संत ज्ञानेश्वर म. चरित्र १

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत ज्ञानेश्वर भाग – १

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

सगळ्या जगाची माऊली असलेल्या ज्ञानेश्वरांबद्दल कांही भागात त्यांना बदिस्त करणे म्हणजे सुर्याला काजवा दाखवण्यासारखे होईल. तरी सुध्दा अल्पबुध्दीनुसार थोडं फार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमीप्रमाणे गोड मानुन आपला आशिर्वाद व क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित! आपला माहाराष्ट प्रान्त म्हणजे दर्‍याखोर्‍यांनी भरलेला, रानावनांनी झाकाळलेला, गिरिशिखरांनी साजुन दिसणारा आणि या गिरिशिखरावर जिथंं तिथं योगीराज ठाण मांडुन बसलेले! शंकराचे आदिपीठ म्हणजेच ज्योतीर्लिंग! भारतात एकुन बारा ज्योतीर्लिंग आहेत. पैकी पांच आपल्या महाराष्टातच आहेत… त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, नागनाथ, वैजनाथ आणि घृणेश्वर या आदिपीठां व्यतिरिक्त शिवमंदिर तर अगणित आहेत. नावं तरी कुठवर सांगायची?


आपला माहाराष्ट प्रान्त म्हणजे दर्‍याखोर्‍यांनी भरलेला, रानावनांनी झाकाळलेला, गिरिशिखरांनी साजुन दिसणारा आणि या गिरिशिखरावर जिथंं तिथं योगीराज ठाण मांडुन बसलेले! शंकराचे आदिपीठ म्हणजेच ज्योतीर्लिंग! भारतात एकुन बारा ज्योतीर्लिंग आहेत. पैकी पांच आपल्या महाराष्टातच आहेत… त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, नागनाथ, वैजनाथ आणि घृणेश्वर या आदिपीठां व्यतिरिक्त शिवमंदिर तर अगणित आहेत. नावं तरी कुठवर सांगायची?
महाराष्र्टातील गिरिशिखरांवर शंकरराजा आदिशक्ती पार्वतीसह निरनिराळ्या नांवाने मुक्कामाला आलेत. असा हा महादेव-जगदंबेचा, प्रकृती-पुरुषाचा शिवशक्तीचा देश! अशा त्या जटाभारांतुन गौतमानं गंगा आणली. गोदावरी नांवाने त्र्यंबकेश्वरी उतरुन दक्षिणेकडे निघाली. तिच्या काठी पैठण क्षेत्र, जुनं नांव प्रतिष्ठान! प्रतिष्ठान हे मोठमोठ्या विद्वांनांचं माहेर! उत्तरेत जो मान काशीला, तोच मान दक्षिणेतील पैठणला. पैठण हे न्यायाचं, धर्माच व्यासपीठ. केवढीही गहन समस्या असली तरी पैठण नगरीत उत्तर मिळाल्याशिवाय रहायचं नाही.


पैठणपासुन आठ मैलांवर गोदातरी आपेगांव नावांच छोटस गांव. त्या गांवी एका भागवत भक्त घराण्यात शके ११२५ च्या सुमारास गोविदपंत व पत्नि नीराबाई राहत होते. शेजारीच पैठण असल्यामुळे त्या घराण्यावर विद्वत्तेचेही संस्कार झालेले. गोविंदपंत चांगला व्युत्पन्न माणुस! ते नुसते शब्द पंडीतच नव्हते तर आल्यागेल्याचा चांगला सत्कार सुध्दा व्हायचा. त्यामुळे त्यांचे घर सतत भरलेलं असायचं परंतु घर भरलेलंअसुनही रितंरितं वाटायचं, कारण त्या दाम्पत्यांना मुलंबाळं नसल्यामुळे दोघेही दुःखी असत. देव सगळं चांगल करेल असा विश्वास गोविंदपंत आपल्या पत्नीला विश्वास देऊन तीचे सांत्वन करायचेत.


योगायोगाने मत्स्येंद्रनाथांचे शिष्य गोरखनाथ, त्यांचे शिष्य गहिनीनाथ हे शंकराचे उपासक व फार मोठ्या योग्यतेचे, योगमार्गाचे आचार्य!फिरत फिरत गहिनीनाथ आपेगांवी आलेत. गोविंदपंत आणि पत्नि नीराबाई यांनी त्यांचे मनोभावे आदरसत्कार केला. त्या जोडप्याचा सेवाभाव पाहुन गहनीनाथ प्रसन्न झाले. त्यांनी दाम्पत्यांना योगसांप्रदायाची दिक्षा दिली. दोघांनाही अपरंपार आनंद झाला. आधीच नेटका प्रपंच, त्यांत गहनीनाथासारख्या योग्याचा उपदेश लाभल्यामुळे दोघांच्याही जीवनाचे सार्थक होऊन कृतकृत्य झाल्याचे समाधान वाटले. कांही दिवसांतच प्रचिती आली. पंचेचाळीस वर्षाच्या नीराबाईला दिवस गेले. यथावकाश प्रसुत होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले.घरी पहिला पाळणा हलला. पुत्राचे नांव, विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे नांव, विठ्ठल ठेवले. म्हातारपणीचं कौतुक, नीराबाई विठ्ठलाला जिवापाड जपत असे.


शेजारच्या पैठणला काशीवरुन व देशाच्या सगळ्या भागातुन मोठमोठे पंडीत, शास्री यायचे. त्यांची प्रवचण, किर्तनं व्हायची, कुणी वेदान्तावर, कुणी सांख्यशास्र उलगडुन, कुणी न्यायशास्राच्या उतरंडी रचुन, तर कुणी जैनांचं व बौध्दांचं खंडन करायचेत.
एखादा पंडीत वेगवेगळ्या राज्यातील शास्रांना जिंकीत, मशाल पेटवुन, पालखीत मिरवित शहाणं वाजवीत, दिग्विजय करीत येऊन पैठणच्या चौकात मशाल रोवुन वादविवादासाठी पैठणच्या विद्वांनांना आव्हान करायचा. आणि जो जिंकेल त्याला शिष्य करण्याचे आश्वासन द्यायचा. मग १५-१५ दिवस वादविवादांचे मोठ मोठे फड पडायचे. पंचक्रोशीतील खुप लोकांची गर्दी होऊन पैठण नुसतं गजबजुन जायचंय! भागवत, रामायण, महाभारत ची शास्रचर्चा ऐकण्यासाठी छोट्या विठ्ठलाला सोबत घेऊन गोविंदपंत वारंवार पैठणला जात असत. विठ्ठलाने बालपणापासुनच हे सर्व ऐकले, पाहिले.कुळकर्ण्याचं काम म्हणजे गांवचं दप्तर चोख ठेवणे. विठ्ठलाची मुंज झाल्यावर कुळकर्णीच्या व्यवहार तर शिकेलच पण सोबत अमरकोश, कौमुदी, रुद्र, त्रिसुपर्ण, पुरुषसुक्त, आणि गीतेची संथा दिली.


संथा घेत असतांना विठ्ठलाने वडीलांना विचारावे, विविक्तसेवी म्हणजे काय? पंत उत्तरलेत की, ज्यांना एकांतात राहायला आवडते त्यास विविक्तसेवी म्हणतात. विठ्ठल विचार करी की, कसं शक्य आहे? घरी तर पाहुण्यांची, येणार्‍या जाणार्‍यांची सतत वर्दळ! मग विठ्ठलाने गोदातीरी शंकराच्या मंदिरात एकटाच जाऊन बसावं.खुप विचार करायचा पण मार्ग सुचत नव्हता.
एकदा कांही तडीतापसी शंकराच्या देवळात उतरलेत. विठ्ठलाने त्यांना विचारले, तुम्हाला घर नसल्यासारखे असे कां हिंडता? देवाचे स्मरण करायला एकांत मिळावा, देवाचे आवडते व्हावे म्हणुन!


सांपडली वाट! विठ्ठलाने ठरविले आपणही तिर्थयात्रा करत संतसमागन करुन देवाचे आवडते व्हावे. मनाततल्या इच्छांना तिलांजली द्यायची. ठरवल्याप्रमाणे घरी येऊन १५वर्षाच्या विठ्ठलाने गोविंदपंताचे ( वडीलांचे ) पाय धरुन तिर्थायटानासाठी अनुमती मागीतल्या बरोबर आई-वडीलांना धक्काच बसला. पण पंत गहिनीनाथाचे शिष्य होते, त्यांनी विठ्ठलाला जवळ घेऊन आशिर्वाद देत म्हणाले, आम्ही दोघं म्हातारे तुझी वाट पाहत असुं हे लक्षात असु दे! नीराबाई रडतांना पाहुन पत्निला म्हणाले, विठ्ठलाचे हे लक्षण लहानपणापासुनच दिसत होते. गहिनीनाथांवर विश्वास ठेवुन उद्या विठ्ठलाला हसतमुखाने पाठवण्याची तयारी करा!


दुसर्‍या दिवशी शुभ मुहुर्तावर विठ्ठल बाहेर पडला. प्रथम व्दारका तिथुन पिंडारक तिर्थ, गिरनार अशी तिर्थ करीत सप्तश्रृंगीला पोहोचला. आदीमायाच्या चरणी डोकं ठेवुन नंतर त्रिम्बकेश्वर! एका ज्योतीर्लिंगाचं दर्शन घडलं. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन भीमा-चंद्रभागेच्या काठांकाठाने तुळापुरी त्याला इंद्रायणी भेटली. तीच्या काठी असलेल्या अलंकापुरी आला. अलंकापुरीचि भूमी मोठी देखणी! पश्चिमेकडुन इंद्रायणी चंद्राकार वाहते आहे. तीच्या पावन तीरावर सिध्देश्वर ध्यानस्थ बसला आहे. वरच्या बाजुच्या सुरेख वनाला सिध्दबेट म्हणतात. तिथे कितीही त्रस्त मनानं गेलेल्या माणसाचं मन शांत झाल्याशिवाय राहत नाही, असा महिमा त्या भूमीचा! विठ्ठलपंतांना भटकंतीची हौस असलेलं मन तिथं रमलं. पहाटे उठुन इंद्रायणीत स्नान संध्या करुन सिध्धेश्वराचं दर्शन घेऊन इंद्रायणीच्या कुशीत आत्मचिंतन करीत बसावं. दुपारी गांवातुन माधुकरी आणल्यावर त्याचे दोन वाटे करुन एक वाटा इंद्रायणीतील माशांना खाऊ घालावं. परत चिंतनात मग्न व्हावं. संध्याकाळी सिध्देश्वरासमोर निरनिराळी स्तोस्र गावेत. अशी विठ्ठलपंताची दिनचर्या सुरु असायची.


अलंकापुरी-आळंदीला एक सत्पात्र, माणसांची पारख असणारा, नेमाने रोज संध्याकाळी सिध्देश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय झोपायचे नाही,असा नियम असलेले कुळकर्णी सिध्दोपंत नेहमीप्रमाणे सिध्देश्वरात शंकराचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांना समोरच्या ओवरीत गंभीर आवाजात, स्पष्ट आवाजात, नेटका शब्दोच्चारात महिम्न स्तोत्र म्हणत असलेले विठ्ठलपंत त्यांना दिसले…. असतगिरी समं स्थान् कज्जलं सिंधु पात्रे। सुरतरुवरशाखा लेखणी पत्र मुर्वी।। लिखति यदी गृहीत्वा शारदा सर्व कालं।तदापि तव गुणानामीश पारं न यति।। हे ऐकुन सिध्दोपंताचं मन मोहुन गेलं. त्यांनी विठ्ठलपंताची चौकशी केल्यावर विठ्ठलपंतांची निर्लेप वृत्ती पाहुन दुसर्‍या दिवशी आग्रहाने घरी जेवायला आमंत्रित केले.

घरी येऊन पत्निला आपली मुलगी रखुमाईकरतां स्थळ पाहिल्याचे व उद्या जेवायला आमंत्रित केल्याचे सांगीतले, दुसर्‍या दिवशी पत्निने चारी ठाव स्वयंपाकाचा बेत केला. दुपारी विठ्ठलपंत जेवायला बसल्यावर आईच्या आज्ञेने रखुमाई त्यांना वाढत होती. पण विठ्ठलपंतानी डोळा उचलुन वर सुध्दा पाहिले नाही.

जेवण आटोपल्यावर सिध्दोपंतानी सहज बोलत त्यांना म्हणाले, देवळात येण्याजाण्याचि राबता असल्यामूळे तुमच्या साधनेत विक्षेप येतो. आपल्या घरच्या माडीवरुन सिध्देश्वर स्पष्ट दिसतात, कुणाचा त्रास, व्यत्यय येणार नाही, शिवाय तुम्हाला पाहिजे त्या ग्रथांची व्यवस्था केल्या जाईल, तरी इथेच राहुन ध्यान धारणा करावी. विठ्ठलपंतानी तीथे राहायचे कबुल केले. दुसर्‍या दिवशी विठ्ठलपंतांना इथे कसे वाटते? झोप आली का? वगैरे चौकशी केल्यावर सिध्दोपंत म्हणाले, रात्री मला दृष्टांत झाला. माझी लेक रखुमाईचा व तुमचा विवाह झाला. विठ्ठलपंत म्हणाले, पण मला असा कांही दृष्टांत झाला नाही. त्यावर ब्रम्हचारी, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ अन् सन्याश्रम असे चारही पुरुषार्थाबद्दल सिध्दोपंतांनी त्यांना समजावुन म्हणाले, तुम्हाला देवाचा संकेत मिळाल्यावरच हा विवाह होईल असे आश्वास्त केले.

भोवती बंधन पडलं, पण विठ्ठलपंताचे मन कांही संसारात रमेना! जेष्ठात लग्न झाले,आणि लगेच सिध्दोतंतानी जावई, लेक व पत्निसह पंढरपुरला नेऊन सर्वांनी मनोभावे विठुरायाचं दर्शन घेतलं. नंतर विठ्ठलपंतानी सासर्‍याकडे रामेश्वरला जाण्यासाठी अनुमती मागीतल्यावर मोठ्या कष्टाने ते तयार झाली. रखुमाईने दाराआडुन भरल्या डोळ्याने निरोप दिला. आणि विठ्ठलपंत निघाले यात्रेला.

विठ्ठलपंत श्रीशैलमल्लिकार्जुन, व्यंकटेश, अरुणाचल, चिदंबर, रामेश्वर, गोकर्ण, कोल्हापुर, कराड, माहुली अशी तिर्थ करीत जवळजवळ एक वर्षांनी आळंदीला परतले. पत्नि रखुमाई डोळ्यात प्राण आणुन वाट पाहत होती. दक्षिणेतील सगळी तिर्थ झाल्यावर आतां घरी आपेगांवला जावं असा विचार त्यांच्या मनी आला. त्याप्रमाणे सासर्‍यांना सांगीतल्यावर सिध्दोपंत पुर्ण कुटुंबच घेऊन आपेगांवला पोहोचले. या सर्वांना पाहुन गोविंदपंत व नीराबाईंचा आनंद तर गगनांत मावेनासा झाला. लाडक्या लेकाला व देखण्या व सद्गुणी सुनेला कुठं ठेवु, त्यांच्यासाठी काय करुं? असं झालं. पाहुणचार, आहेर झाले. चार दिवस आनंदात राहुन मंडळीसह सिध्दोपंत आळंदीला परतले.

क्रमशः मिनाक्षी देशमुख

!!! संत ज्ञानेश्वर माऊली !!! भाग – १.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

4 Comments

  1. ज्ञानेश्वर म महाराजांची या जगा फार मोठे उपकार केले आहे आहे

    • नमस्कार मराठी या हिंदी भाषा कां उपयोग करे.

  2. […] संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग १ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग २ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग ३ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग ४ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग ५ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *