ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.५४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५४

ज्याचे गुणानाम आठवितां मनचि नाही होय । अनुभवाचें पाय पुढे चालती ॥ निर्गुण गे माये गुणवंत जाला । प्रतिबिंबी बिंबतसे चैतन्याचे मुसे ।

प्रति ठसावत ते वृंदावनी ब्रह्म असे गे माये ॥ बापरखुमादेविवरू डोळसु सांवळा । द्वैत अद्वैत सोहळा भोगवी गे माये ॥

अर्थ:-
त्याचे गुणनाम घेतले की मनच राहात नाही व अनुभव आठवला तर पाय चालत राहतात. त्या प्रतिबिंबात चैतन्याची मुस(साचा) दिसली तो निर्गुण, सगुण होऊन आला.ते सगुण ब्रह्मरुप वृंदावनात मी पाहात आहे

. तेच रुप, मला द्वैत अद्वैत रुपाचा सोहळा, माझ्या डोळ्याना दाखवणारा, तो सावळा रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *