संत सोपानदेव चरित्र ९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – ९

अनुक्रमणिका


सोपान,मुक्ताईच्या रडण्याचा आवाज ऐकुन पाण्याला जाणार्‍या कावेरीआक्का मागचा पुढचा विचार न करतां गडबडीने झोपडीत शिरल्या व समोरचे दृष्य पाहुन हसावं की रडावं हेच त्यांना कळेना.सोपानांच्या हातात केस अडकलेली तुटकी फणी,आणि मुक्ताचे मोकळे वेडेवाकडे विंचरलेले केस हे दृष्य पाहुन सारा प्रकार लक्षात आला.आणि मायेचा उमाळा येऊन त्या दोन अश्राप जीवांना पोटाशी धरुन निःशब्दपणे दोघां च्याही पाठीवरुन हात फिरवु लागल्याने दोघांनाही आणखीनच रडायला आले. थोड्यावेळाने मुक्ताने सोपानाची तक्रार केली.कावेरीआक्काने हलक्या हाताने गुंता काढुन मुक्ताची छानशी वेणी घालुन दिली.तेवढ्यात निवृत्ती-ज्ञानदेव आलेत. ज्ञानदेव हात जोडुन आक्कांना म्हणाले, आक्का तुमची माया आम्हाला कळते पण,आईबाबांनी प्रायश्चित घेऊनसुध्दा धर्मसभेने आमच्यावरचा बहीष्कार अजुन काढला नाही.तुमची आमच्या वरची माया धर्मसभेला मान्य झाली नाही तर?त्यांचा रोष होऊन तुम्हालाही शिक्षा झाली तर?दुरुन का होईना तुमचे पाठ बळ गेले तर?निवृत्तींनीही ज्ञानेशांच्या बोलण्याला दुजोरा दिल्यावर आक्का ठामपणे किंचितही चलबिचल न होता म्हणाल्या,चुलीत गेली ती धर्मसभा! ही कसली धर्मसभा?ही तर अधर्मसभा!मी नाही भीक घालत असल्या गोष्टींना.गाठ या कावेरीशी आहे.माझ्याशी पंगा घेतला तर,सगळ्यांच्या घरांतील चुली बंद करेन, मग उपाशीपोटी धर्मसभेत कसले कायदे करतील?


निवृत्ती-ज्ञानदेवांनी मागुन आणलेली माधुकरी मग आक्काने बाहेर काढुन कोरडा,ओला शिधा वेगवेगळा करुन नीटनेटका भरुन ठेवला.ओला शिधा चार पत्रावळीत नीट वाढुन चौघांना ही जेवायला घातले.मुक्ता लक्षपुर्वक अवलोकन करत होती.यापुढे या मुलांना लागेल ती मदत हरप्रकारे,त्यांची आई नसली तरी मावशी होऊन करायची असा ठाम निश्चय करुन,मुलांना म्हणाल्या, ही कावेरीआक्का सदैव तुमच्या पाठी असेल
धर्मसभा आणि ब्रम्हवृंद काय म्हणतील याची मला पर्वा नाही.त्यांना उत्तर द्यायला मी समर्थ आहे.आणि त्या निघुन गेल्या.आज प्रथमच निवृत्ती-ज्ञानदेव मुक्ताच्या बाबतीत निश्चिंत झालेत.जेवणं आटोपल्यावर सोपान, मुक्ताई वेगवेगळे खेळ खेळु लागले. आणि निवृत्ती,ज्ञानदेव बाहेर गेलेत.उद्या आईबाबांची दशपिंडविधी करायची असं ज्ञानेश्वरांनी म्हटल्यावर,आपण अजुन बहिष्कृत आहोत,शिवाय उपनयन संस्कार झालेले नाहीत.असं असतांना आईबाबांची दशक्रीया करण्याचा अधिकार आपल्याला आहे का?हे धर्म सभेला विचारल्यावर आणि त्यांनी परवानगी दिल्यावरच दशपिंडदान विधी कररतां येईल.


कोणती धर्मसभा दादा?चार अश्राप बालकांना पोरकं करुन आईवडीलांना देहान्त प्रायश्चित घ्यायला सांगते ती धर्म सभा?ज्यांच्या ज्ञानाला आव्हान नव्हतं असे प्रकांडपंडीत असलेल्या आपल्या वडिलांना,धर्माचं ज्ञान शिकवण्याचं ढोंग करते ती धर्मसभा?अजुनही आपला बहिष्कार चालु ठेवला ती धर्मसभा?की, धर्माच्या नांवाखाली अधर्म करते ती धर्म सभा?सांग दादा कोणती धर्मसभा?आणि या धर्मसभेने दशपिंडीचा अधिकार आपल्याला नाकारला तर त्या दोन पुण्यात्म्यांना तसच तडफडत ठेवायच?धर्मसभेच्या परवानग्या,संमत्या तूं आणत बस.मी उद्या गंगा घाटावर आई बाबांची दशक्रीया करणारच!मला गरज नाही धर्मसभेच्या परवाणगीची.विचाराय चं म्हणजे दगड मारुन माशांचं मोहोळ उठवण्यासारखं होईल.आपण कावेरी आक्कांना विचारुन शिधा जमवुन उद्या दशपिंडी श्राध्द करु!निवृत्तींनाही ज्ञानदेवाचं बोलन पटलं.आवेगाने निवृत्तीने ज्ञानदेव सोपांनांना उरी कवटाळले.ज्ञानदेव म्हणाले,दादा!तुमचा हात मस्तकी व आशिर्वाद असला की, एक दिवस असा येईल की,धर्म म्हणजे काय?धर्माचे कायदे काय?हे यांना माझे कडुन शिकावं लागेल,नव्हे मीच शिकवेन
आईबाबांचं दशक्रीया विधी करणं सोपं नव्हतं.एकतर माहिती नव्हती कुणी मार्गदर्शक नव्हतं.लागणारं सामान सुमान,शिधा उभं कसं करायच प्रश्न होता


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *