ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.307

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३०७

भलें बोलोनी दाविले मज । आत्मज्ञान सांगेन तुज ॥१॥
मनाचा प्रकाशु थोरु । मनेंचि ब्रह्म उजियेडु ॥
निवत्ती सेवियेला सुघडु । तेणें मज जाहाला ब्रह्माचा पाडु ॥३॥

अर्थ:-

तुला जीवब्रह्मैक्यज्ञान सांगेन असे श्रीगुरुनी अभयदान दिले. त्या प्रमाणे उपदेश केल्यामुळे ब्रह्मसाक्षात्कार झाला. विषयाचा प्रकाश करण्यामध्ये मनासारखे साधन नाही आणि याच कारणामुळे मनात ब्रह्म सहज स्वभावाने

प्रकाशित झाले माझी योग्यता नसताना ही श्रीगुरु निवृत्तीरायांनी मजवर अनुग्रह केल्यामुळे मी ब्रह्मस्वरुप झालो. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *