ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.200

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २००

अरे मना तूं पापिष्ठा । किती हिंडसी रे नष्टा । सैरा सिणसी रे फुकटा । विठ्ठलविनटा स्थिर होई ॥ येणें पैलपार पावसी । तें अनिवार नावरसी । तुझेनि संगे नाडले ऋषी ।

तुं तंव अपभंश पाडिशी । म्हणोनि गुरूसी गेले शरण ॥ न सोडी हरिचरण । नाही नाही जन्ममरण । अविट सेवी नारायण । तेणे मीतूंपण एक रसी । ज्ञानदेव शरण हरि । मन हिंडे चराचरी । न सोडी चरण अभ्यंतरी । नित्य श्रीहरि हृदयी वसे ॥

अर्थ:-

हे पापी मना नष्टासारखा किती हिंडतोस व फुकट का शिणतोस त्यापेक्षा विठ्ठल चरणी स्थिर हो त्यामुळे तू पैलतीराला पोचशील. हे न आवरणाऱ्या मना तुझ्या संगाने ऋषी नाडले तू त्यांना भ्रमीत केलेस म्हणून ते गुरुला शरण गेले.

या हरीचरणामुळे तुला जन्ममरण नाही.या नारायण नामाच्या अवीट सेवेने मीतू पणा सोडून एकरुप होशील.मी हरिला शरण जाऊन त्याची नित्य ह्रदयात स्थापना केली. व श्रीगुरू चरण जोडल्यामुळे चराचरात फिरणारे मन आवरले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *