ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.220

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २२० 

उपजलें देह बाळपणें गेलें । तुझे तुजचि देखतां तारुण्यपण मत्सरें आटिलें । आतां वृद्धपणी कायिसी अंगवणी रया ॥ कवण्यागुणे चुकी साठी पडली ।

कासया भ्रमलेंसी गव्हारा । सिद्धचि सांडुनि आनेआन जल्पसी । तरी न चुकती तुझ्या येरझारा रया ॥ अजागळाचे अजस्तन ।

तेथे कैचे अमृतपान । तैसे काय करिसी वाउगे चिंतन । पदपिंडा जागृति कारण । तरी तयांचिये चरणी स्थिर ठेवी मन रया ॥

जीवनजळी ब्रह्मकमळ विकासलें । आतां पाहे पां तयाचा मेळु रे । ऐसी जीव चिंता तुजवाचुनियां । कवण करील आमुचा सांभाळ रया ॥

जीवनजळीं ब्रह्मकमळ विवळे । तैसे वाट पाहातां सिणले माझे डोळे ॥ नको नागवे हा संसार । नको नागवे हा संसार ।

तू तंव निवांत निराळा रया ॥ ऐसा जगाचा जीवनु अमूर्त मूर्ति लेईला डोळां । बापरखुमादेविवरा विठ्ठलावांचूनि । कोण पुरविल सोहळा रया ॥

अर्थ:-

जेंव्हा जन्मलास ते बाळपण होते.मत्सराबरोबर तरुणपण आले. पण आता वृध्दापणात कसला माज दाखवत आहेस. कोणत्या गुणाच्या चुकी मुळे हे गांवढळा असा भ्रमित झालास.

तु आत्मरुप असुन त्याला ओळखत नाहीस व इतर जप करतोस तेंव्हा तुझ्या जन्ममरणाच्या खेपा चुकायच्या नाहीत. शेळीच्या गळास्थनात कोठले दुध असणार? त्यामुळे वाऊगे चिंतन न करता

आत्मरुपाच्या चरणी स्थिर हो. ह्या जीवनरुपी पाण्यात ते आत्मब्रह्म कमळ उगवले आहे. त्याचा सांभाळ कोण करील हा विचार हे जीवा कर. जीवनरुपी पाण्यात आत्मब्रह्मरुप कमळ विकसन पावेल ह्याची वाट पाहत

माझे डोळे शिणले. ह्या उघड्या नागड्या संसारापासुन तु निवांत निराळा रहा. असा जगाचे जीवन असणारा निर्गुण असणारा हा परमात्मा डोळ्यानी सगुण रुपात पाहिला. हे सर्व माझे पिता व रखुमाईचे पती विठ्ठलाशिवाय हा सोहळा कोण पुरवणार असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *