संत ज्ञानेश्वर म. चरित्र २

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-२.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

एखादा पंडीत वेगवेगळ्या राज्यातील शास्रांना जिंकीत, मशाल पेटवुन, पालखीत मिरवित शहाणं वाजवीत, दिग्विजय करीत येऊन पैठणच्या चौकात मशाल रोवुन वादविवादासाठी पैठणच्या विद्वांनांना आव्हान करायचा. आणि जो जिंकेल त्याला शिष्य करण्याचे आश्वासन द्यायचा. मग १५-१५ दिवस वादविवादांचे मोठ मोठे फड पडायचे. पंचक्रोशीतील खुप लोकांची गर्दी होऊन पैठण नुसतं गजबजुन जायचंय!

भागवत, रामायण, महाभारत ची शास्रचर्चा ऐकण्यासाठी छोट्या विठ्ठलाला सोबत घेऊन गोविंदपंत वारंवार पैठणला जात असत. विठ्ठलाने बालपणापासुनच हे सर्व ऐकले, पाहिले.कुळकर्ण्याचं काम म्हणजे गांवचं दप्तर चोख ठेवणे. विठ्ठलाची मुंज झाल्यावर  कुळकर्णीच्या व्यवहार तर शिकेलच पण सोबत अमरकोश, कौमुदी, रुद्र, त्रिसुपर्ण, पुरुषसुक्त, आणि गीतेची संथा दिली. संथा घेत असतांना विठ्ठलाने वडीलांना विचारावे, विविक्तसेवी म्हणजे काय? पंत उत्तरलेत की, ज्यांना एकांतात राहायला आवडते त्यास विविक्तसेवी म्हणतात. विठ्ठल विचार करी की, कसं शक्य आहे? घरी तर पाहुण्यांची, येणार्‍या जाणार्‍यांची सतत वर्दळ! मग विठ्ठलाने गोदातीरी शंकराच्या मंदिरात एकटाच जाऊन बसावं.खुप विचार करायचा पण मार्ग सुचत नव्हता.

एकदा कांही तडीतापसी शंकराच्या देवळात उतरलेत. विठ्ठलाने त्यांना विचारले, तुम्हाला घर नसल्यासारखे असे कां हिंडता? देवाचे स्मरण करायला एकांत मिळावा, देवाचे आवडते व्हावे म्हणुन! सांपडली वाट! विठ्ठलाने ठरविले आपणही तिर्थयात्रा करत संतसमागन करुन देवाचे आवडते व्हावे. मनाततल्या इच्छांना तिलांजली द्यायची. ठरवल्याप्रमाणे घरी येऊन १५वर्षाच्या विठ्ठलाने गोविंदपंताचे ( वडीलांचे ) पाय धरुन तिर्थायटानासाठी अनुमती मागीतल्या बरोबर आई-वडीलांना धक्काच बसला. पण पंत गहिनीनाथाचे शिष्य होते, त्यांनी विठ्ठलाला जवळ घेऊन आशिर्वाद देत म्हणाले, आम्ही दोघं म्हातारे तुझी वाट पाहत असुं हे लक्षात असु दे! नीराबाई रडतांना पाहुन पत्निला म्हणाले, विठ्ठलाचे हे लक्षण लहानपणापासुनच दिसत होते. गहिनीनाथांवर विश्वास ठेवुन उद्या विठ्ठलाला हसतमुखाने पाठवण्याची तयारी करा!

दुसर्‍या दिवशी शुभ मुहुर्तावर विठ्ठल बाहेर पडला. प्रथम व्दारका तिथुन पिंडारक तिर्थ, गिरनार अशी तिर्थ करीत सप्तश्रृंगीला पोहोचला. आदीमायाच्या चरणी डोकं ठेवुन नंतर त्रिम्बकेश्वर! एका ज्योतीर्लिंगाचं दर्शन घडलं. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन भीमा-चंद्रभागेच्या काठांकाठाने तुळापुरी त्याला इंद्रायणी भेटली. तीच्या काठी असलेल्या अलंकापुरी आला. अलंकापुरीचि भूमी मोठी देखणी! पश्चिमेकडुन इंद्रायणी चंद्राकार वाहते आहे. तीच्या पावन तीरावर सिध्देश्वर ध्यानस्थ बसला आहे. वरच्या बाजुच्या सुरेख वनाला सिध्दबेट म्हणतात. तिथे कितीही त्रस्त मनानं गेलेल्या माणसाचं मन शांत झाल्याशिवाय राहत नाही, असा महिमा त्या भूमीचा! विठ्ठलपंतांना भटकंतीची हौस असलेलं मन तिथं रमलं. पहाटे उठुन इंद्रायणीत स्नान संध्या करुन सिध्धेश्वराचं दर्शन घेऊन इंद्रायणीच्या कुशीत आत्मचिंतन करीत बसावं. दुपारी गांवातुन माधुकरी आणल्यावर त्याचे दोन वाटे करुन एक वाटा इंद्रायणीतील माशांना खाऊ घालावं. परत चिंतनात मग्न व्हावं. संध्याकाळी सिध्देश्वरासमोर निरनिराळी स्तोस्र गावेत. अशी विठ्ठलपंताची दिनचर्या सुरु असायची.

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *