ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.६१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६१

भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥

सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥

अर्थ:-
बळाविण शक्तीची बतावणी करु नये तसेच भावाविण भक्ती नाही. व भक्तीवीण मुक्ती नाही. हरिनाम भक्ती केली नाही तर तो देव कसा बरे प्रसन्न होईल? तेंव्हा जीवा नामपाठ करत निवांत रहा. रोज करत

असलेला प्रपंच प्रचंड सायास करुन करत असतोस पण हरिभजनाला का विन्मुख होतोस? ह्या प्रपंचाचे धरणे उठवायचे असेल तर फक्त हरिनामपाठ कर असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *