ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.417

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१७

औटपीठीं तेज गुजगुजीत । चारी देह तेथ साक्ष पाहा ॥१॥ अवस्था हे चारी संयोगचि एक । शुन्य जें निःशंक आत्मज्योती ॥२॥ ज्ञानदेवा बाई निवृत्ति वदवितां । त्याचे चरणी हिताहित झालें ॥३॥

अर्थ:-

औटपीठाच्या ठिकाणी मोहक असे तेज असते. स्थूल,सूक्ष्म, कारण व महाकारण हे चारी देह त्याठिकाणी केवळ ज्ञेयरूप आहेत. त्याठिकाणी जागृती स्वप्न, सुषुप्ती व तूर्या या चार अवस्थांचा जणू काय संयोग होतो.त्या प्रमाणे चार देहाच्या पलीकड़े निःसंशय आत्मज्योतीच आहे. ज्ञानोबाराय हे स्त्री भूमिका पत्करून जे निवृत्तीराय मजकडून हे बोलवितात. त्याचे चरणीच अहिताचे हित झाले ग बाई. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *