महाशिवरात्री महात्म्य 61 अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

महाशिवरात्री महात्म्य, पूजा विधी, पहा.

महाशिवरात्र 61 अभंग आहेत.

पूजा विधी कशी करावी पहा.

महाशिवरात्र महात्म्य मराठी पहा.
महाशिवरात्र महात्म्य हिंदी पहा.
महाशिवरात्र कथा,

शिवरात्रमाहात्म्य अभंग – 61

1.
शिवरात्रि कथा धन्य जे ऐकती

शिवरात्रि कथा धन्य जे ऐकती ।
इच्छिले पावती सर्व काही ॥१॥
पातकांचा नाश पुण्य वाढे फार ।
शेखी विश्वंभर कृपा करी ॥२॥
भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान ।
काळ करी चरण सेवा त्यांची ॥३॥
नामा म्हणे शिव ही अक्षरे दोन्ही ।
जपावी सज्जनी वारंवार ॥४॥

2.
शिवरात्री व्रत करी यथाविधी
शिवरात्री व्रत करी यथाविधी ।
भावे पूजी आधी शिवलिंग ॥१॥
चुकलें चुकले जन्मांचे बंधन ।
पुनरागमन नये तेणें ॥२॥
एक बिल्वदळ चंदन अक्षता ।
पूजन तत्त्वतां सोपें बहु ॥३॥
एका जनार्दनी पूजितां साचार ।
इच्छिले हरिहर पूर्ण करितों ॥४॥

3.
तुम्ही विश्वनाथ ।
दीन रंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडा ।
पाया पडिलो बराडी ॥२॥
काय उणे तुम्हापासिं ।
मी तो अल्पाची संतोषी ॥३॥
तुका म्हणे देवा ।
काही भातुकें पाठवा ॥४॥

4.
भस्म उटी रुंडमाळा
भस्म उटी रुंडमाळा ।
हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा ॥१॥
गजचर्म व्याघ्रांबर ।
कंठी शोभे वासुकी हार ॥२॥
भुते वेताळे नाचती ।
हर्ष युक्त उमापती ॥३॥
सर्व सुखाचे आगर ।
म्हणे नरहरी सोनार ॥४॥

5.
शिव भोळां चक्रवर्ती ।
त्याचे पाय माझे चित्ती ॥१॥
वाचे वदता शिवनाम ।
तया न बाधी क्रोध काम ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष ।
शिवा देखता प्रत्यक्ष ॥३॥
एका जनार्दनी शिव ।
निवारी कळी काळाचा भेव ॥४॥

6.
हरिहरां भेद ।
नाहीं करूं नये
वाद ॥१॥
एक एकाचे हृदयीं ।
गोडी साखरेच्या ठायीं ॥ ध्रु  ॥
भेदकासी नाड ।
एक वेलांटी च आड ॥२॥
उजवें वाम भाग ।
तुका म्हणे एकचि अंग ॥३॥

7.
कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती ।
पार्वतीचा पति योगिराज ॥१॥
तयाचिया पाया माझे दंडवत ।
घडो आणि प्रीत जडो नामीं ॥२॥
जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळीं ।
तिजा नेत्रज्वाळी जात वेद ॥३॥
कंठीं काळकूट डौर त्रिशूल हातीं ।
सर्वांगीं विभूति शोभतसे ॥४॥
गळां रुंडमाळा खापर हस्तकीं ।
रामनाम मुखीं सर्व-काळ ॥५॥
व्याघ्रचर्मधारी स्मशानीं राहिला ।
संगें भूतमेळा बिरा-जित ॥६॥
नामा ह्मणे नामें नासोनियां पाप ।
करीं मुखरूप भक्तांलागीं ॥७॥

8.
डवरला गिरी कैलास ढवळा ।
सिंहासन ज्याला ढव-ळेची ॥१॥
पाहतां पाहतां निवाले लोचन ।
भव्य ज्याचें ध्यान एक-रूप ॥२॥
ढवळा सर्वांगीं देव तो आपण ।
लेइला भूषण तेंहि तैसें ॥३॥
पर्वताची बाळ पार्वती ढवळी ।
अर्धांगीं शोभली एकरूप ॥४॥
स-र्वांगीं लविली ढवळी विभूती ।
माळा विराजती स्फटिकाच्या ॥५॥
पांढरिया जटेमध्यें गंगा आहे श्वेत ।
गळ्यांत सोभत श्वेत सर्प ॥६॥
शंखपाळ श्रवणें कुंडलें ढवळीं ।
देखतां भूतळीं दुजा नाहीं ॥७॥
नामा ह्मणे ऐसें दाऊनियां ध्यान ।
भाविकाचें मन तोषवित ॥८॥

9.
एके दिनीं रत्नसिंहासनावरी ।
कैसा त्रिपुरारी शोभ-तसे ॥१॥
सांगों जातां चार्‍ही वाचा विसांवती ।
तेथें माझी मति काय सांगों ॥२॥
वामभागीं साजे सुंदरी भवानी ।
सिद्ध ऋषि मुनि करिती सेवा ॥३॥
नारद तुंबर गर्जती गायन ।
तेथें कर जोडोन उभे देव ॥४॥
गणेश शण्मुख ढाळिती चामरें ।
रिद्धिसिद्धि द्वार राखिताती ॥५॥
नामा चा गजर मृदंगाची घाई ।
पाहाती नवाई ब्रह्मादिक ॥६॥
नामा म्हणे करीं देतसे विडिया ।
लागोनियां पायां वारंवार ॥७॥

10.
तेव्हां प्रश्र करी पार्वती आदरें ।
शिवाप्रती कर जो-डोनियां ॥१॥
सांगावाजी स्वामि ऐसा इतिहास ।
गातां जोडे वास तुझे पायीं ॥२॥
जाळोनियां पापें सुखाची उन्नती ।
विश्व सुखी होती जेणें योगें ॥३॥
नामा ह्मणे सुटे काळासी दरारा ।
विश्वासिया नरा मुक्ति जोडे ॥४॥

11.
ऐकोनियां वाणी ।
संतोषला शूळपाणी ॥१॥
देवी चांगलें पुसिलें ।
तुझ्या बोलें चित्त धालें ॥२॥
बोल नव्हती साचार ।
जड जीवाचा उद्धार ॥३॥
बोल तुझे गोडावले ।
जगीं सुदिन पाहिजे ॥४॥
शिवरात्रीचें महिमान ।
नामा ह्मणे ऐका जन ॥५॥

12.
ऐका सावधान कथा शिवरात्र ।|
पावन पवित्र तिहीं लोकीं ॥१॥
भाव धरोनियां आचरती जरी ।
वास शिवपुरीं घडे त्यासी ॥२॥
उपवास आणि शिवाचें पूजन ।
रात्रीं जागरण विधि त्याचा ॥३॥
एक पसा पाणी एक बिल्वदळ ।
पूजन केवळ सोपें बहु ॥४॥
नामा ह्मेण करा नामाचा गजर ।
मुखीं हरहर शब्दमात्रें ॥५॥

13.
शिव ऐसा शब्द कल्याणदायक ।
जाणती भाविक साधुजन ॥१॥
तारक हें नाम भोळ्याभाविकांसी ।
नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥
उपमन्यु बाळक दूध मागों गेला ।
क्षीरांब्धि दिधला उचितासी ॥३॥
दुष्टदुराचारी पतित तारिले ।
नाही आव्हेरिलें दीनानाथें ॥४॥
नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप ।
ताराया अमूप अवतार ॥५॥

14.
भेदवादी जन वदतसे भिन्न ।
नव्हे तें लक्षण भज-नाचें ॥१॥
विश्वीं विश्वंभर कोंदलासे एक ।
भेदाचें कौतुक कैसें सांगा ॥२॥
ब्रह्मीं नाहीं ठाव एकपणाचाही ।
तेथें दुजें कांहीं समावतें ॥३॥
आदि मध्यें अंतीं खेळूनियां खेळ ।
उरलें तें निखळ अविनाश ॥४॥
हेमीं जैसे केले तैसे होती नग ।
तरी ते अव्यंग सोनेपणीं ॥५॥
केली जैसी भक्ति शैव कां वैष्णव ।
पाहतां तो देव नाहीं दुजा ॥६॥
शिवविष्णु दोघे एकचि अवतार ।
वेदांनीं निर्धार हाचि केला ॥७॥
नामा ह्मणे येथें दुजा नको भाव ।
विष्णु तोचि शिव शिव विष्णु ॥८॥

15.
कांचीपुरीं राजा नामें सोमदत्ती ।
तयाचे संपत्ती पार नाहीं ॥१॥
पूर्वपुण्यबळें लाधलें तयासी ।
देतां उपमेसी उणा शक्र ॥२॥
पांचशतें तया कामिनी सुंदरा ।
करितां नाहीं पुरा झाला काम ॥३॥
रिद्धि सिद्धि घरीं कामारि हिंडती ।
धैर्य शौर्य कीर्ति ज्याची जगीं ॥४॥
नामा म्हणे जेथें उणें कांही नाहीं ।
ऐसें असो-निही न सुटे भोग ॥५॥

16.
भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळीं ।
वासना वोंगळी तेचि करी ॥१॥
वासनेचि थोरी सांगवेना कांहीं ।
न सुटिजे कांहीं कोण्या काळीं ॥२॥
तारुण्याच्या भरें आवडी स्त्रियेची ।
वृद्धपण तेंचि पुढें होय ॥३॥
ह्मणतसे पोरें वांचतील कैसीं ।
हाचि अह-निंशी ध्यास करी ॥४॥
मेलियाही पुढें तेंचि उभें राहे ।
जन्मोजन्मीं पाहे लागलेंसे ॥५॥
मृगाचिया ध्यासें भरतां मृगपण ।
जन्मल्यावां-चून सोडीनातें ॥६॥
नामा ह्मणे जया जैसी जे वासना ।
जन्मकर्में जाणी जैसीं होतीं ॥७॥

17.
पंचशतामाजी दोघी पतिव्रता ।
जारणी सर्वथा सर्व कांहीं ॥१॥
करुनियां ऐसीं जाती नरकासी ।
नांडिलें पतीसी त्यांच्या पापें ॥२॥
करिती एक वेळ झांकिती लोचन ।
शेवटीं बंधन यमाहातीं ॥३॥
नामा ह्मणे बरें नव्हे हे कोणासी ।
घडेल तयासी जाच बहू ॥४॥

18.
राष्ट्रं करी पाप राजानें भोगावें ।
राजियाचें तें सर्व पुरोहितां ॥१॥
बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही ।
परी तें कोणाही न कळे वर्म ॥२॥
शिष्यें केलें पाप भोगावें गुरूनें ।
स्त्रिनें केलें घेणें पुरुषासी ॥३॥
नामा ह्मणे जन मायेंत गुंतले ।
सेखी खाती झोले संसाराचे ॥४

19.
ऐसें बहुत काळ लोटलियावरी ।
पुण्याची सामोग्रीं हारपली ॥१॥
मरोनियां जन्म हरणाचा पावला ।
पतिव्रता झाल्या कुरंगिणी ॥२॥
प्रारब्धाचा भोग सुटेना कोणासी ।
केलीं जैसीं तैसीं घ्यावीं फळें ॥३॥
नामा म्हणे देव कृपा करील जरी ।
सुटेना तोंवरी भोग खरा ॥४॥

20.
होऊनि हरण राहिला ते वनीं ।
दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या ॥१॥
जातीच्या स्वभावें करिती विहार ।
चित्त झालें स्थिर एकमेकां ॥२॥
धाकुटीला दोन्ही पाडसें गोजिरीं ।
दुजी गरोदरी पूर्ण मास ॥३॥
नामा म्हणे पुढें काय झाली गती ।
कथेची संगति ऐका बरी ॥४॥

21.
देवलोकीं इंद्र शेवेसी सादर ।
भूतसेन चाकर होता तेथें ॥१॥
सेवेसी चुकतां होय तूं किरात ।
ऐसें इंद्रें त्यातें शापियेलें ॥२॥
शेज सज्ज करितां अंतर पाडिलें ।
ह्मणोनी घडले भोग त्यासी ॥३॥
नामा ह्मणे सेवा करणें हें कठीण ।
त्यानें व्हावें जाण सावधान ॥४॥

22.
ऐकतांचि शब्द होऊनि किरात ।
राहिला निवांत एके ग्रामीं ॥१॥
पाळणपोषण विषयांची वोढी ।
करीतसे जोडी पात-काची ॥२॥
चण्ड भिल्लनाम घेतलें ठेऊनि ।
दुष्टभाव मनीं वाढ-विला ॥३॥
कासेसीं वाधुरा हातीं शूळं दंड ।
सामोग्री उदंड मेळविली ॥४॥
हिंदे नान वन पर्वत शिखरें ।
मारीतसे फार जीवजंतू ॥५॥
जातीचा स्वभाव लागला तयासी ।
कष्टे अहर्निशीं ह्मणे नामा ॥६॥

23.
ऐसें असतां तो सरूम आला काळ ।
प्रारब्धाचें बळ कैसें पाहा ॥१॥
हिंडता हिंडता फार कष्टि झाला ।
दृष्टिस तयाला न पडे कांहीं ॥२॥
कडे दरी मोठया पर्वताचे वरी ।
रिघोनियां करी नाना युक्ती ॥३॥
झाली सांजवेळ न मिळे आमीष ।
होऊनि उदास राहिलासे ॥४॥
नाना ह्मणे मग काय त्यानें केलें ।
ऐकावें निश्चळें साधूजनीं ॥५॥

24.
मार्गही राहिला जाऊं कोणीकडे ।
आमीष न जोडे काय कीजे ॥१॥
चिंताज्वरें फार तापलें अंतर ।
क्षुघेचा आडदर पोटामध्यें ॥२॥
रिक्त जाऊं तरी नाहीं कांहीं घरीं ।
वाट पाहे घरीं दारा-पुत्र ॥३॥
पाहूम जातां काहीं नाठवे विचार ।
तेणें स्थिरस्थिर पाय टाकी ॥४॥
नामा ह्मणे तेव्हां देखे सरोबर ।
कांहींसा विचार करूं लागे ॥५॥

25.
भोंवतालें जाळें घाली नेटेंपाटें ।
हस्तकीं तिखट बाण धरी ॥१॥
येतील उदकपानासी सावजें ।
पाहे त्याचे व्याजें रोखोनियां ॥२॥
तेथें एक बिल्ववृक्ष महाथोर ।
वेंघोनियां वर बैसलासे ॥३॥
डोळ्याआड आलीं ह्मणोनियां तोडी ।
तरीं आवडी आमीषाची ॥४॥
बकाचियेपरी ध्यानस्थ राहिला ।
जीविंचा जिव्हाळा वेगळाची ॥५॥
नामा ह्मणे ऐसी दैवाची नव्हाळी ।
न करितां झाली देवपूजा ॥६॥

26.
लक्षवरी बिल्वदळें माथा वाहे ।
आनंद न समाये महादेवा ॥१॥
बहुता काळाचें तेथें एक लिंग ।
होतें भूमिभाग होऊ-नियां ॥२॥
भोळा महादेव तेणें संतोषला ।
ह्मणे करी मला कोण पूजा ॥३॥
नामा ह्मणे पाहे निमित्याची वाट ।
पुराणीं बोभाट असे त्याचा ॥४॥

27.
पुराणीं पवाडे जयाचे अपार ।
ऐकतांचि फार सुख वाटे ॥१॥
भोळा महादेव पाहे भोंळा भाव ।
एकसरें जीव उद्ध-राया ॥२॥
रावण मागों गेला पार्वतीकारणें ।
देते वेळे नेणे कैसें द्यावें ॥३॥
जातीची चांडाळी गोकर्णासी गेली ।
दरुशनें ते नेली कैलासासी ॥४॥
नामा म्हणे कैसें दैव या भिल्लाचें ।
आलें पूज-नाचें फल हातां ॥५॥

28.
माथां पडतां पालां ।
सांब तेणें संतोषला ॥१॥
होता प्राचिनाचा ठेवा ।
बहु दुर्लभ मानवा ॥२॥
काय भक्तीचा जीव्हा-ळा ।
काय त्याचे अंगीं कळा ॥३॥
बहु केलीं दुष्ट कर्म ।
सेखीं तोचि झाला धर्म ॥४॥
नामा ह्मणे भोळादेव ।
सांगायाचा हाचि भाव ॥५॥

29.
इतुकियासाठीं ।
बहु तुष्टला धुर्जटी ॥१॥
काय सांगावा विचार ।
दैव पारध्याचें थोर ॥२॥
झाली तीन प्रहर निशी ।
पूजा पावली देवासी ॥३॥
धाडियेलें यमाला ।
सुखी कराया तयाला ॥४॥
आला तो धांवत ।
माग ह्मणे अपेक्षीत ॥५॥
त्याची विषयक भक्ति ।
पुढती झाली तया गती ॥६॥
जें जें याचकें मागावें ।
तें तें दातयानें द्यावें ॥७॥
काय मागितलें तेणें ।
तेंचि नामा ऐका म्हणे ॥८॥

30.
येऊनियां यम ठाकला पुढारीं ।
पाहे दुराचारी दुरो-नियां ॥१॥
घाबरला मनीं कोण असे नेणे ।
विचारितां मनीं भां-बावला ॥२॥
पुसों लागे त्याला कोण तूं आलासी ।
आणिक ह्मणसी माग कांहीं ॥३॥
देव किंवा यक्ष राक्षस किन्नर ।
करितां निर्धार न पडे ठायीं ॥४॥
नामा ह्मणे मूर्ख पारधी तो खरा ।
दैव त्याच्या घरा आलें जाण ॥५॥

31.
जाणोनियां यम संतोषला मनीं ।
मंजुळ वचनीं काय बोले ॥१॥
केली देवें कृपा पाठविलें मज ।
वरदान तुज द्यावयासी ॥२॥
सर्वही जीवाचा नियंता मी यम ।
इच्छिसी तो काम पूर्ण करूं ॥३॥
शिवरात्री आजी उपवास केला ।
शंकर तोशला बिल्वदळीं ॥४॥
नामा ह्मणे ऐसें ऐकतां वचन ।
पार-ध्याचें मन सुखावलें ॥५॥

32.
जोडोनियां हात वंदिला कृतांत ।
ह्मणे माझा हेत इतुकाची ॥१॥
सर्वसुखाहूनि हेंचि वाटे गोड ।
संसाराची ओढ मोडवेना ॥२॥
मृग पक्षीयाचें कळावें बोलणें ।
सर्व कांहीं येणें कार्यसिद्धी ॥३॥
इतुकी आहे हो माझी ही वासना ।
पुरवूनि स्वस्था – ना जावें तुम्ही ॥४॥
नामा ह्मणे ज्याची जे कांहीं वासना ।
तेचि पुढें जाणा उभी ठाके ॥५॥

33.
देऊनियां वर दंडपाणी गेला ।
ध्यास पारध्याला मृगा-चाची ॥१॥
लाऊनियां चित्त ऐके चळवळ ।
दृष्टीची तळमळ लक्ष तेथें ॥२॥
उगवला दीन जाहला प्रकश ।
मृग पक्षीयास दृष्टि झाली ॥३॥
तोचि मृग पाहा आला उदकासी ।
उडाण गगनासी साधीतसे ॥४॥
तृषाकांत मोठा चालीला नि:संग ।
प्रारब्धाचा भोग ओढवला ॥५॥
उदकाचिये हांवें दृष्टि झाली दुरी ।
पाश तो समोरी देखेचिना ॥६॥
येऊनियां पडे जाळिया माझारी ।
लोळे पृ-थ्वीवरी एकसरा ॥७॥
नामा ह्मणे भिल्लें पाहातां लोचनीं ।
वोढो-नियां गुणीं बाण लावी ॥८॥

34.
घाव घालूं जातां देखिलें नवल ।
पाहातसे खळ दुष्ठ-भावें ॥१॥
परी तें होणार कदापि चुकेना ।
तैसीच वासना धांव घाली ॥२॥
धाकुटी हरणी पाडसें धाकुटीं ।
सांडी उठाउठी आली तेथें ॥३॥
पाहों जातां पाशीं गुंतला तो मृग ।
तेव्हां काय मग केलें तिनें ॥४॥
मुखाप्रती मुख लाऊनि चुंबिलें ।
ह्लदय फुटलें देख-तांचि ॥५॥
सुख दु:ख बोल बोलती ते वेळें ।
म्हणती कपाळीं भोग होता ॥६॥
सोडविता कोणी न दिसे ये काळीं ।
काळाची पडली उडी आतां ॥७॥
नामा ह्मणे खळा कळे त्याची वाणी ।
ऐकाया लागूनि स्थिर झाला ॥८॥

35.
धर्मशास्त्री ऐसें बोलताती बोलें ।
तेणें चोजवलें चित्त त्याचें ॥१॥
आश्चर्याच्या डोहीं बुडाला पारधी ।
म्हणे कैसी बुद्धि याची पहा ॥२॥
रानींचीं रानवटें तया एवढें ज्ञान ।
प्रेमाचें जीवन वोसंडत ॥३॥
चाकाटली वृत्ति चित्त केलें स्थिर ।
दोघांचीं उत्तरें ऐकतसे ॥४॥
नामा ह्मणे हरणीहरणाचा संवाद ।
ऐकतां भवबंध तुटतसे ॥५॥

36.
बंधनीं गुंतला देखोनियां पती ।
उडालीसे वृत्ति हर-णीची ॥१॥
देहाची ते आस सांडोनि लवलाही ।
पडे रडे कांहीं बोल बोले ॥२॥
ह्मणे तुह्मी आतां नव जावें एकलें ।
संगें आह्मां नेलें पाहिजे जी ॥३॥
बहुता जन्मांची तुह्मां आम्हां गांठी ।
आतां कैसी तुटी पाडितसां ॥४॥
भोम जे भोगिले स्वप्रप्राय झाली ।
नाहीं ते पुरली वासना हे ॥५॥

नामा ह्मणे विषयवासना वोंगळा ।
तेणें कोण्या काळें सुटिजेना ॥६॥

37.
देखतांचि कांता दु:खी झाली फार ।
डोंगर तिजवर कोसळला ॥१॥
बोलतां तियेशी न निघती बोल ।
ऐसाची तो वेळ अवधारी ॥२॥
नको आतां पडूं मायेचिये भरी ।
जाये वो सुंदरी स्वस्थळासी ॥३॥
माझी गति मज तुझी गति तुज ।
काय काज व्यर्थ प्राण द्यावा ॥४॥
घरीं तुझीं बाळें गोजिरें गोमटीं ।
जाऊनियां पोटीं धरीं त्यांसीं ॥५॥
न लावी उशीर जाई वो माघारी ।
जंव तो दुराचारी न देखतां ॥६॥
बाळा पाळण हाचि स्त्रियांचा धर्म ।
सांगतसे वर्म जाई आतां ॥७॥
माझिया प्रारब्धीं होतें तैसें झालें ।
तूं कां येथें बळें प्राण देसी ॥८॥
नामा ह्मणे ऐसें सांगे तिच्या हिता ।
प्री ते नाइकतां कष्टी होय ॥९॥

38.
नेत्रीं अश्रुधारा पडती अपार ।
तेणें पृथ्वीवर पूर ताहे ॥१॥
ह्मणे तुह्यांवीण कैसा प्राण धरूं ।
वांचुनियां करूं काय आतां ॥२॥
माझिया भारानें दाटेल मेदिनी ।
तुह्मां आव्हेरूनि गेल्यें जरी ॥३॥
सुखाचे सांगाती होतों दोघीजाणी ।
दु:ख ह्मणवूनि सांडी केली ॥४॥
सांडिलिया तुह्मां देवा न मानेल ।
वेदशास्त्र बोल हाकारिती ॥५॥
तुजविण क्षण कंथवेना काळ ।
मीना जैसें जळ तैसेम आह्मा ॥६॥
तुज-विण जिणें व्यर्थ या संसारीं ।
नामा ह्मणे खरी गोष्ट बोले ॥७॥

39.
चण्डभिल्ल तेणें ऐकिलें बोलणें ।
सावधान मनें करो-नियां ॥१॥
तेव्हां होती चित्तीं वासना जे खोटी ।
जिरऊनि पोटीं चाकाटला ॥२॥
भीतिल यालागीं वृक्षा आड आला ।
ऐकों जो लागला शब्द त्यांचे ॥३॥
नामा ह्मणे ऐसा राहिला पारधी ।
ऐकावें ते संधि काय झालें ॥४॥

40.
दुसरी जे होती गर्भिण कुरंगी ।
तेही लागवेगीं आली तेथें ॥१॥
आहा ऐसें काय केलें वो साजणी ।
नयेसी अझुनी कोंपटासी ॥२॥
लहान पाडसें आक्रंदती भुकें ।
कैसी येथें सुखें राहिलिसी ॥३॥
जाईं लवलाही त्यांसी स्तन देईं ।
सांगूं आतां कांहीं बोलवेना ॥४॥
नामा ह्मणे धन्य तयाचें सौजन्य ।
नाही भावभिन्न कोणामाजी ॥५॥

41.
येरी म्हणे काय करूं वो सुंदरी ।
आतां आहे धरीं  काय माझें ॥१॥
प्राणनाथें पेणें केलें स्वर्गलोकां ।
जाईन मी देखा तयासयें ॥२॥
वडिलपणें तुह्मी लोभ असों द्यावा ।
सांभाळ करावा बाळकांचा ॥३॥
वागुरे माझारी गुंतलासे कांत ।
कायसें जीवित विचारी पां ॥४॥
न लावीं उशीर जाईं येच क्षणीं ।
अससी गर्भिणी पूर्ण दिवस ॥५॥
जरी देसी प्राण पतन गर्भासी ।
होय ते दोषासी पात्र होसी ॥६॥
पोसोनियां बाळें वाढवीं वंशाला ।
द्यावें चित्त बोला माझ्या आतां ॥७॥
पळावया तुज नाहीं अंगीं बळ ।
न देखतां खळ जाईं वेगीं ॥८॥
नामा ह्मणे ऐसीं उत्तरें ऐकिलीं ।
तेही घाबरली तयेवळे ॥९॥

42.
ऐकतांचि जीव झाला कासावीस ।
ह्मणे झालें कैसें अकस्मात ॥१॥
आहां कपाळींचा भोग वोढवला ।
कांत तो नि-घाला सांडोनियां ॥२॥
कैंची बाळें कोण कोणाची सांगाती ।
पाहातां हे भ्रांति वाउगीची ॥३॥
ठायींची हे काया जायाची जाईल ।
वांचलिया फोल पतिविण ॥४॥
पतीविण सुख काय या संसारी ।
दु:ख कल्पवरी भोगावें कीं ॥५॥
नामा ह्मणे ऐसें चिंतोनियां मनीं ।
आली ती तत्क्षणीं हरणापाशीं ॥६॥

43.
कपाळीं कपाळ लावी चुंबी रडे ।
आक्रंदोनी पडे पृथ्वीवरी ॥१॥
आवडीचें चिन्ह सांगवेना वाचे ।
जाणावें जयांचें त्यांचें त्यांनी ॥२॥
मानेवरी मान टाकूनि राहिली ।
वाचाही खुं-टली बोलवेना ॥३॥
आह्मी तुजविण नें राहूं क्षणभरी ।
उदास न करीं चित्त आतां ॥४॥
नामा ह्मणे मृगजन्म त्यांचा खरा ।
लक्षितां विचारा ज्ञानी बहू ॥५॥

44.
पट्टाची मी राणी वडील मानाची ।
जे गति मृगाची तेचि मज ॥१॥
जाईन सांगातें न सोडीं संगती ।
निश्चय हा चित्तीं दृढ केला ॥२॥
तुझीं बाळें घरीं कष्टती क्षुधेनें ।
जाईं वेगीं स्तनें पान देईं ॥३॥
बाळांकडे जाईं पाहें कंठीं काळ ।
न करीं उतावीळ मन आतां ॥४॥
नामा ह्मणे ऐसें संवादले फार ।
तिघांचें अंतर एकविध ॥५॥

45.
ऐशा दोधीजणा एकविधं भावें ।
द्यायवासी जीव उभ्या ठेल्या ॥१॥
धन्य धन्य त्यांचा संसार सुफळ ।
सत्वाचेंचि बळ अंगामध्यें ॥२॥
पाजूनियां येईं बाळक्रासी स्तन ।
आम्ही दोघे जण येथें असों ॥३॥
न टाका मजला सांगोनि निघाली ।
बिर्‍हाडासी आली लागवेगें ॥४॥
घेऊनियां अंकीं पाडसें तीं दोन्ही ।
लावू-नियां स्तनीं शोक करी ॥५॥
एकमेकें सुखें राहावें अनन्य ।
तुटलें सौजन्य तुह्मां आह्मां ॥६॥
पति पडिलासे फांसीं सांडीतसे प्राण ।
आह्मांलागीं जाणें त्याच्यासंगें ॥७॥
ह्लदयीं धरोनी दिधलें चुंबन ।
तीं ह्मणती कोण पोशी आह्मां ॥८॥
येऊं तुह्मांसंगें देऊं आधीं प्राण ।
पुढील कारण तुह्मी पाहा ॥९॥
नामा म्हणे ऐसें पांचही ते एक ।
देखोनि कौतुक वाटतसे ॥१०॥

46.
निघोनियां दखो आली त्या तटाका ।
झाली एकमेकां मेटी तेथें ॥१॥
परस्परें दु:ख देखतां वाढलें ।
धैर्याचेंचि बळ केलें त्यांनीं ॥२॥
देहभाव कांहीं नाठवे तयांसी ।
गुंतोनी मोहासी जीव देती ॥३॥
नामा ह्मणे देवें सोडवावें त्यांसी ।
हें तो अने-कांसी आटोपेना ॥४॥

47.
पारधी तो झड घालोनी पातला ।
घालावया घाला एकसरें ॥१॥
भयाभीत झालीं पांचही ते काळीं ।
वासना गुंतली एकमेकां ॥२॥
वडील कुरंगी येऊनि त्यापाशीं ।
लागोनी पायांसी काय बोले ॥३॥
नको मारूं पति तृषेनें पीडिला ।
मारी तूं मजला तया आधीं ॥४॥
आहेवपणानें धाडी स्वर्गलोका ।
येतुल्यानें सुखा पात्र होऊं ॥५॥
इतुकीयामाजी दुसरीही आली ।
ती ह्मणे उगली थांब आतां ॥६॥
तृषेनें पीदिलों पाजीं आधीं पाणी ।
मन जैसें मनीं तैसें करीं ॥७॥
नामा ह्मणे भिल्ल विसरला घात ।
राहिला निवांत त्यांच्या बोलें ॥८॥

48.
वडील कुरंगी काय बोले त्यासी ।
सांगतें धर्मासी पूर्वीलीया ॥१॥
बांधोनी मारितां घडे महादोष ।
पाजी उदकास सोडोनियां ॥२॥
पुऊनियां जळ येऊं तुजपाशीं ।
मग सावकासी करीं काज ॥३॥
आमुचा विश्वस नाहीं तुज जरी ।
मागशीं त्यापरी भाक देऊं ॥४॥
पर उपकारीं पडतसे देह ।
लोभ आतां काय वांचूनियां ॥५॥
भुकेलिया अन्न तान्हेल्या जीवन ।
पुण्यासी कारण इतुकेंची ॥६॥
पांचजणीं तुज बोपीयेले देह ।
यालागीं संदेह न धरावा ॥७॥
नामा ह्मणे ऐसा प्रार्थितां किरात ।
द्रवला मनांत काय बोले ॥८॥

49.
होऊनियां तुह्मी वनींचीं वनचरें ।
बोलतसां फार धर्मा-धर्म ॥१॥
येणें कांहीं कांहीं द्रव आला मना ।
तुमची भावना कोण जाणे ॥२॥
सोडिल्या पाण्यासी ठकवूनि आम्हासी ।
गेलिया तु-ह्मांसी काय कीजे ॥३॥
नामा ह्मणे ऐसें बोलेनि किरात ।
करावया घात शस्त्र काढी ॥४॥

50.
देखती तीं दोन्ही पाडसें त्या काळीं ।
भिल्लापुढें आली लागवेगें ॥१॥
सांभाळोनि हात ऐकावी विनंती ।
धरीं कृपा चित्तीं आमुचिया ॥२॥
अतितालागोनि चिलिया वोपी देहे ।
तेणेंचि तो लाहे परमधाम ॥३॥
मातापितरांसी न करावा घात ।
मारावें आमुतें आधी आतां ॥४॥
कोंवळें शरीर गोड बहु मांस ।
लागो सार्थ-कास तुझे कांजी ॥५॥
नामा म्हणे सत्त्व मोठें त्या पांचांचें ।
होती कैलासींचे अधिकारी ॥६॥

51.
हरणी सांगे कांहीं कर्मविपाकासी ।
ऐशा ऐशा दोषीं ऐसे होती ॥१॥
ठकवूनियां आह्मीं तुज जाऊं जरी ।
अंधतमाभि-तरीं वास पावों ॥२॥
गुरु स्वामी द्रोही विश्वासघातकी ।
तयास तो नरकीं वास सदा ॥३॥
परद्रोही परनिंदेसी रतला ।
तो होय कावळा जन्मोजन्मीं ॥४॥
पंक्तिभेदकेचीं मरतील पोरें ।
किंवा पती मरे बाळपणीं ॥५॥
सदासर्वकाळ दुष्ट कमीं रत ।
शूकरादि होत नीच योनी ॥६॥
अतीत अभ्यागत पूजा नाहीं ज्याला ।
घूस सर्प बिळामाजी होती ॥७॥
नामा ह्मणे केलें तैसें तें भोगावें ।
सावधान व्हावें जाणत्यांनीं ॥८॥

52.
पापिष्टाचें जिणें काय ते जिवालें ।
गळां स्तन झाले शेळियेचे ॥१॥
येथेंचि जो खोटा तेथें तो करंटा ।
व्यर्थ आला पोटा माउलीचा ॥२॥
तप्त ताम्र भूमि लोळविती नरा ।
लेटिती अघोर नरकामाजी ॥३॥
लोहोचंबुकाग टोंचिती येवोनी ।
मारि-ताती घणीं माथां घाव ॥४॥
वांधोनियां गळां टांगिती उफराटें ।
ह्मणताती सोटे वंरिच्यावरी ॥५॥
आसीपत्रावरी वोढिसी धरोनी ।
लेटिती नेउनी कुंभपाकी ॥६॥
जळतिया खाबा भेटविती बळें ।
खैरा़च्या इंगळें नाहाचिती ॥७॥
प्रळय क्रूर सर्प झोंबचिती कंठासीं ।
ओढोनि जिव्हेसी खंड करिती ॥८॥
नामा ह्मणे ऐसी पापिष्ठाची गती ।
जन्म लक्ष शतीं हेंचि फळ ॥९॥

53.
न करू आह्मीं तैसें घेईं आतां भाक ।
अंतरीं नि:शंक झालो सर्व ॥१॥
तुह्मीं आह्मां साक्षी असे सदाशीव ।
येथें दुजा भाव धरूं नको ॥२॥
पिऊनियां पाणी न येऊं तुजपाशीं ।
तरी घडे आह्मांसी सर्व पापें ॥३॥
जातीचा ब्राह्मण न करी ब्रम्हकर्म ।
तो जैसा अधम तैसे आह्मी ॥४॥
स्वामिद्रोही आणि विश्वास-घातकी ।
तो पडे ज्या नरकीं तेथें पडो ॥५॥
नामा म्हणे ऐसी वाहोनियां आण ।
धरीले चरण पारध्याचे ॥६॥

54.
पारधियासी तेव्हां दाटला गहींवर ।
लोटलें अपार प्रेम तेव्हां ॥१॥
जीवदान दिल्हें जावें तुम्हीं आता ।
न करावी चिंता कांहीं येथें ॥२॥
इंद्राचा मी दूत चुकलों सेवेसी ।
यालागीं जन्मासी आलों जाणा ॥३॥
तुमचिया बोलें निवालें अंतर ।
घात इत:पर न करीं कांही ॥४॥
नामा ह्मणे शुभकाळ त्याचा आला ।
ह्मणवोनि झाला पश्चात्ताप ॥५॥

55.
सोडोनियां गळा मुक्त केले त्यांसी ।
पिऊनि उदकासी आली पुढती ॥१॥
क्षुधेलासी फार न लावीं उशीर ।
घेऊनिय़ां शस्त्र हाणी वेगें ॥२॥
घर तुझें दूर वाहावेना भार ।
आह्मी तेथ-वर येत असों ॥३॥
सत्यत्व देखोनि ह्मणतसे पारधी ।
तुम्ह्यांसी न वधीं जावें आतां ॥४॥
पाठोपाठी त्याच्या घरालागीं आली ।
वरणीं घातली मिठी त्यांनीं ॥५॥
नामा ह्मणे सत्त्व आगळें तयांचें ।
वर्णावया वाचे नये शेषा ॥६॥

56.
हरिश्चंद्र राजा सत्त्वनिष्ठ मोठा ।
स्त्रीपुत्र चोहोटामाजी विकी ॥१॥
तैसोंचि येथें मृगाअंगीं सत्त्व ।
वोपियेला जीव पारध्यासी ॥२॥
शिबीराजा अंग कापी नेटपाटें ।
सत्त्वासी पालट होऊं नेदी ॥३॥
ताम्रध्वजा शिरीं कर्वत घातला ।
नाहीं पालटला मनोधर्मा ॥४॥
नामा ह्मणे मागें बहुतीं केएले कीर्ति ।
तयां ऐसी रीति येथें दिसे ॥५॥

57.
आधींच कृपाळू भोळा महादेव ।
जाणितला भाव कुरंगांचा ॥१॥
कृपा केली देवें मांडिला सन्मान ।
धाडिलें विमान दूताहातीं ॥२॥
लखलखित टके पताका डोलती ।
तयामाजी होती गीत नृत्य ॥३॥
नाना सुमनांची शय्या आरुवर ।
करिती उपचार सिद्धि आड ॥४॥
आले अकस्मात तयाचियेपाशीं ।
पाहतां सर्वांसी नवल वाटे ॥५॥
दिव्य दएह झाले पांचांचे ते काळीं ।
विमानीं बैसली लागवेगें ॥६॥
पारधी देखोनी तटस्थ राहिला ।
दूतीं तया केला उपदेश ॥७॥
शिवरात्री आजी जागरण उपवास ।
केला तेणें दोष सर्व गेला ॥८॥
करोनी पारणें होईं शिवभक्त ।
आशापाशीं चित्त गोवूं नको ॥९॥
अखंड कीर्तन शिवनामाचें करीं ।
तेणें मोक्षपुरी पावसील ॥१०॥
पुढिल्या शिवरात्री नेऊं कैलासासी ।
सांगोनियां त्यासी गेले वेगीं ॥११॥
नामा ह्मणे मोक्ष झाला त्या पांचासी ।
वस्ति चंद्रापाशीं केली त्यांनीं ॥१२॥

58.
तेणें उपदेशें पारध्यासी ज्ञान ।
करी तो कीर्तन नाम-घोषें ॥१॥
संचिताचा नाश क्रियमाण बुडविलें ।
त्या सहज जोडलें मोक्ष सुख ॥२॥
दुसर्‍या शिवरात्री पूजिलें शंकरा ।
करोनियां बरा भाव शुद्ध ॥३॥
विमानीं वाहोनी स्वस्थानीं स्थापिला ।
येथूनि संपला कथाभाग ॥४॥
नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप ।
जाणो-नियां जप करा त्यांचा ॥५॥

59.
शिवरात्री कथा धन्य जे ऐकती ।
|इच्छिलें पावती सर्व कांहीं ॥१॥
पातकाचा नाश पुण्य वाढे फार ।
शेखीं विश्वंभर कृपा करी ॥२॥
भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान ।
काल करी चरण सेवा त्यांची ॥३॥
नामा म्हणे शिव अक्षरें हीं दोन्हीं ।
जपावीं सज्जनीं वारंवार ॥४॥

60.
नामाचा महिमा कोण जाणे सीमा ।
चतुर्मुख ब्रह्मा-नेणे कांहीं ॥१॥
संसारा आलिया हेचि आहे जोडी ।
अखंड घ्यावी गोडी हरिनामें ॥२॥
सहस्त्रमुखें शेष वाखाणितां कीर्ती ।
नाहीं तया तृप्ति आजीवरी ॥३॥
पशु पक्षी तृण कीटक अपार ।
नामें गेले पार उतरोनि ॥४॥
कापुराचे राशी पडे अग्निकण ।
तैसें नाम जाण पातकासी ॥५॥
नामाग्नीनें दोष जळती एकसरा ।
कैवल्य जे धरा बसल्या ठायीं ॥६॥
नामा म्हने धन्य नामाचा प्रताप ।
ध्याती एकरूप देवभक्त ॥७॥

61.
लिंगपुरानीं हा बोलिला इतिहास ।
तोचि म्यां तु-म्हांस निवेदिला ॥१॥
अनेक पुराणीं अनेक प्रकार ।
ताराक्या नर नारी लोक ॥२॥
मुख्य हेचि कथा शिवरात्रीची जाणा ।
कैलासीं चा राणी तोष पावे ॥३॥
नामा म्हणे मन करोनि निश्चळ ।
करा गदा-रोळ नामघोष ॥४॥

, , ,

वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *