या पाठीवरुन हात फिरवला व घराची वाट धरली. चोखोबाने आवारातुनच कळसाला नमस्कार केला.विठ्ठलावरचा त्याचा विश्वास शतपटीने वाढला.नामस्मरणाने देवाला मिळवतां येते याची खात्री पटली. चोखामेळाचा आपल्यावरचा विश्वास बघुन कर कटेवर ठेवुन उभा असलेला विठ्ठल सुखावला,प्रसन्न झाला.चोखोबा त्याच्या खूप जवळ गेला अगदी ह्रदया पर्यंत.विठ्ठलालाही तेच हवं होत.चोखोबा जसा जाणतां झाला तशी त्याची श्रध्दा आणखीणच वाढली,नुसती वाढलीच नाही तर डोळस झाली.आपल्या निर्व्यसनी मुलाचा सावित्रीला मोठा अभिमान वाटे. आपलं हे पोर चारचौघां पेक्षा वेगळा आहे हे तिच्यातल्या आईने कधीच जाणलं होत.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *