ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१४९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४९

आपुलेनि रंगे येत होती ये साजणी । तंव एके वनवासी आलिंगिले गे माये ॥ बोलेना बोलों देईना । तेथें

पाहाणेंचि अवघे पारुषले गे माये ॥ आपुलें केलें कांहीं न चले वो आतां ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला देखतां ॥

अर्थ:-

हे सखी मी माझ्या नादात वनातुन येत असताना एका वनवासीने मला येऊन आलिंगन दिले. तो स्वतः ही काही बोलत नव्हता व मला ही बोलु देत नव्हता. त्याच्याकडे पाहणे ही मला जमले नाही.

अशा त्या माझ्या पित्याला रखुमाईच्या पती विठ्ठलाला पाहिले की आपले काही चालत नाही असा माझा अनुभव आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *