भाग 1
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज पासुन सप्ताहातील दोन दिवस (सोम व शुक्रवार) वाल्मिकी रामायणातले संस्कृती दर्शन माझ्या अल्पज्ञानाने आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.रामायण व भागवत,इतिहास व राजकारण या विषयांचे गाढे अभ्यासक व कट्टर हिंदुत्वनिष्ठ व धर्मप्रिय डॉ.सच्चिदानंद शेवडे गुरुजींनी केलेल्या आज्ञेस अनुसरुन मी हा लेखन प्रपंच मांडत आहे. श्रीमद् वाल्मिकी रामायणतल्या
अयोध्या कांडापासुन आरंभ करणार आहे.
प्रथम सर्गात रामचंद्रांच्या गुणांचे वर्णन आलेय व दशरथराजाला श्रीरामचंद्र हे युवराज पदाकरता का योग्य वाटताहेत याचे वर्णन आलेय.
भरत या समयी आपल्या मामाकडे गेलाय व सोबत शत्रुघ्नाला प्रेमाने घेवुन गेलाय हे आपणास माहित आहे.
स तत्र न्यवसद् भ्रात्रा सह सत्कार सत्कृत:।
मातुलेनाश्वपतिना पुत्रस्नेहेन लालित:।। (2)
भरताचा मामा जो युधाजित् नावाचा आहे व अश्वदऴाचा अधिपती आहे तो या दोघांवर भरत व शत्रुघ्नावर पुत्रापेक्षा अधिक माया करत होता तो या दोघांचा उत्तम आदरसत्कार करुन त्यांचे लाड करत होता.
आज देखील शाऴेला सुटि पडली कि मुले मामाच्या गावाला जाण्याचा हट्ट धरतात व आनंदाने आजोऴी जातात.मामा हा भाचवंडांना अधिक जवऴचा असतो लहानपणी जवऴपास सर्वांनीच “मामाच्या गावाला जाउया “हे गाण गुणगुणले असते व अनुभवलेले जास्त असते.बर या वरच्या श्लोकात मामाचे वर्णन अश्वपतिना म्हणजे घोडदऴाचा मुख्य असे आहे.तरुण मंडऴींना घोडेस्वारीचे आकर्षण असणे हा स्वभावच आहे बर यातुन मामा हा या विभागाचा मुख्य मग काय विचारता .
रामायणात देखील मामाकडे आराम करणे व सुटि अनुभवण्या करता जाण्याची पध्दत होती. आजहि आपण ती परंपरा जपतोय हेच आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.सत्ययुगापासुन कलीयुगापर्यंत हि परंपरा अखंडित चालु आहे हेच आपले वैभव आहे.
दुसराहि त्यात एक हेतु होता राज्यकर्त्याला “घोडदऴ “हे आवश्यकच असते मामा जर या विषयातला तज्ज्ञ आहे तर त्याचाकडुन अश्वांसंबधींची माहिती पण मिऴेल सुटि पण होईल व अभ्यास पण होईल.
श्रैष्ठ्यं चास्त्रसमूहेषु प्राप्तो व्यामिश्रकेषु च ।
अर्थ धर्मौ च संगृह्य सुखतन्त्रो न चालस:।। (27)
रामचंद्रांनी सर्व प्रकारच्या अस्त्रसमुहांचा तसच संस्कृत व प्राकृत अश्या मिश्र भाषांमधील नाटके वगैरेत निपूणता प्राप्त केली होती
धर्म व अर्थ व काम या तिन्हि पुरुषार्थांचे योग्य सेवन रामचंद्र करत होते पण आळसाला मात्र त्यांचा जवऴ थारा देत नव्हते.
श्रीराम हे शस्त्र पारंगत होते हे सर्वांनाच ज्ञात आहे परंतु ते संस्कृत व प्राकृत (लोकभाषांचे) देखील ज्ञाते होते व नाट्य क्षेत्रात त्यांनी निपूणता प्राप्त केली होती हे वैशिष्ट्य रामांचे आहे.
महाभारतात अर्जुन हा देखील नृत्यकलेत पारंगत होता (बृहन्नडेचे रुप अज्ञातवासात धारण करुन त्याने उत्तरेला या गोष्टि शिकवल्या होत्या)
आज अनेक राष्ट्रातले राज्यकर्ते हे नाट्य कला क्षेत्रात विशेष रुची ठेवुन असतात. छ.संभाजीराजे हे देखील काव्य शास्त्र नाट्य निपूण असे होते.शिवसेनेतले जुन्या फऴीतले कै.दत्ताजी साऴवींसारखे नेते हे नाट्य कलेचे भोक्ते होते त्यांनी काहि नाटकात काम देखील केली होती अस वाचनात आहे.स्वा.सावरकर हे जसे द्रष्टे राजकारणी होते तसेच उत्तम भाषातज्ज्ञ होते उत्तम साहित्यिक होते कवी होते नाटककार होते.
आजहि आपल्याकडे अशी उदारणे आहेत विस्तारभयास्तव देत नाहिये.आजहि राज्यसभेत या क्षेत्रातल्या तज्ज्ञमंडऴींचा समावेश सन्मानाने केला जातो.
रामचंद्रांपासुन किंवा त्याहि आधीपासुन राज्यकर्ते किंवा राजकारणी हे कलासक्त आहेत कलेला प्रोत्साहन देणारे राहिलेत हिच आपली परंपरा राहिलीय संस्कृती राहिलीय जी रामायणापासुन अखंड चालु आहे.
काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम् ।
व्यसनेन तु मुर्खाणां निद्रया कलहेन वा ।।
एक सुंदर सुभाषित आहे.
बुध्दिमान मंडऴींचा काऴ हा काव्य शास्त्र विनोदात जातो परंतु मूर्ख मंडऴी व्यसन किंवा झोपेत अथवा भांडणात आपला वेऴ घालवतात.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले