ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.270

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७० 

स्वरूपावबोधु कां फावला । इंद्रियीं डवरिला प्रेमभावो ॥ जाणते निवाले नेणते गुंतले । भजनेंचि गोविले विसर जावो ॥ शांतता समता निवृत्ति उदारू । वर्षांनी उद् गारू देतु असे ॥ ज्ञानदेवा धीर घटमठी सामा । अधऊर्ध्व व्योमा हरि दिसे ॥

अर्थ:-

आपल्याला ब्रह्मबोध झाला आहे असे समजणाऱ्या पुरूषाला माऊली विचारतात की तुला ब्रह्मबोध झाला आहे काय? झाला आहे असे म्हणेल तर तुझ्या सर्वेद्रियांच्या ठिकाणी भगवंताच्या विषयी प्रेमभाव भरला आहे काय? असे न जाणणारे अज्ञानी जीव संसारात गुंतून राहिले आहे.

व ज्यांनी हे जाणले आहे. असे ज्ञानीपुरूष समाधानाला प्राप्त झाले आहे. व त्यामुळे ते प्रपंचालाही विसरून गेले आहे. अशा अधिकारी जीवांना कृपेचा वर्षाव करून शांतता व समाधान देणारे एक श्रीगुरू निवृत्तिनाथच आहे. त्यांच्या कृपेमुळेच मला दाही दिशेला एक श्रीहरिच दिसत आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *