3 भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३.

दिवस जाऊ लागले.देवकीला पुत्र झाल्याचे कळले की, पुत्राला बाहेर आणुन कंस त्याला मारुन टाकीत,अशा प्रकारे विधात्याच्या योजनेनुसार देवकीचे सहा पुत्र,दुष्ट दुराग्रही,कोपिष्ट कंसाने जन्मतःच मारुन टाकले. वसुदेव देवकी ला जेव्हा कंसाने बंदीगृहात टाकले तेव्हा वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणीला तिच्या भावाकडे म्हणजे नंदगृही गोकुळा त पाठविले होते.देवकीचा सातवागर्भ देवाने गुप्तपणे रोहिणीच्या उदरी ठेवुन दिला.यथावकाश झालेला पुत्र म्हणजेच बलराम होय.कंसाला वाटले,आपल्या धाकानेच देवकीचा सातवा गर्भ जिरला.
देवकी आठव्यावेळी गर्भवाशी झाल्या चे कळताच कंसाने त्यांच्यावरील चौकी पहारे कडक केले.श्रावण महिन्यातील कृष्णपक्ष अष्टमी बुधवारला देवाने अवतार घेतला.


मागील जन्मी वसुदेव देवकीने आपल्यापोटी परमेश्वराने अवतार घ्यावा म्हणुन घोर तपश्चर्या केली होती.त्यांना सत्यता पटावी म्हणुन जन्मल्याबरोबर किरीट कुंडलादी अलंकारासहित शंख,चक्र,गदा,पद्मधारी चतुर्भुज बालमुर्तीच्या रुपाने परमेश्वर त्यांच्यापुढे प्रगटले.हर्षभराने दोघांनीही मनोभावे हात जोडले व पुढील भितीने त्यांचे ह्रदय थरारले.हे जाणुन परमेश्वर म्हणाले, बाबा! क्षणाचाही विलंब न लावतां मला गोकुळात नेऊन तिथे नुकतीच यशोदेमाताच्या पोटी जन्मलेली कन्या घेऊन लगेच परत या.

परमेश्वर परत बालरुपात आले,आणि वसुदेवाच्या पायांतील बेड्या आपोआप तुटल्या.बंदी शाळेचे दारं उघडल्या गेले.कंसासहित सर्व द्वार रक्षक मायेने झोपी गेलेत. आणि बाळाला कापडात गुंडाळून यमुनातीरी पोहोचला.बाहेर धो धो पाऊस पडत होता यमुना भयंकर पुराने दुथडी वाहत होती. येवढ्या महाभयंकर पुरातुन यमुनापार कसे जावे या विचारात वसुदेव असतांना प्रभुने आपले पाय हळुच बाहेर काढुन यमुनेला स्पर्श केल्याबरोबर तीने वाट मोकळी करुन दिली.

त्यानंतर निर्विघ्नपणे वसुदेवांने नंदा च्या घरात प्रवेश केला.यशोदा नुकतीच बाळंत झालेली,देवाने आपल्या मायेने सर्वांना गुंगवुन ठेवल्याने,यशोदेला झालेले बाळ पुत्र कि, कन्या? हे कोणाला समजु शकले नाही.प्रभुच्या सुचनेनुसार वसुदेवाने बाळाला यशोदेच्या कुशीत निजवले व तिची कन्या घेऊन लगेच बंदी शाळेत पोहचल्याबरोबर, त्याच्या पायात बेड्या पडल्यात,दाराची कुलपे पुर्ववत लागलीत.इतक्यात ती कन्या मोठ्याने रडु लागल्यामुळे,कंसासहित सर्वजण खडबडुन जागे झालेत.कंस आत येऊन मुलीला उचलले व आता तो शिळेवर आपटणार येवढ्यात ती योगमाया त्याच्या हातुन निसटुन आकाशमार्गे जातां ना विजेसारखी कडाडली, कंसा! तुझा वैरी गोकुळात आहे असं म्हणुन अदृष्य झाली.

इकडे यशोदेला जाग आल्यावर आपल्या पायाचे अंगुष्ट तोंडात घालुन निजानंदात निमग्न होऊन हसत बालरुपा त निजलेला पुराण पुरुष तिच्या दृष्टीस पडल्याबरोबर तिला अपार आनंद झाला, देहभान विसरुनच गेली.इकडे कंस दिवसागणिक अस्वस्थ होऊन त्याची झोप उडाली.देवकीचा आठवा पुत्र,माझा काळ,मृत्यु? याच विचाराने त्याला एक एक दिवस वर्षासारखा दीर्घ वाटु लागला.योगमायेच्या वाणीने त्याला पश्चाताप होऊन,बंदीशाळेतील वसुदेव देवकीची मुक्तता केली.पृथ्वीवर मातले ल्या असुरांचा संहार करण्यासाठी भगवान विष्णुंनी मानव रुपात जन्म घेऊन गोकुळात नंदाघरी आपल्या बाल लिलांनी आनंदित करु लागला.यशोदेला तर त्याच्या बाललिलांत दिवस कधी उजा डतो व मावळतो हेही कळेनासे झाले.

मथुरेचा कंसला गोकुळचा करभार देण्यासाठी पुत्राला घेऊन नंद व यशोदा मथुरेकडे निघालेत.मथुरेला पोहोचल्यावर नंदाने वसुदेवाची गळाभेट झाल्यावर वसु देव म्हणाला,नंदा! करभार भरुन तात्काळ पुत्राला घेऊन निघुन जा!मित्रा.. पुत्राला जिवापाड सांभाळ. इतर मंडळी सह नंद मार्गस्थ झाला.

गोकुळात यशोदापुत्र व रोहिणीपुत्र कलेकलेने वाढत होते.दोघांच्या बाल लिलांत व त्यांना वाढविण्यात नंद यशोदे चा वेळ मोठ्या आनंदात जात होता.अशा
तच एके दिवशी मथुरेहुन यादवांचे आचार्य अतिद्रींय प्राप्त ज्ञान,ज्योतीष्य शास्र पारंगत अशा गर्गमुनींचे नंदाघरी आगमण झाले.त्यांचे यथोचित स्वागत व पुजन झाल्यावर,नम्रपणे येण्याचे प्रयोजन विचारले असतां,आपण वसुदेवा च्या सांगण्यानुसार आलोय!

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *