ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.408

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०८

आकाश हें असे माझें शिर बापा । कर्ण दिशा चिद्रूपा नाद उठती ॥१॥ आधारापासूनी सहस्रदळावरी । निःशब्द निरंतरी नारी एक ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथें । तोचि जीवन्मुक्त संत योगी ॥३॥

अर्थ:-

ज्या योग्याला असे वाटते की आकाश हे माझे मस्तक आहे. दिशा माझे कान आहे. त्या दिशारुप आकाशांत ज्ञानाचा आवाज उठतो. आधार चक्रापासून सहस्रदळापर्यंत अशी एक कुंडलिनी नाडी आहे. असा ज्याला अनुभव आहे. तोच जीवन्मक्त, संत योगी आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *