संत ज्ञानेश्वर म. चरित्र ३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-३.

अनुक्रणिका 👈 👉ग्रंथ सूची

अलंकापुरी-आळंदीला एक सत्पात्र, माणसांची पारख असणारा, नेमाने रोज संध्याकाळी सिध्देश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय झोपायचे नाही,असा नियम असलेले कुळकर्णी सिध्दोपंत नेहमीप्रमाणे सिध्देश्वरात शंकराचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांना समोरच्या ओवरीत गंभीर आवाजात, स्पष्ट आवाजात, नेटका शब्दोच्चारात महिम्न स्तोत्र म्हणत असलेले विठ्ठलपंत त्यांना दिसले…. असतगिरी समं स्थान् कज्जलं सिंधु पात्रे। सुरतरुवरशाखा लेखणी पत्र मुर्वी।। लिखति यदी गृहीत्वा शारदा सर्व कालं।तदापि तव गुणानामीश पारं न यति।। हे ऐकुन सिध्दोपंताचं मन मोहुन गेलं. त्यांनी विठ्ठलपंताची चौकशी केल्यावर विठ्ठलपंतांची निर्लेप वृत्ती पाहुन दुसर्‍या दिवशी आग्रहाने घरी जेवायला आमंत्रित केले.ं

घरी येऊन पत्निला आपली मुलगी रखुमाईकरतां स्थळ पाहिल्याचे व उद्या जेवायला आमंत्रित केल्याचे सांगीतले, दुसर्‍या दिवशी पत्निने चारी ठाव स्वयंपाकाचा बेत केला. दुपारी विठ्ठलपंत जेवायला बसल्यावर  आईच्या आज्ञेने रखुमाई त्यांना वाढत होती. पण विठ्ठलपंतानी डोळा उचलुन वर सुध्दा पाहिले नाही. जेवण आटोपल्यावर सिध्दोपंतानी सहज बोलत त्यांना म्हणाले, देवळात येण्याजाण्याचि राबता असल्यामूळे तुमच्या साधनेत विक्षेप येतो. आपल्या घरच्या माडीवरुन सिध्देश्वर स्पष्ट दिसतात, कुणाचा त्रास, व्यत्यय येणार नाही, शिवाय तुम्हाला पाहिजे त्या ग्रथांची व्यवस्था केल्या जाईल, तरी इथेच राहुन ध्यान धारणा करावी. विठ्ठलपंतानी तीथे राहायचे कबुल केले.

दुसर्‍या दिवशी  विठ्ठलपंतांना  इथे कसे वाटते? झोप आली का? वगैरे चौकशी केल्यावर सिध्दोपंत म्हणाले, रात्री मला दृष्टांत झाला. माझी लेक रखुमाईचा व तुमचा  विवाह झाला. विठ्ठलपंत म्हणाले, पण मला असा कांही दृष्टांत झाला नाही. त्यावर ब्रम्हचारी, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ अन्  सन्याश्रम असे चारही पुरुषार्थाबद्दल सिध्दोपंतांनी त्यांना समजावुन  म्हणाले, तुम्हाला देवाचा संकेत मिळाल्यावरच हा विवाह होईल असे आश्वास्त केले. पहाटे विठ्ठलपंताच्या स्वप्नात येऊन श्रीहरी म्हणाला, तू भक्तीचा पुतळा, ज्ञानाची वस्ती तुझ्या घरी आहे. वैराग्य पुरतेपणी अंगी बाणले आहे. हे सर्व गुण आकारास येण्यासाठी रुख्मिनीशी लग्न कर! कारण तिच्या उदरी सगळ विश्व मंत्रमुग्ध होईल असं भक्ती-ज्ञान-वैराग्य जन्माला येईल. सकाळी हे स्वप्न सिध्दोपंताना सांगीतल्यावर त्यांना ब्रम्हानंद झाला. पत्रिका जुळल्यावर लगेच एका शुभ मुहुर्तावर विठ्ठल रखुमाईचे लग्न लावुन दिले. विरक्त विठ्ठलपंत प्रपंच्याच्या चौकटीत सांपडले खरे! पण ते कमलपत्रावरल्या पाण्याच्या थेंबासारखे, पाण्यांत उगवलेल्या कमळासारखे अलिप्त!

भोवती बंधन पडलं, पण विठ्ठलपंताचे मन कांही संसारात रमेना! जेष्ठात लग्न झाले,आणि लगेच सिध्दोतंतानी जावई, लेक व पत्निसह पंढरपुरला नेऊन सर्वांनी मनोभावे विठुरायाचं दर्शन घेतलं. नंतर विठ्ठलपंतानी सासर्‍याकडे रामेश्वरला जाण्यासाठी अनुमती मागीतल्यावर मोठ्या कष्टाने ते तयार झाली. रखुमाईने दाराआडुन भरल्या डोळ्याने निरोप दिला. आणि विठ्ठलपंत निघाले यात्रेला. विठ्ठलपंत श्रीशैलमल्लिकार्जुन, व्यंकटेश, अरुणाचल, चिदंबर, रामेश्वर, गोकर्ण, कोल्हापुर, कराड, माहुली अशी तिर्थ करीत जवळजवळ एक वर्षांनी आळंदीला परतले. पत्नि रखुमाई डोळ्यात प्राण आणुन वाट पाहत होती. दक्षिणेतील सगळी तिर्थ झाल्यावर आतां घरी आपेगांवला जावं असा विचार त्यांच्या मनी आला. त्याप्रमाणे सासर्‍यांना सांगीतल्यावर सिध्दोपंत पुर्ण कुटुंबच घेऊन आपेगांवला पोहोचले. या सर्वांना पाहुन गोविंदपंत व नीराबाईंचा आनंद तर गगनांत मावेनासा झाला. लाडक्या लेकाला व देखण्या व सद्गुणी सुनेला कुठं ठेवु, त्यांच्यासाठी काय करुं? असं झालं. पाहुणचार, आहेर झाले. चार दिवस आनंदात राहुन मंडळीसह सिध्दोपंत आळंदीला परतले.

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *