ज्ञानेश्वरमहाराज सार्थ गाथा अभंग क्र.364
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३६४
आत्मा एक बाई स्थिरचर व्यापक । सृष्टी तैसी देख एकलीच ॥१॥ पंचमहाभूतें व्यापूनी निराळा ।सौंदर्यपुतळा काळा बाई ॥२॥ ज्ञानदेव ध्यान धरिलें पुढती । त्रैलोक्या वस्ती असे जेथें ॥३॥
अर्थ:-
चराचर जगतांमध्ये एक आत्माच व्यापक आहे. त्याच्यापासून हे जगत झाले आहे. पंचमहाभूतात तो व्यापून असून निराळा आहे. ज्याच्या सत्तेवर हे त्रैलोक्य भासते. त्या शामसुंदर परमात्म्याचे ध्यान आम्ही मनांत धरले आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
