संत सोपानदेव हरिपाठ संत सोपानकाका हरिपाठ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत सोपान देवा हरिपाठ एकूण अभंग ६

संत सोपान देवांचा हरिपाठ ६ अभंगांचा असून –
” वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे “

हे पहिल्या अभंगाचे दुसरे चरण या हरिपाठाचे धृवपद आहे .
भजन करताना प्रत्येक अभंगा नंतर
“वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे”
हे चरण म्हणायची पध्दत आहे .

सोपानदेव हरिपाठ अभंग १

या जनार्दने पाठे जाइजे वैकुंठे । हरिनाम गोमटे मुखे घेई ।।१।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।२।।
शरीर पोसीशी काबाड असीशी । ते नये कामासी अंती तुझ्या ।।३।।
सोपान सांगतो ऐके तो दृष्टांत । हरीने मुखांत गाय वेगी ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।


सोपानदेव हरिपाठ अभंग २

संसार आलिया कारण नोळखीसी । नरहरी न म्हणसी एक्याभावे ।।१।।
जपनाम विद्या तपनाम विद्या । संसार हा जन्म गेला वृथा ।।२।।
अहिक्य भजावे परात्रालागी जोडावे । ते वर्मबीज कवणा सांगावे ।।३।।
सोपानदेवे जोडले हे धन । नित्य ते स्मरण रामनाम ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।


सोपानदेव हरिपाठ अभंग ३

आम्ही नेणो माया नेणो ते काया । ब्रह्मी ब्रह्मलया आम्हां माजी ।।१।।
मी तूपण गेले ब्रह्मी मन ठेले । वासना ते जनी ब्रह्म जाली ।।२।।
बीज सर्वभाव आपणाची देव । केला अनुभव गुरुमुखे ।।३।।
सोपान ब्रह्म वर्ततसे सम । प्रपंचाचे काम नाही नाही ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।


सोपानदेव हरिपाठ अभंग ४

सागरीचे तोय जगा निवारीत । मागुतें भरीत पूर्णपणे ।।१।।
तैसे आम्ही दास तुजमाजी उदास । तू आमुचा निवास सर्व देवा ।।२।।
तुजमाजी विरो सुखदुःख विसरो । तुझ्या नामे तरो येची जन्मी ।।३।।
सोपान निकट बोलोनी सरळ । तुष्टला गोपाळ अभय देत ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।


सोपानदेव हरिपाठ अभंग ५

दिन व्योम तारा ग्रहगण शशी । एक हृषीकेशी सर्व आम्हा ।।१।।
ब्रह्मेविण नाही रिता ठावो पाही । निवृत्तीच्या पायी बुडी देका ।।२।।
सर्व हे निखळ आत्माराम सर्व । नाही देहभाव विकल्पता ।।३।।
सोपान निकट गुरुनाम पेठे । नित्यता वैकुंठ जवळी असे ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।


सोपानदेव हरिपाठ अभंग ६

निवृत्ती सोपान परिसा भागवत । पंढरी निवांत विठ्ठल गाती ।।१।।
धन्य तोचि नामा ज्ञानदेव पाही । सनकादिक बाहे उभें देख ।।२।।
पुंडलिक भक्त देखोनी सर्व । शुध्द चरणभाव अर्पिताती ।।३।।
सोपान डिंगर आनंदे नाचत । प्रेमे ओवाळीत हरीच्या दासा ।।४।।
वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे ।।

संत सोपानदेव हरिपाठ
संत सोपान देव हरिपाठ
संत सोपानकाका हरिपाठ
संत सोपान काका हरिपाठ
संत सोपान काका हरीपाठ
संत सोपान देव हरीपाठ
संत सोपानदेव हरीपाठ
Sant Sopankaka Haripatah
Sant Sopan kaka Haripatah
Sant Sopandev Haripatah
Sant Sopandeva Haripatah

संत सोपानकाका संपूर्ण माहिती

भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *