संत सोपानदेव चरित्र ३१

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – ३१.

अनुक्रमणिका


सकाळची दैनंदिन काम आटोपल्यावर पद्मासन घालुन श्लोक पठणास बसले.सगळं म्हणुन झालं आणि गंगाच्या हंंबरण्याचा आबाजानं भानावर आले.तिचं चारापाणी झालं तरी तीचं हंबरणं सुरुच होतं.आणि त्यांना हंबरण्याचे कारण समजले तेव्हा आनंदाला पारावारच राहिला नाही. साक्षात निवृत्तीदादा समोर उभे होते.

दोघेही एकमेकांच्या मिठीत सावरले.क्षेम कुशल विचारल्यावर,निवृत्तीदादासोबत नाथपंथातले जेष्ठ योगी स्वाती माधवनाथ यांनांही गहिनीनाथांनी अनुग्रह दिला आहे.सोपानांनी त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवलं.दोघांनीही वृंदावनजवळ बसवलं त्यांनी गोठ्यातील गंगा गाईला पाहुन आश्चर्य व आनंद झाला.माधवनाथ म्हणाले,गाईचं पुन्हा इथे येणं म्हणजे गोपालकृष्णाचा आशिर्शादच आहे. तुमच्या कार्याला मिळालेलं सैध्दान्तिक पाठबळच आहे.नास्ता वगैरे आटोपल्या वर,सोपानानं लिहिलेलं हस्तलिखित निवृत्ती दादासमोर ठेवलं.एकापाठोपाठ एक पानं वाचुं लागले.डोळ्यातुन अश्रू वाहुं लागले,त्यांत होतं अपेक्षापूर्तीचं समाधान,कौतुक,ओसंडु लागले,म्हणाले, तू माझा शिष्य आहेस याचा मला अभिमान आहे.


सोपाना!अत्यंत नेमक्या चपलख शब्दात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सुबोध,सोप्या नागरी मराठीत नऊ अध्यायातील गीतार्थ उभा केलास.
मायबोली मराठी तुझी सदैव ऋणी राहिल.अशाच प्रतिभेनं पुढचे अध्याय लिहुन हा संकल्प सिध्दीस ने!आपण कृतार्थ झालो,धन्यता पावलो ही भावना त्यांच्या ओघळणार्‍या अश्रूतुन प्रतित होत होती.
दुसर्‍या दिवशी निवृत्तीदादा व माधवनाथ परत गेले.ब्रम्हमुहुर्तावस्था आधी उठुन दैनंदिन कामें आटोपुन प्रचंड उत्साहाने दहावा अध्याय लिहायला सुरुवात केली.श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनांतील शंकेचं निरसन करीत,आपलं अस्तित्व किती सर्वव्यापी,सर्वसाक्षी आहे हे ते सांगताहेत.सोपानांनी लिहिले….


“श्रीकृष्ण म्हणती अर्जुन।
हे एक परम वचन।
तूं सुखसंतोष होऊन।
ते सांगेन तुझ्या हितालागी ।।”
यानंतर भगवंतांनी जे सांगीतलं ते म्हणजे
त्यांच्या सर्वसमावेशकत्वाचा,सर्वव्यापक त्वाचा,सर्वभूती परमेश्वर आहे याचा साक्षात पुरावा होता.श्रीकृष्णातलं हे सर्व व्यापी अस्तित्व दाखवण्यासाठी सोपान लिहितात…


“तरी अर्जुना अवधारी ।
मी आत्मा सर्वभूत शरीरी।
आदि मध्य निर्धारी ।
सर्व भूतांसी मीच जाण ।।”
उत्पत्ती,स्थिती,लय या तिन्ही अवस्था माझ्याच अस्तित्वाशी निगडीत आहे. भगवंताचे हे वचन वाचुन सोपान स्तिमित झाले.भगवंताचं सर्वव्यापी अस्तित्व सांगणारा दहावा अध्याय संपवला.दुपारचे खाणेपिणे आटोपुन अकरावा अध्याय घेतला.यांत भगवान श्रीकृष्णाचं विराटरुप दर्शन होत.प्रत्येक रुपाचं,तेजाचं,शक्तीचं,आयुधाचं वर्णन लिहितांना सोपान रोमांचित होत होते.

त्यांना वाटले अर्जुन किती भाग्यशाली? त्याला भगवंताच विराटरुप बघायला मिळालं आणि आपणही भाग्यवान आहो त्या विराटरुपाचं वर्णन करायला मिळालं.
अकरावा अध्याय लिहुन झाल्यावर सोपानांच्या नजरेसमोर परमेश्वराचं भव्य, दिव्य,अतिविशाल,चराचराला व्यापुन राहिलेलं विराट दर्शनापुढे सोपान अति अति लीन होऊन नतमस्तक झाले.आणि १२ व्या अध्ययाकडे वळले.देव हा भावाचा भुकेला आणि भक्तीचा तहानले ला,सामान्य माणसाला दिलासा देणारं, श्रध्देनं दोन हस्त आणि एक मस्तक या साधनेनं केललं भजन देवाला आवडतं हे सत्य दाखवलं.


तेराव्या अध्ययात भगवंतांनी भक्त
आणि भगवंत यातलं निर्वाज्य पण श्रध्देचं नातं सांगीतलं.
“पंचभूते आणि प्रकृति क्षोम।
जाणोनि बध्द तो परम गति पावे ।।देवाचं भक्तावरचं प्रेम,कल्याण,भक्ताच्या उत्तम गतीची त्याने वाहीलेली चिंता बघुन सोपान गहिवरले.
दुपारचे जेवण आटोपुन १४ वा अध्याय लिहायला घेतला.ही अवघी सृष्टी चराचर म्हणजे परमेश्वर आणि प्रकृती यांच्या समर्पणाची साक्षेपी अविष्कार आहे म्हणुनच सत्व,रज,तम,गुणांनी युक्त अशी ही सृष्टी आहे,त्यामुृळेच ज्ञानाचं महत्व अधिक आहे असं भगवंतांनी सांगीतलं.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading