ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१४५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

.  ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४५

हरि आला रे हरि आला रे । संतसंगे ब्रह्मांनंदु जाल रे ॥ हरि येथें रे हरि तेथे रे । हरिवांचूनि न दिसे रिते रे ॥ हरि पाहीं रे हरि ध्यांई रे । हरिवांचूनि दुजें नाहीं ॥ हरि वाचे रे हरि नाचे रे ॥

हरि पाहात आनंदु साचे रे ॥ हरि आदीं रे हरि अंती रे । हरि व्यापकु सर्वांभूती रे । हरि जाणारे हरि वाना रे । बापरखुमादेविवरू राणा रे ॥

अर्थ:-

तो हरि अंतरबाह्य स्वरुपात आमच्यात आला. त्यामुळे संतसंग मिळाला व ब्रह्मानंद झाला. हा हरि सर्वत्र आहे जिकडे तिकडे तोच आहे त्याच्याहुन रिते काही नाही. त्या हरिला तुम्ही पहा व त्याचे ध्यान करा त्यावाचुन दुसरे जगतात काही नाही.

हरिनाम वाचेने घ्या नाचत घ्या जो आनंद होईल तोच हरि आहे. तोच हरि आदि आहे व अंती ही आहे तोच सर्वत्र सर्वाभूती व्यापक आहे. त्याच हरिला जाणा त्याचेच वर्णन करा तो हरि जे माझे पिता व रखुमाईचे पती आहेत तेच ह्या जगताचे राजे आहेत असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *