२२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २२.

बलराम-कृष्ण स्वतःच्या इच्छेनुसार वेगवेगळी रुपे घेऊन दक्षिण दिशेच्या अनुराधाने मार्गक्रमण करीत असतां त्यांना मार्गात अनेक राष्र्टे लागली थोड्याच अवकाशांत ते सह्याद्रीच्या सानि ध्यात सुशोभित दिसणार्‍या यदुवंशीय अलंकृत ‘करवीर’ नगराजवळ येऊन पोहचले.तेथे वेणा नदीच्या तिरावर जुनाट व प्रचंड विस्तारलेल्या वटवृक्षाखाली एक तेजःपुंज भार्गवराम,खांद्यावर परशु व अंगावर वल्कले धारण केलेले गौरवर्णीय तेजाने प्रतिसूर्यच! ज्याने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली होती ते आद्यवेद गुरु बसले होते.राम-कृष्णांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवुन हात जोडीत श्रीकृष्ण म्हणाला, भगवान!

आपण जगमदाग्नि पुत्र भार्गवराम,सर्व ऋषींमधे अग्रगण्य असुन केवळ एका बाणाने समुद्रसीमा हटवुन पश्चिम समुद्राच्या तिरावर सह्यांद्री च्या निबिड अरण्यात एक थोरला अति रम्य असा एक देशच निर्माण केला.पित्या च्या वधाचा सूड घेण्यासाठी कार्तवीर्य सहस्रार्जुनाचे बाहु आपल्या परशुने छाटुन टाकले.असे आपण परशुराम आहांत. यावर किंचित हसुन परशुराम म्हणाले, सर्वशक्तीमान कृष्णा!मथुरातील इंतभूत वार्ता मला ज्ञात आहे.त्यामुळे तुमच्याशी सल्ला मसलत करण्यासाठी सगळे शिष्य पुढे पाठवुन पश्चिम समुद्रतीरावरुन नुकताच येऊन तुमची वाट पाहत बसलो आहे.हे कमलनयना! गोकुळातील १६ वर्षाचे वास्तव्य,तिथल्या तुझ्या लीला, मथुरेतील कंसाचा व इतर दानवांचा केलेला वध हे सर्व मी जाणतो.


पुरुषोत्तमा!तुझा व बलरामाचा जरासंधाशी असलेला विरोध जाणुनच मी इथे आलो आहे.कृष्णा! तूं जगताचा प्रभु व पालक असुन देवकार्यार्थ पृथ्वीवर अवतारला आहेस.वासुदेवा!त्रिभुवनांतील तुला माहित नाही अशी एकही गोष्ट नाही. तरी मी भक्तिभावाने जे सांगतौ ते ऐक…
गोविंदा! पुरातनकाळी तुझ्याच पुर्वजांनी हे करवीरपुर व भोवतालचे राष्र्ट बसविले होते,पण शुगाल नामक राजाने सर्वांना मारुन राज्य बळकावले.तो अत्यंत रागीट,गर्विष्ठ,संयमरहित असल्या ने इथे न थांबता,वेणा नदी पलिकडे यज्ञगिरी नावाचे सह्याद्रीचे शिखर आहे तिथं आजची रात्र मुक्काम करुन उद्या खटवांग नदीचा धबधबा पाहु.तिथुन जवळच असलेल्या तपोवनातील ऋषींचे दर्शन घेऊन पुढे जाऊ या!जातां जातां तुझ्याच कुळातील महाकपी नामक मोठा धार्मिक राजा,त्याची प्रजा वानर असली तरी सुखी व संपन्न असलेल्या क्रौंचपुरला भेट देऊन पुढे आनहुड तिर्थावर जाऊन विश्रांती घेऊ या.दुसरे दिवशी त्यांनी अनेक शिखरे असलेला,प्रति मेरुच दिसत असलेला गोमंत पर्वत गाठला.


परशुराम पुढे म्हणाले,या गोमंत शिखराचा आश्रय घेऊन तुम्ही निकराने युध्द केले की,जरासंध गर्भगळीत होईल, आणि दुर्गयुध्दाच्या पध्दतीने जरासंधाला जिंकाल.त्यासाठी थोड्याच अवधीत आयुधेही प्राप्त होतील.कृष्णा! अरे इथे यादव व तुम्ही उभय भ्रात्यांबरोबर जरासंधादी राजांचे घनघोर युध्द होईल असा मला दैवी संकेत मिळाला आहे. माधवा!या संग्रामासाठी चक्र,कौमोदकी, गदा,सौनंदमुशल ही विष्णुंची चार आयुधे प्रगट होऊन भिषण संग्राम होईल.कृष्णा! हा संग्राम ‘चक्रमुशल’ संग्राम नांवाने प्रसिध्द होईल.वासुदेवा!परमेश्वरी संकेता ने व कृतांत काळाच्या आज्ञेने घडुन येणार असल्याने या संग्रामाला “काळाचे आदेश” असेही नांव प्राप्त होईल.कृष्णा! या संग्रामात तुझे मुळरुप (विष्णु)सर्वांच्या दृष्टीस पडेल.कृष्णा! जिथे ही आयुधे प्राप्त होतील ते ठीकाण इथुन जाण्यापुर्वी मी दाखवुन देईन.कृष्णा!मला जे सांगाय चे होते व ज्यासाठी मी एकटाच तुमच्या साठी थांबलो होतो,ते कार्य संपले.


कृष्णा!तू अजय असल्यामुळे कोणीही लढण्यास आले तरी जय तुमचा च आहे.एवढे बोलुन शूर्पारक नगरात दोघांनाही आशिर्वाद देऊन रवाना झाले.
परशुराम गेल्यावर राम-कृष्णांनी राहण्यासाठी आश्रमवजा झोपडी बांधुन मोठ्या आनंदाने राहु लागले.दिवस आनं दात घालवत,भाकित केल्याप्रमाणे जरासंधाची वाट पाहु लागले.आणि एके दिवशी जरासंध अफाट सैन्यासह येतांना त्यांना दिसले.
बलराम-कृष्ण रहायला आल्यावर, तिथे वस्तीला असलेले वनचर त्यांचे विश्वासु भक्त,सेवक बनले.त्यातल्या कांहीना खाली जरासंधाच्या गोटात मिसळुन तेथील इतंभुत माहिती काढुन आणायला पाठविले.दोघे विचार विनिमय करीत असतांना खाली गेलेले हेर परत येऊन जरासंधाचा बेत कथन केला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *