२४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २४.


एक दिवस कृष्ण बलरामाला म्हणाला, दादा! गोकुळ वृंदावन सोडुन सात वर्षे झाले.तूं शक्य तेवढ्या लवकर जाऊन पिता नंद व माता यशोदेला भेटुन सर्वांचे सांत्वन करुन यावेस असे वाटते. कृष्णाच्या इच्छेनुसार बलरामाने गोपवेषा त वृंदावनमधे प्रवेश केला.नित्याच्या परि चित वेशात बरेच दिवसांनी आलेल्या बलरामाला पाहुन सर्वांना खुप आनंद झाला.बलराम वाड्यात शिरल्याबरोबर खाटेवर बसलेल्या नंद व पडवीत बसलेल्या यशोदाला खाली वाकुन नमस्कार केला.दाटल्या कंठाने त्याच्या पाठीवर हात फिरवुन जवळ घेतले.
सर्व गोपगोपींना उद्देशुन बलराम म्हणाला,तुमचे निस्सिम,निर्हेतुक प्रेम, माया व भक्ती जी देवांना दुर्लभ ती आम्हा ला मिळाली.श्रीकृष्णाच्या आठवणीने सर्वांची अंतःकरणे सद्गदीत होऊन अश्रु धारा वाहु लागल्या. दुसर्‍या दिवशी सर्वां चे कसेबसे सांत्वन करुन जड अंतःकर णाने निरोप घेऊन सारथ्याला रथ हाकाय ची सुचना केली,


दोघांनीही तारुण्यात पदार्पन केले असल्यामुळे वसुदेव,देवकी,रोहिणीला त्यांच्या विवाहाची काळजी लागली.पण त्यावेळच्या प्रथेनुसार क्षत्रियांचा विवाह बहुधा स्वयंवराने किंवा समान दर्जाच्या कडुन कन्या सांगुन आली तरच विवाह होत असे. त्यामुळे त्यांना वाट पाहण्या शिवाय गत्यंतर नव्हते.एक दिवस सर्वत्र फिरणार्‍या गुप्तहेराने बातमी आणली की कौंडण्यपुरी असलेल्या भोजराजाचा जेष्ठ पुत्र रुख्मी याने आपल्या बहिणीच्या स्वयं वराची तयारी करुन सर्व राजांना आमंत्रित केले आहे. सर्व राजांना स्वयंव राचे निमंत्रण दिले पण आपल्याला नाही हा घोर अपमान आहे.विचारविनिमय करुन असे ठरले की,मथुरेच्या रक्षणार्थ बलरामाने थांबुन,निवडक सैन्यानिशी उग्रसेनादीसह कृष्णाने कौंडण्यपुराकडे निघावे.जरी श्रीकृष्णाला स्वयंवराचे निमंत्रण नव्हते तरी श्रीकृष्ण-रुख्मिणी

एकमेकांसाठीच निर्माण झाली आहे, श्रीकृष्णाची अलौकिक व अद्भुत पराक्रम रुख्मिणीच्या कानी गेलेला व आपल्या पिता व बंधुने मुद्दाम वगळले हे पाहुन तिला अतिशय वाईट वाटले.त्या क्षात्र कन्येने मनोमन श्रीकृष्णाशिवाय दुसर्‍या कोणाला वरणार नाही हा दृढनिश्चय केला पण त्यांना निमत्रंण गेले नाही तर येईल का?तिची घालमेल सुरु होती.मनात ती धावा करीत होती.इकडे कृष्णाची स्थिती ही स्थिती वेगळी नव्हती.त्यानेही रुख्मिणीच्या सौंदर्य,गुणांची ख्याती ऐकली होतीच.ही आपल्या साठीच निर्माण झाली आहे.विदर्भ राजाचे निमंत्रण नसले तरी,क्षत्रियांना कन्याहरण करण्याचा अधिकार आहे.
उग्रसेनासह श्रीकृष्णाचा रथ सुर्या स्ताच्या वेळी भीष्मक राजाच्या नगरांत पोहोचला.नगराबाहेर सगळीकडे असंख्य शिबिरे पसरली होती.श्रीकृष्ण आल्याची वार्ता कळतांच भीष्मकचे जेष्ठ आप्त क्रथकौशिक त्यांच्या स्वागतास सामोरे जाऊन मोठ्या आदराने व सन्मानाने सुविधायुक्त शिबिरात आणले.
श्रीकृष्ण अवचित आल्याने सर्वीकडे खळबळ उडाली.


. विचारविनिमया साठी सर्व राजांची बैठक बसली.जरासंध म्हणाला,श्रीकृष्ण केवळ रुख्मिणीसाठीच आला हे निश्चित,पण श्रीकृष्ण ससैन्य आल्याचे समजल्यामुळे सगळीर्धाभिषिका राजा नसल्याने जर त्याने स्वयंवरात भाग घेतला तर,तो कितीही पराक्रमी असला तरी त्याला आपल्या बरोबरीने कधीही बसता येणार नाही,मग
परिणामाची पर्वा न करतां आम्ही क्षात्र धर्माने मरुं,अशी सर्व राजांची चर्चा सुरु असतांना भीष्मक,पुत्राच्या भितीने कांही न बोलतां स्तब्ध बसुन होता.आपला मदन्मोत्तपुत्रला परशुरामाकडुन अस्र प्राप्त झाल्याने उन्मत्त बनला आहे.कृष्ण द्वेषी व अभिमानी आपला पुत्र कृष्णाच्या हातुन जिवंत सुटेल असे वाटत नाही.पण आपली लाडकी कन्या रुख्मिणिला श्रीकृष्णच योग्य ‘वर’ आहे.तेवढ्यात रुख्मी उठुन उन्मत स्वरात गर्जत म्हणाला कांही झाले तरी माझ्या बहिणीस कृष्णाला वरुं देणार नाही.अशा चर्चेत पहाट झाली. सुर्योदय होताच क्रथकौशिक राजाने श्रीकृष्णाला मूर्धाभिषेक करुन आपले राज्य अर्पण केले.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *