2 भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

*श्रीकृष्ण*  *भाग – २.*

कंसाचा जुलमी कारभार सुरु झाला.सगळे दबकुन वचकुन त्याची आज्ञा पाळत, तरी सुध्दा मनांतुन कंस अस्वस्थ होता.कारण वासुदेव त्याच्या पित्याचा जिवलग मित्र,सर्व सरदारांचा प्रमुख,यादवांचा अधिपती असुन आपल्या सौजन्यशील वागणुकीने तो प्रजेचा प्रिय होता.उद्या आपल्याविरुध्द कट करुन पित्याला कैदेतुन मुक्त करण्या चा प्रयत्न केला तर? सगळे यादव बंड करुन आपल्या विरोधात जाऊन आपल्याला पदच्युत करेल. यासाठी त्याचे प्रेम संपादन करुन खुष ठेवणे भाग आहे.

त्यासाठी देवकाची मुलगी,कंसा ची चुलत बहिण देवकी जी दिसायला अतिसुंदर आहे.तिच्या बाकीच्या बहिणीं चा विवाह आधीच वासुदेवाशी झालेला होता.देवकीचाही विवाह वसुदेवाशी करुन स्नेह जोडावा, हा विचार वसुदेवास सांगीतल्यावर त्याने स्विकार केला,आणि आपण एक शत्रु कायमचा दाबुन टाकला म्हणुन कंस मनोमन सुखावला.

वसुदेव-देवकीचा विवाह अत्यंत थाटात पार पडला.सालंकृत देवकी सोबत भरपुर धन, जडजवाहर, दास दासी सहित सजविलेल्या सुवर्ण रथात बसलेल्या देवकीच्या रथाचे सारथ्य करण्यास स्वतः  कंस बसला हे पाहुन प्रजेचे मन त्याच्या विषयी अनुकुल झाले.आणि कंस निश्चिंत व निर्भय झाला.देवकीने वसुदेवाच्या घराच्या उंबरठ्याचे माप ओलांडुन प्रवेश केला.

दुसरे दिवशी कंस राजसभेत जाण्यास तयार होत असतांना, सेवकाने नारदमुनी आल्याचा निरोप दिल्याने,कंस नारदाच्या भेटीस गेला. नारदमुनी नित्य स्वर्ग,पृथ्वी,पाताळ लोकी भ्रमण करीत असे.कितीही गुप्त गोष्ट असो ती फोडण्यात हातखंडा असल्यामुळे त्यांना कळलाव्या म्हणत! वास्तविक त्यांची गणना महर्षित असुन ज्ञाता,गायनात निपुन,वीणा तर त्यांचा अविभाज्य अंग, अशा या नारदांना कलागती लावण्याची फार आवड. आज अचानक नारद कां बरं आले असेल? आपण वसुदेवाशी सबंध जोडुन यादवांशी सख्य केलय, आणि हे कसली कलागत लावणार? असा विचार करीत नारदांना विनम्र अभि वादन करुन सेवकाने आणलेल्या साहित्याने यथाविधी पुजन करुन त्यांना वंदन केले.

नारद म्हणाले,वसुदेवाचा जन्म झाला तेव्हा स्वर्गात पडघम व दुंदुभी वाजुन त्याचेवर पुष्पवृष्टी झाली होती.तो एवढा देखणा व कांतीमान पुरुष की, इंद्रा ला सुध्दा हेवा वाटावा.खरं आहे मुनिवर्य! वसुदेवाचे कुणाशीही शत्रुत्व नाही आणि या विवाहाने तर तो माझा घनिष्ट मित्र बनला आहे.तू माझे विधिवत पुजन केल्याने मी तुझ्यावर संतुष्ट झाल्याने तुझ्या हिताच्या कांही गुप्त गोष्टी सांगतोय मी भ्रमण करीत असतां तिथे समस्त देवगण ब्रम्हदेवा सह जमलेले असुन तुझ्यासंबंधी गुप्त खलबतं सुरु होती ते तुझ्या अनुचरा सह वधाचा! कालच वसुदेवाशी देवकीचा विवाह झाला,तिच्या पोटी जो आठवा गर्भ राहिल तो तुझा काळ ठरणार आहे.मुनिवर्य! आठवा गर्भ? माझा काळ होणार?थांब भोज राजा! हा आठवा गर्भ सामान्य नाही.तो सर्व देवांचा व स्वर्गाचा मुख्य आधार,देवां ना स्वर्ग किंवा मोक्ष देणारा असेल तरी तूं सावध रहा….यावर उपाय सांगतो…. देवकीचा प्रत्येक गर्भ नष्ट केल्यास कदाचित तुझ्यावरील अरिष्ट टळेल. असे सांगुन महर्षी नारद निघुन गेले.

राजवाड्यात येऊन खास विश्वासातील मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावुन नारदांनी सांगीतले कथन व उपाय सांगुन म्हणाला देवकीचे पुत्र मारण्या पेक्षा सरळ मुळावरच घाव घालुन देवकीचाच वध करतो,मंत्री म्हणाले, महाराज असा अविचार नका करु. कनिष्ठ भगिनी कन्ये प्रमाणे असते. तेवढ्यात सेवकाने येऊन, वसुदेव- देवकी गोवर्धनला जाण्यापुर्वी आपल्या भेटीस येत असल्याचे सांगीत ल्यावर स्वतः कंसच त्यांना भेटीस गेला.

वसुदेवाला म्हणाला,गोवर्धनला जाण्याचा बेत रद्द कर, मला महत्वाचे गुप्त बोलायचे आहे.दालनांत तिघेही बसल्या वर कंसाने नारदांचे म्हणने कथन केल्या वर,वसुदेवाने त्यांना होणारा प्रत्येक पुत्र त्याच्या स्वाधीन करण्याचे अभिवचन दिल्यावरही कंसाने मथुरेच्या वाड्यात चौकी पहार्‍यात वसुदेव देवकीला बंदी केले.त्यांचा बाहेरचा संपर्क तोडुन टाकला  विष्णुभक्त वसुदेव खचुन न जातां विष्णु भक्तीत लीन होऊन शांतपणे सर्व अन्याय सहन करीत दिवस कंठु लागले.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *