ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१०२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०२

ज्याचेनि तेजें तेजेस रविग्रह । त्याचेनि मोह निरसति ॥ तें नाम परिकर कृष्णचि सुंदर । वैकुंठीचे घर आम्ही केलें ॥

जपतां नाम स्मरतां पै हरि हरि । प्रपंच बोहरी कृष्णनामें ॥ निवृत्ति सांगे ज्ञाना कृष्णचि नयना । सर्वीसर्वत्र पान्हा कृष्णरूपें ॥

 अर्थ:-

 ज्याच्या तेजाने सुर्य चंद्र प्रकाशित होतात त्याच्या नामस्मरणांने मोहाचा निरास होतो.तेच पावन नाम घेत घेत आम्ही त्या वैकुंठालाच आमचे घर बनवले.त्या कृष्णनामाचा जप करत

आम्ही प्रपंचाचा निरास केला. निवृत्तिनाथ सांगतात ज्ञाना त्या कृष्णाची नजर पडली की त्या कृष्णनामाचा प्रेमपान्हा सर्वत्र जाणवतो. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *