९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ९.

वृंदावनात आल्यापासुन बलराम कृष्णांचे एक एक विस्मयकारक पराक्रम पाहुन सगळ्या गोपगोपींच्या ह्रदयात भक्तीभाव निर्माण झाला.श्रीकृष्णाला तर विष्णुचाच अवतार समजुन त्याला अनन्य भावे भजु लागले.विशेषतः गोपस्रीयांचे त्याच्यावर अतोनात प्रेम होते.माता,पुत्र, बंधु,भगिनी असे वेगवेगळे प्रेम त्यांना कृष्णाठायी वाटत होते.मनी ध्यानी कृष्णा बद्दलचे अवर्णनीय प्रेम त्यांच्या मनी दाटुन येई.ज्यावेळी श्रीकृष्ण बासरीचे सूर
काढत गाई चारायला घेऊन जात, तेव्हा त्याचे दर्शन घेण्यासाठी सर्व गोपगोपी लगबगीने आपापल्या दारात येऊन ऊत्सुकतेने वाट पाहत उभे राहत.त्याचे दर्शन झाले की, देहभान विसरुन,बासरी चे सूर विरेस्तोवर तो दिसेनासा झाला की, निराश मनाने,गुण आठवत,मग नित्य उद्योगाला लागत.संध्याकाळीही असेच घडे. मनुष्य तर मनुष्य जनावरे सुध्दा त्याचेवर प्रेम करीत असत.


शरदऋतु संपल्यावर सर्व गवळी शक्रोत्सव करण्याच्या तयारीस लागले.गिरियज्ञाची तयारी सुरु झाली. गोपींनी विविध पक्वान्ने बनविली.सर्व साहित्याने भरलेले गाडे गोवर्धन पर्वता च्या दिशेने निघाले.ब्रम्हवृदांनी यथाविधि, यथाशास्र यज्ञ केला.यज्ञकुंड धगधगले. गोवर्धनगिरिपुजेच्या आहुत्या पडल्या. मंत्रोच्चाराने सारा परिसर दुमदुमुन गेला, पवित्र झाला.यज्ञपुजा आटोपल्यावर सर्वां ची जेवणे झाली.गिरियज्ञाचा उत्सव पार पडल्यावर सर्वजण वज्रात परतले.


गोपांनी नेहमीच्या रुढीनुसार आपली पुजा न करतां गिरियज्ञ केल्या मुळे क्रोधीत होऊन इंद्राने पर्जन्यास्र वज्रा वर सोडले.काळ्याभिन्न मेघ आकाशात दाटल्यामुळे सगळीकडे अंधार झाला. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे कित्येकां च्या घरावरील छपरे उडुन गेली.गोठ्याती ल गुरेढोरे केविलवाणे हंबरु लागली. मुसळधार पाऊस सुरु झाला.सगळे वज्र जलमय झाल्याने वस्तु, गुरे वाहुन जाऊ लागली.पाण्याच्या प्रचंड लाटा वाढु लागल्या.मोठमोठे वृक्ष उन्मळुन तरंगु लागले.प्रलयच जणुं!श्रीकृष्ण वज्राची होत असलेली दुर्दशा पाहत होता,एवढ्या जलमय प्रवाहातुन कसेबसे कांही गोप त्याचेकडे येऊन करुणा भाकु लागले. श्रीकृष्णा तूच आमचा तारणहार इश्वर आहेस.गिरियज्ञ केल्यामुळे इंद्राच्या कोपा चे निवारण तुझ्याशिवाय कोण करु शकेल?तूच आमचा रक्षणकर्ता आहेस,हे करुणानिधि! आमचे रक्षण कर!


श्रीकृष्णाने सर्वांना आश्वास्त करीत म्हणाला,ज्या गोवर्धन पर्वताची पुजा करुन गिरियज्ञ केला तोच आपले रक्षण करील.तुम्ही सर्वजण आपापली गुरेढोरे घेऊन गोवर्धन पर्वताकडे चला.शेजारी उभ्या असलेल्या बलरामाला हळुच म्हणाला बलभद्रा! इंद्राला त्याच्या शक्ती चा फार गर्व झालाय!ठीक आहे! चल या व्रजांचं व पृथ्वीचं रक्षण केलच पाहिजे, असे म्हणुन सर्व व्रजवासी जनावरांसह कृष्ण बलरामाच्या मागोमाग पुरातुन चालु लागले.सर्व गोवर्धन पर्वताजवळ पोहोचले.श्रीकृष्ण त्या प्रचंड पर्वताजवळ ऊभा राहिला,शेजारी बलराम! आकाशा कडे पाहत कृष्ण पुटपुटला,देवेंद्रा या पृथ्वीवर मी कां आलो हे माहित असुनही भलत्यावेळी तुला कोप येण्याचे काय कारण? ठीक! बघ आता माझा पराक्रम!


श्रीकृष्णाने त्या प्रचंड पर्वताकडे नजर टाकली व आपला उजवा हात ताठ धरुन मनोमन म्हणाला,गिरिराज! आज व्रज वासिंनी तुझे पुजन ,यज्ञ केला.तेव्हा धर्म आणि कर्तव्यास अनुसरुन त्यांचे रक्षण कर.कृतज्ञ हो,कृतघ्न नको होऊस.आणि हाताची करंगळी आकाशदिशेला उचलल्याबरोबर, काय आश्चर्य! तो प्रचंड पर्वत करांगळीवर सरकला.श्रीकृष्ण सर्वां ना म्हणाला,माझ्या अलौकिक शक्तीने या पर्वताखाली येवढी जागा निर्माण झाली की,

तुम्ही आरामशीर राहु शकाल व थंडी वार्‍याचा उपद्रव होणार नाही. आंत गुहे मधे नवीन व्रजांची वसाहत झाली.सतत सात दिवस इंद्राच्या क्रोधाचे,तुफानी पावसाचे थैमान सुरु होते.शेवटी थकुन निरुपायाने इंद्राने माघार घेतली.दाही दिश्या मोकळ्या,निरभ्र झाल्यात.सूर्य प्रखर तेजाने तळपु लागला.तेव्हा कृष्णाने सामानासह सर्वांना बाहेर येण्यास सांगीत ले.गिरिगुहा मोकळी झाली.आणि हलकेच कृष्णाने आपला हात खाली घेत ल्याबरोबर गोवर्धन पर्वत पुर्ववत स्थितीत आला.श्रीकृष्णाच्या या दिव्य,अचाट पराक्रमाने श्रीकृष्ण हा विष्णु अवतार असल्याची पुन्हा एकदा त्यांची खात्री पटली.ब्रजवासी आनंदाने विभोर झालेत.


क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *