संत सोपानदेव चरित्र २४

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – २४.

अनुक्रमणिका


लौकिक अर्थानं पारमार्थिक, आध्यात्मिकक आणि ज्ञानसंपदानं ही भावंडं महान होती.ही जितकी समाजाभिमुख होत गेली,तेवढा त्यांचा स्वशी संवाद वाढत गेला.सोपानही अपवाद नव्हते.ते ही स्वसंवेदी बनत होते अशातच एक दिवस भगवद्भक्त,विठ्ठल सखा नामदेव भेटायला आले.भक्त पुंडलिकांनी स्थापित केलेल्या वारकरी धर्माचे पाईक होते,पण लोकांमधे एक संघता नसल्यामुळे,त्यातच चक्रधरस्वामीं च्या महानुभाव पंथान जोर धरल्यामुळे भागवत धर्माला कांहीशी उतरती कळा आली होती.त्याचमुळे अलिकडे ज्ञानदेव अस्वस्थ होते.त्यांच्या अस्वस्थतेचे सोपानानी कारण विचारल्यावर,ज्ञानदेव म्हणाले,सोपाना! कांहीतरी मोठं ठोस असं समाजाच्या कल्याणाचं घडत नाही, सनातन वैदिक धर्माच्या नांवाखाली हे पाखंडी सामान्यजनांचा छळं करतात, मनांत असुन देवभक्ती करतां येत नाही. त्यांची घुसमट,कोंडमारा होतोय हे बघुन आपण कांहीतरी करायला पाहिजे,ज्या योगे या समाजातील जातीभेद,धर्मभेद, मिटुन या धर्मकांडाना टाळुन देवभक्ती करतां येईल असं कांहीतरी करावसं वाटतेय.


सोपान एकदम म्हणाले,दादा!जसं गुरुबसेश्वरांनी ‘वीरशैवपंथ’, चक्रधरस्वामीं नी ‘महानुभवपंथ’ स्थापन केला,तसं कांहीसंं घडूं शकणार नाही कां?ज्ञानदेवां चे डोळे चमकले.सांपडला,सोपाना मार्ग सांपडला,मनांतील अंधार नष्ट झाला. भक्तश्रेष्ठ पुंडलिंकांनी स्थापन केलेला वारकरी संप्रदाय जो आज थोडासा झाकाळला,त्याला आपण पुनः उजाळा देऊ या!भगवान श्रीकृष्णाने भगवद् गीतेत सांगीतलेली ‘वसुधैव कुटुम्बकम् ची संकल्पना आपण समाजात रुढ करु या!भागवत धर्माच्या झेंड्याखावी एकत्रीत येण्याचं आवाहन आपण बहुजन समाजाला करुं या!धर्म,पंथ,वंश जात यापलिकडे जाणारा मानवधर्म हाच आपल्या आवाहनाचा विषय असेल. ज्ञानदेवांनी अतिहर्षाने सोपानाला मिठी मारली.त्याच प्रसन्नतेत त्यांना झोप लागली.


दुसर्‍या दिवशी पंढरपूरहुन नामदेव जनाबाई,चोखामेळा, सावतामाळी, गोरोबाकाका इत्यादी संतमंडळी आल्याने सर्वानाच खुप आनंद झाला.
निवृत्तीनाथ,सोपान,मुक्ताबाईंनी सगळ्यांचे आगत स्वागत केले.नास्ता पाणी झाल्यावर अंगणांत सर्व जण बसले.अगदी निस्तब्ध शांततेत फक्त ज्ञानदादांचाच पार ह्रदयापर्यंत पोहोचणारा स्नेहसुधा वर्षवणारा आवाज ऐकु येत होता.सोपान एकटक ज्ञानदादा कडे पाहत होते.योग सामर्थ्याची अपरिमित साक्ष असलेला दादा प्रत्येक वेळी वेगळाच भासत होता.आणि सोपानांना कांही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.


चौघेही भावंड घराच्या पडक्या भिंतीवर बसले होते.तेवढ्यात त्यांना निरोप आला,महान हटयोगी चांगदेव हातात सापाचा चाबुक व वाघावर आरुढ होऊन अमाप भक्त व शिष्यांसह भेटीस येत आहेत.मुक्ता म्हणाली दादा! आपण त्यांना पायीच सामोरे जायचं का?नाही मुक्ता?आपण या अचेतन भिंतीवरच स्वार होऊन भेटीस जाऊं या!असे म्हणुन ज्ञानदादांनी अचेतन भिंतीला आदेश दिला.जड भिंत चालवत आपल्याला सामोरे आलेले पाहुन चांगदेवांचा अहंकार पार उतरला व ते ज्ञानदादाला शरण आले.हटयोगावर प्रचंड हुकमत असुनही केवळ अहंकाराने त्यांची विद्या काळवंडली होती त्यावर हा उतारा होता.
सोपानदेव आपल्याच विचारात गर्क,तल्लीन असतांनाही ज्ञानदेवांनी विचारलेल्या प्रश्नांना संयुक्तीक उत्तर दिल्याने सर्वजण चकीत झाले.सर्वांनी पुढची भेट पंढरपूरला घेण्याचे निश्चित करुन एकमेकांचा निरोप घेतला.


पंढरपुरात त्या दिवशी अभूतपुर्व सोहळा झाला.ज्ञानदेवांची कीर्ती अवघ्या पंचक्रोशीत पसरली असल्यामुळे सगळी संत मंडळी,भगवद् भक्त,वारकरी जमले होते.अगदी पुरातन काळापासुन अस्तित्वात असलेला भागवत धर्म आणि भक्त पुंडलिकांनी स्थापलेला वारकरीपंथ या दोहोंची उत्तम सांगड ज्ञानदेवांनी घातली.भगवंताची भक्ती करणारा तो भागवत आणि वारी करतो तो वारकरी अशा दोघांना एकत्रीत आणुन या दोहोतील गाभा,सारतत्व एकत्र आणुन ज्ञानदेवांनी वारकर्‍यांचं,भगवद् भक्तांच उद्बोधन करुन सर्व जाती,धर्म,पंथांच्या लोकांना समजावुन घेणारा,आपलसं करणारा,सर्व समावेशक असा भागवत धर्म भक्तीच्या ध्वजपताकेखाली प्रस्थापित केला.या कार्यात सोपानांचा सक्रीय सहभाग होता.सगळ्यांनी भागवत धर्माची पताका कायम फडकत ठेवावी हे विठुरायाच्या साक्षीने निश्चित झाले.

क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading