१० भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!!   श्रीकृष्ण   !!! भाग – १०.

करुं नका.योग्य वेळ आली की,माझे खरे स्वरुप तुमच्या दृष्टीस पडेल.धीर धरा.
यावर्षी चांगला पाऊस व निसर्गाने साथ दिल्याने आबादी आबाद झाले. इंद्राच्या कोपातुन सुटका झालेले गोप गोपी आनंदात होते.त्यांच्या मनोरंजना साठी बलराम-कृष्ण बैलांच्या अटीतटी च्या झुंजी लावत.एखादा मस्तवाल बैल अनावर झालाच तर श्रीकृष्ण आपल्या अवाढव्य शक्तीने जागीच दाबुन धरी. बलराम-कृष्ण पौगंडावस्था संपुन तारुण्यात १९ व्या वर्षात पदार्पन केले. श्रीकृष्णाचे रुप तर वर्णनातीत होते.सर्व आबालवृध्द गोपगोपी त्याच्या दर्शनार्थ वेडे झाले होते.त्यांना एकच भिती वाटाय ची की, हा आपल्यापासुन दुरावरणार तर नाही ना? हा कायम गुराखी कायम राहणार नाही हे स्पष्ट दिसत होते.आणि मग त्यांचे मन विषण्ण होई.


दर पोर्णिमेला बलराम-कृष्णा बरोबर सर्व गोपगोपी रासक्रीडा खेळयचे ठरविले.सर्व साजश्रृंगार,नटुन थटुन यमुनाकाठी कदंब वनांत आपपाल्या टिपर्‍या घेऊन दोघांची आतुरतेने वाट बघत,श्रीकृष्ण दर्शनार्थ अधीर झाले होते.एवढ्यात बासरीचे सूर काढत,पित रेशमी वस्र परिधान,कमरेला शेला, मस्तकी मयुरपिसांचा मुकुट,बाहुभुषणे घातलेला कृष्ण ऐटीत पावले टाकीत बलरामाबरोबर येत असलेला पाहुन सर्वां च्या नजरा त्याच्यावर खिळल्यात.गोप गोपींचे ह्रदय आनंदाने उचंबळुन आले. त्यांनी केलेल्या गोलाकाराच्या मध्यभागी श्रीकृष्ण उभा राहिला.मुरलीच्या तालावर टिपर्‍या पडुं लागल्या.रासनृत्य सुरु झाले. आणि रासक्रीडा खेळणे हा दिनक्रमच बनुन गेला.


एके दिवशी संध्याकाळी गोपगोपी रासक्रीडेसाठी श्रीकृष्णाची वाट पाहत असतांना एक भयंकार मस्तवाल बैल व्रजात शिरुन भयंकर उत्पात माजवल्या ने सगळीकडे हाःहाकार माजला.लोक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळुं लागले व श्रीकृष्णाचा धावा करुं लागले.तेवढ्यात कृष्णाने येऊन सर्वांना धीर दिला व टाळी वाजवुन बैलाचे लक्ष आपल्याकडे वेधले. कृष्णाला निश्चल उभे पाहुन,शिंगाने भोसकण्याच्या हेतुने,शिंगे रोखुन कृष्णा वर झेप घेतली,पण त्यापुर्वीच कृष्णाने त्याची शिंगे गच्च पकडुन जागीच उभे करत मागे रेटत नेले व शिंगाला व मानेला पीळ दिल्याने बैल धाडकण खाली पडला श्रीकृष्णाने त्याच्या एका शिंगावर पाय देऊन दुसरे शिंग जोराने उपटुन त्या शिंगा ने त्याच्या तोंडावर असा कांही फटका मारला की, बैलाने तात्काळ रक्त ओकले व पाय घासत प्राण सोडला. बैलाच्या रुपात तो वृषभासुर राक्षस होता.कृष्णाचे अचाट सामर्थ्य पाहुन व्रजवाशी हर्षित झाले. सर्व निर्भय झाल्याने गोपगोपींसह रासक्रीडा खेळुन सार्‍या व्रजवासियांना परम आनंद देऊ लागला.


श्रीकृष्णाच्या या लोकविलक्षण अद्भुत पराक्रमाची चर्चा,किर्ती चहुकडे पसरली.हळुहळु लोकांत, नारदाने भाकीत कथन केल्यानुसार कृष्ण हा नंद पुत्र नसुन वसुदेव देवकीचा पुत्र,कंसाचा काळ असल्याची चर्चा होऊ लागली. तेवढ्यासाठी तर कंसाने वसुदेव देवकीला मथुरेत कैदेत ठेवुन त्यांना झालेले पुत्र जन्मतःच कंसाने मारले,आठवी मुलगी ही शिळेवर आपटुन मारली.

वासुदेवाचा आठवा पुत्र कंसाचा काळ होईल ही झाले ली भविष्यवाणी असत्य कशी बर होईल ही चर्चा कंसाच्याही कानावर गेली.तो अस्वस्थ होऊन त्याचा संताप अनावर झाला.मी एवढा चौकस सावध असुन, माझा शत्रु,माझा काळ,राजधानीपासुन अवघ्या तीन कोसांवर सुखाने नांदत, वाढत आहे व मला कळु नये?गेली १६-१७ वर्षे वसुदेव गरीब निरुपद्रवी, इश्वरभक्तीत लीन असलेल्याने त्यांचेकडे दुर्लक्ष केले व स्वभावानुसार जुलमी राज वटीचा ओघ स्वकर्तुत्वाने भरभराटीस आलेल्या यादव,भोज,वृष्णी,अंधक यांच्याकडे वळली.अनेक देश देशोधडीला लागलेत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *