संत सोपानदेव चरित्र ३३

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – ३३.

अनुक्रमणिका


दुसर्‍या दिवशी आईच्या चरण मुद्रेचा निरोप घेतांना त्यांना गलबलुन आले.लहानपणीच्या सार्‍या आठवणी डोळ्यासमोर तरळुन गेल्या.निग्रहाने डोळ्यातील अश्रू पुसले.गोठ्यातील गंगा गायीचे दावे सोडुन मोकळे केले.आणि उदास मनाने आळंदीकडे निघाले.पाठो पाठ गंगा गाय पण!वाटेत भोजलिंग काकांच घर होते,ते आता नाहीत,पण त्यांची मुलं होती.गंगा गाईसोबत सोपानास बघुन त्याला आश्चर्य वाटले. विष्णु नांवाचा मुलगा म्हणाला,आम्ही हीला खुप शोधलं.विठ्ठलपंतांनी ही गाय आबांकडे सुपुर्द केली होती.तुम्ही पर्ण कुटीत रहायला आल्यामुळ गंगा आली असेल तिकडे.गंगाची दोरी विष्णुकडे सोपवली.निरोप घेऊन सोपान निघाले.
वस्ती दिसल्यावर मात्र सोपानांना सगळ्यांना भेटायची तिव्र ओढ लागली.


झपाझप चालत सोपान झोपडीजवळ पोहोचले तर समोर मुक्ता!सोपानदादा आलास तू?आणि मिठीत शिरली.संध्या काळी आलेल्या निवृत्तीदादा व ज्ञानदादां ना सोपानास पाहुन अतिशय आनंद झाला.ज्ञानदादा प्रेमाने,आपुलकीने बोलत होते.स्वरांतुन काळजी,माया,प्रेम ओसंडत होतं आणि निवृत्तीदादा स्नेहाद्र नजरेनं बघत होते.नंतर हसत खेळत सगळ्यांची जेवणं झाली.गप्पा गोष्टी होऊन निद्रिस्त झाले.


दुसर्‍या दिवशी निवृत्तीदादा आणि ज्ञानदादा सोपानचे लिखान घेऊन बसले. श्रीमद् भगवद् गीतेवरची ती समश्लोकी टीका अत्यंत सोप्या,कोणत्याही उत् प्रेक्षा अलंकारांचा उपयोग न करतां सविस्तर विश्लेशन न देता सुबोध नागर मराठीत केलेला अनुवाद पाहुन कांहीशा अबोल असणार्‍या सोपानच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे मित शब्दांचं आणि नेमकं,आणि कुठही गीतेच्या अर्थाला,अन्वयार्थाला किंचितही धक्का न लावतां,श्रीकृष्णाने सांगीतलेलं सगळं ज्ञान,विज्ञान,अध्यात्म,योग जसाच्या तसा नागरी भाषेत उतरवलेला पाहुन सोपानाच्या तेजबुध्दीचं कौतुक वाटलं. वाचतां वाचतां जणूं निवृत्तीदादांची समाधी लागली.त्या भावसमाधीत त्यांनी सोपानाचं संपूर्ण लिखाण वाचुन काढलं तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरुन आले. भरल्या डोळ्याने सोपानाकडे बघुन, सोपानाsss माझ्या लाडक्याss सोपाना अशी आर्त हाक ऐकुन सोपानांना आपल्या अवघ्या आयुष्याचं सार्थक झालं अस वाटले,याक्षणी आपल्या जीवाची सांगता व्हावी असं क्षणभर वाटुन गेलं.ज्ञानदेवा जशी तुझी “ज्ञानदेवी तशी या सोपानाची “सोपानदेवी”!


संध्याकाळी सर्व संतमंडळींचा गोतावळा जमा झाला.सगळ्यांनी मिळुन “सोपानदेवी” वाचली.नामदेव म्हणाले, सोपानकाका!किती चपलख अनुवाद केला गीतेचा!सगळ्यांनी खुप कौतुक केले.चोखामेळांनी तर मानाचा जोहारच घातला.सर्वजन निघुन गेले.
सर्व पंचक्रोशीची,समाजाची ही भावंडं दैवतं झाली होती.चातुर्वर्णानी ग्रासलेला समाज मागे पडुन जातीभेद न मानणारा,वारकरी धर्मानं वागणाला नवीन समाज,जाती,धर्म,पंथ,भेद विरहित महाराष्र्टाचं नवीन चित्र प्रत्यक्षात आकाराला येत होतं.निवृत्ती-ज्ञानदेवाचं एकसंघ महाराष्र्टाचं स्वप्न साकारत होतं.
तोच संतमंडळींसह कांही प्रमुख


गांवकरी आलेत.नामदेव म्हणाले,सोपान काकांनी लिहिलेली “सोपानदेवी”पालखी तुन वाजतगाजत न्यावी म्हणुन सर्वजणं आले आहेत.सोपान संकोचल्यावर निवृतीदादा म्हणाले,सोपाना! संस्कृती सिध्द करणारी कोणतीही गोष्ट कुणा एकाच्या मालकीची असत नाही,ती सर्वां साठी असते. सोपानकाकांचा संकोच दूर होऊन प्रसन्न हास्य चेहर्‍यावर उमटले. उद्या “सोपानदेवी” पालखीत व पालखी संतांच्या खांद्यावर असेल.


दुसर्‍या दिवशी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजरांत सजलेली पालखी आणल्या गेली.निवृत्ती-ज्ञानदेवांनी गोपालकृष्णासमोर ठेवलेली “सोपानदेवी अंगणात आणली.नामदेवांनी लाल रंगाच्या रेशमी वस्रात तो ग्रंथ बांधुन डोक्यावर ठेवला व नाचत नाचत विठ्ठल गजरांत पालखी पर्यंत आणला.पालखीत ग्रंथ ठेवल्यावर निवृत्ती-ज्ञानेशांनी ग्रंथाची पुजा केली.आणि पालखीचे भोई झालेत. पालखीची नगरप्रदक्षिणा होत असतांना ठीकठीकाणी गुलाल, फुलांची उधळण,आरती, विठुनामाचा गजर करत वैष्णव नाचत होते.संपुर्ण नगरप्रदक्षिणा करुन पालखी मंदिरांत आली.आज नामदेवांचे किर्तन होणार होते.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading