संत सोपानदेव चरित्र ३४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – ३४.

अनुक्रमणिका


मंदिराचे आवार लोकांनी फुलुन गेले होते.नामदेवांचे किर्तन सुरु झाले. लोकं उत्सुकतेने ऐकु लागले.सोपाकाका आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणजे एक जण श्वास तर दुसरा उच्छश्वास,ज्ञानेश्वर माऊली म्हणजे नाम आणि सोपानकाका जप,ज्ञानेश्वर माऊली फुल तर सोपान काका सुगंध,ज्ञानेश्वर माऊली म्हणजे अर्थ आणि सोपानकाका अन्वय,माऊली नेत्र आणि सोपानकाका दृष्टी,म्हणुनच ही दोघं ईश्वराचे दोन्ही नेत्र आहेत.जिवा शिवाचे अद्वैत ऐक्य आहेत.विठुनामाचा गजर करुन कीर्तन संपले.पालखी पुन्हा घराच्या अंगणात आली.निवृत्तीदादा व ज्ञानदादांनी मोठ्या आदराने पालखीतील “सोपानदेवी” घरांत गोपालकृष्णासमोर आणुन ठेवली.चौघा भावंडांचा जयजय कार आणि विठुनामाचा गजर करत लोकं घरी गेले.रात्री सोपानांना झोपेत विचित्र स्वप्न पडले.उद्या दादांना अर्थ विचारु असा विचार करुन परत झोपी गेले.


सकाळी सोपानांना जरा उशीराच जाग आली.निवृत्तीदादा कांहीतरी सांगत ज्ञानदादाची समजुत काढत होते.मुक्ताई डोळे पुसत होती.तीला रडतांना पाहुन सोपान चटकन उठुन बसत,मुक्ते काय झाले गं? कां रडतेस? तीला आणखीनच हुंदका फुटला.आवेग ओसरल्यावर म्हणाली, अरे!आपला ज्ञानदादा… ज्ञानदादा संजीवनी समाधी घेणार आहे. काssय? काय म्हणालीस तू?ज्ञानदा तू.. तूं संजवनी समाधी घेणार? खरं आहे हे? होय माझं जिवितकार्य पूर्ण झालं,सर्व उदिष्ट,संकल्प सिध्दीस गेले म्हणुन मी हा निर्णय घेतला आहे.निवृत्तीदादा तूं दिली अनुमती?सोपाना! आपला ज्ञानेशा स्वयं सिध्द,स्वयंभू आहे.मी त्याला अडवण्या चा,समजावण्याचा खुप प्रयत्न केला,पण व्यर्थ!कितीही अप्रिय असलं तरी सत्य आपल्याला स्विकारायलाच हव सोपाना! निवृत्तीदादा दुःखी भिजलेल्या स्वरांत म्हणाले.ज्ञानेशाच्या पायावर लोळण घेत सोपान रडुं लागले.ज्ञानदाने त्यांना छातीशी धरुन कितीतरी वेळ थोपटत राहिले.सगळ्यांची समजुत काढुन ज्ञानदादा समाधिस्त झाले आणि इंद्रायणीच्या काठावर ज्ञानदादाच्या आठवणींना अश्रूंचा अभिषेक घालत सोपान आक्रोश करत होते.


खरंतर दुःखाचे दिवस संपलेहोते. पण ज्ञानदादांनी घेतलेल्या संजीवनी समाधिमुळे सगळा अंधकार पसरला होता.स्वप्नातील घटना प्रत्यक्षात घडली होती.आपल्याला पांडुरंगा हाती सोपवुन तसं अभिवचन घेऊन ज्ञानदा समाधिस्त झाले होते.मध्यरात्र झाली तरी सोपान इंद्रायणीकाठीच हुंदके देत बसले होते.तेवढ्यात त्यांना शोधत ओथंबलेल्या डोळ्यांनी व काळवंडलेल्या चेहर्‍याने नामदेव आले, त्यांना कुशीत घेतल्यावर सोपान पुन्हा आकांत करुं लागले.स्वतःस सावरुन नामदेव म्हणाले, सोपानदेव,सोपानकाका!घरी चला! निवृत्तीदादा,मुक्ताई वाट बघत आहे. बोलतां बोलतां नामदेवांचा गळा भरुन आला.नाही नामदेवा!ज्ञानदाशिवाय मी घरी नाही जाणार!सोपानकाका!माऊलीनं समाधी कां घेतली हे कां मी सांगाव? तरीसुध्दा सांगतो.”नश्वर हा देह। साधका सांधवी।एक तत्व धरुनी।तत्व बोध।देहावाचेनि माये पावे एक वत्ती। जीव शीव समरसा।ऐक्य झाले।
असं तुम्हीच सांगीतले आहे ना?


“शरीर निर्मळ।वासना टवाळ।कारे बरळा भक्तीविणा।पृथ्वी आप तेज।वायु आणि व्योम।पंचभूत सम।वर्तवसे।।” हे ही तुम्हाला माहित आहे ना सोपानकाका? मुक्ताबाईंना तुमच्याशिवाय कुणीच आवरुं शकत नाही,निदान तीच्यासाठी तरी चला.खरय!ती फार कोलमडुन गेली असेल.माझ्याशिवाय कुणीच नाही सांभाळु शकत. ज्ञानदांच्या आठवणीने टाहो फोडुन रडणारे सोपान एकदम प्रौढ झाले.अश्रू पुसले,इंद्रायणीला नमस्कार केला आणि नामदेवांसोबत थेट घरीआले
मध्यरात्र उलटली तरी अंगणांत संत मंडळी व गावकर्‍यांची गर्दी होती,प्रत्येका चे डोळे पाण्याने भरलेले होते.निवृत्तीदां ची व सोपानांची नजरभेट झाली.त्यांच्या नजरेतील कारुण्य पाहुन सोपानांना वाटले,असा गांभीर्याचा मुखवटा धारण करुन राहण्यापेक्षा ढसाढसा रडले तर बरं होईल.सोपान घरांत तिरासारखे धावले. गोपालकृष्णाच्या मूर्तीसमोर घायाळ, विध्द पक्षिणीसारखी बसलेल्या मुक्ताला मिठीत घेतले.सोपानदाss आपला ज्ञान दादाss …कितीतरी वेळ सोपानाच्या कुशीत मुक्ता रडत राहिली.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र


1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *