ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.409

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०९

अग्नीचे पोटीं पुरुष उद्भवला अवचट । सत्रावी लपंट निशिदिनीं ॥१॥ आधार नाहीं जेथ निराधार वर्तती । निराधार न म्हणती आपणा लागीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दाविलें । या नयनी पाहिले अविनाश ॥३॥

अर्थ:-

योग शास्त्रांत शरीरगत अग्नीपासून एक प्रकारची शक्ती उत्पन्न होऊन तिल कुंडलीनी नाडी जागृत होते. तिच्या योगाने मनुष्याचे मस्तकांत असलेल्या अमृताचा कुंभाला धक्का लागून त्यातून अमृतस्राव होऊ लागतो यालाच सत्रावीचे ‘पय ‘असे म्हणतात परंतु तेथेच तो पुरुष लुब्ध होऊन जातो. योग साध्य झालेल्या पुरुषाला जमीनीपासून अधांत्री राहाता येते. पण ते योगी स्वतःला निराधार असे समजत नाहीत.

श्रीगुरु निवृत्तीरायांच्या कृपेने मला अविनाशी आत्म्याचे डोळयाने प्रत्यक्ष दर्शन झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *