१५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – १५.

रथ वेगाने चालला होता.मागाहुन नंद व इतर गोपांच्या गाड्या येत होत्या. वृंदावन मागे पडले.मार्गाच्या बाजुने यमुना नदी संथपणे वाहत होती.मागच्या गाड्या येईपर्यंत या पवित्र नदीत हातपाय धुवुन थोडं पाणी प्राशन करण्यासाठी अक्रुराला रथ थांबवायला सांगीतला. सकाळी घाईत निघाल्यामुळे अक्रुराचे स्नानसंध्या राहिल्यामुळे स्नानसंध्या करण्याची इच्छा झाल्याने बलराम कृष्णा ला जपुन राहयला सांगुन त्याने नदीत बुडी मारल्याबरोबर त्याला पाण्यात बलराम कृष्ण दिसु लागले,काय चमत्कार वर येऊन पाहतो तर ते दोघेही रथात बस लेले,त्याने परत बुडी मारली तर ,पुन्हा ते दोघेही पाण्यात,वर येऊन पाहिले तर रथा त दोघेही गप्पात रंगलेले दिसले.हा काय चमत्कार?रथात बसलेल्याची खात्री करुन परत बुडी मारली तर यावेळी प्रत्यक्ष भगवान श्रीशेषशायी नारायण त्याच्यासमोर उभे दिसले.सिध्द,चारण, गंधर्व,असुर स्तुती करत आहेत.

प्रचंड शेष वेटोळे घालुन बसलेला,सहस्र,शिखराचा कैलास पर्वतासारखा पांढराशुभ्र दिसत होता.त्याच्या मध्यभागी शेषशायी भगवान पिवळे रेशमी वस्र परिधान केलेले,हातात शंख,चक्र,गदा,अंगावरील आभुषणे चकाकत होती.अशा भगवंताचे दर्शन होताच अक्रुराचे ह्रदय भक्तीरसाने उचंबळून सास्तिक भाव जागृत होऊन कंठ दाटुन आल्याने डोळे मिटुन तो नत मस्तक झाला.क्षणभराने डोळे उघडुन पाहतो तो काय? समोरचे दृष्य लुप्त झाले.वर आल्यावर श्रीकृष्णाची लीला समजुन म्हणाला, देवा! पृथ्वी,आकाश, जल सर्व ठीकाणी तुझेच वास्तव्य आहे.


एवढ्यात मागच्या गाड्या आल्यात. अक्रुराचा रथ चालु लागला.रथ मथुरेत पोहचल्यावर अक्रुराने त्यांना आपल्या घरी उतरण्याची विनंती केल्यावर श्रीकृष्ण म्हणाला,पुढे नक्की येऊ!सध्या या सगळ्या गोपांसह गावाबाहेरच्या उद्यानात उतरतो,तूं कंसाला आम्ही आल्याची वर्दी दे.सर्व गोपांबरोबर नंद, कृष्ण बलरामाने बगीच्यात सोबत आणलेली न्याहारी करुन निवडक गोप मल्लासह राम-कृष्ण मथुरा नगरीचा फेर फटका मारायला निघाले.मथुरेचे सौंदर्य पाहत,कृष्णाच्या मनात विचार आले याच मथुरेत माझा जन्म झाला,माझे मातापिता इथेच बंदीवासात व आतां अज्ञातवासात आहेत.कंसाच्या जुलमामुळे अनेक क्षत्रिय त्रस्त झाले,तर कित्येक नगर सोडुन देशोधडीला लागले.ही सर्व माहिती अक्रुराकडुन त्याला कळली होती,त्यामुळे त्याचे मन दुःखी व संतप्त झाले.

आतां या सर्वांची कंसाच्या जाचातुन लवकरच सुटका करण्याचा मनोमन निश्चय केला. नंतर ते सर्वजण धनुर्मखासाठी उभारले ल्या प्रेक्षागार व राजवाड्याकडे निघाले. बाजारपेठेत खास राजासाठी रंगवलेली बहुमोल रेशमी वस्र पाहुन बलराम कृष्णा ने दुकानदारास ती सुंदर वस्रे मागीतल्या वर दुकानदाराने त्यांची निर्भत्सना करुन वस्र देण्याचे नाकारल्यावर,संतापलेल्या श्रीकृष्णाने आपल्या वज्रासारख्या हाता च्या एका तडाख्यातच तो गतप्राण झाला मग तिथली निवडक वस्रे परिधान करुन मदमस्त हत्तीसारखे डुलत डुलत दोघेही फुलांच्या दुकानांत गेल्यावर,माळ्याने या दोन सुंदर कुमारांना पाहुन आनंदाने व आदराने सुंदर फुलांचा भरगच्च हार दिले. त्याला आशिर्वाद देऊन ते पुढे निघाले.


तेवढ्यात राजा कंसाची आवडती दासी कुब्जा अनुलेपन पात्र घेऊन जातां ना दिसल्यावर कुठे जातेस म्हणुन कृष्णा ने विचारल्यावर,कंसाकडे अनुलेपन घेऊन जात होती,पण आतां तुच घे!तुझ्या सौंदर्याला व देहाला शोभुन दिसेल. कुब्जेच्या हातची उटी घेतली व आपल्या बोटाचा स्पर्श तिच्या पोक आलेल्या पाठी ला हलकेच स्पर्श केल्या बरोबर,काय आश्चर्य? तिचे कुबड नाहीसे होऊन तिचा देह अत्यंत कमनिय दिसु लागला. तिला आशिर्वाद देऊन उद्या होऊ घातले ल्या धनुष्ययज्ञाची जागा,जिथे जगविख्या त धनुष्य ठेवले होते ते पहायला गेले.

इंद्रा दीधेवांची देखील तो प्रचंड स्तंभासारखा अवजड धनुष्य सज्ज करण्याची प्राज्ञा नव्हती.ते अवजड धनुष्य श्रीकृष्णाने सहजलिलेने वर उचलुन वाटेल तसे फिरवुन जोराने वाकवल्या बरोबर ते जग विख्यात धनुष्य मधोमध मोडुन त्याचे दोन तुकडे झाले.हा अद्भुत प्रकार पाहुन तिथे जमलेले लोक आश्चर्यचकित झाले. श्रीकृष्णाची दीव्य मूर्ती लोकांच्या डोळ्या चे पारण फिटले.गर्दीतुन वाट काढत श्रीकृष्ण बलराम आपल्या गोपसख्यांसह प्रेक्षागाराकडे निघाले.इकडे प्रमुख शस्ररक्षक ते अवजड धनुष्य मोडल्याची खबर देण्यासाठी धावत कंसाकडे गेला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती


संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *