ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.302

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३०२

सांगेन तें ऐक दावीन ते पाहें । या मनाचि मुळ सोय आठवीं पां ॥१॥
आठवितां तूं तया ठकशील कैसा । सांजवेळे लाहोसी उदो कां जैसा ॥२॥
बुडोनियां राही आनंदसागरी । आठवितां असे जन्मवरी रया ॥३॥
पडतासि दृष्टि निवृत्तीच्या चरणीं । मा ज्ञानदेवो मनीं धरुनि ठेला ॥४॥

अर्थ:-

मनाचे मूळ जी परमात्मवस्तु त्याविषयी मी जे सांगेन ते ऐक, दाखवीन ते पहा. त्याचा जर तुला आठव झाला तर तला चमत्कार वाटेल चमत्कार म्हणजे हाच की, या अविद्या रुप रात्री मध्ये आत्म ज्ञानरुपी सूर्याचा उदय झाला कसा.

हा प्रकार संध्याकाळी सूर्य उगवल्या सारखा वाटेल. अशा ह्या आत्मबोधाच्या आनंदरुपी समुद्रांत तूं जन्मभर बुडून राहा. तो परमात्मा माझ्या दृष्टीस पडताच त्याला मी मनांत धरुन श्रीगुरु निवृत्तीरायांच्या चरणी राहिलो ! असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *